ETV Bharat / state

Shivsena Anniversary: आज 57 वर्षाची झाली शिवसेना, जाणून घ्या जडण घडणीचा इतिहास

author img

By

Published : Jun 19, 2023, 7:59 AM IST

Updated : Jun 19, 2023, 10:45 AM IST

शिवसेनेचा वर्धापनदिन
शिवसेनेचा वर्धापनदिन

आज शिवसेनेचा 57 वा वर्धापनदिन साजरा केला जाणार आहे. या 57 वर्षात शिवसेनेत अनेक वादळे आली आणि गेली. शिवसेने सर्व वादळांचा आणि आव्हानांचा मोठा सामना केला आहे. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात शिवसेना बसलेली आहे.

मुंबई : आज शिवसेनेचा 57 वा वर्धापनदिन आहे. याच दिवशी 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली होती. दरम्यान एक असलेली शिवसेना आज दोन झाली आहे. याच कारणामुळे आज दोन वर्धापन दिन सोहळे पार पडणार आहेत. शिवसेना आणि ठाकरे गट आपापले वर्धापनदिन साजरे करणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमाला शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर राहणार आहेत. या 57 वर्षात शिवसेनेत अनेक वादळे आली आणि गेली. शिवसेने सर्व वादळांचा आणि आव्हानांचा मोठा सामना केला आहे. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात शिवसेना बसलेली आहे.

अनेकांच्या मनातील प्रश्न : मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि हिंदुत्वाचा आवाज बुलंद करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती. या शिवसेनेने अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. पण आज शिवसेना दोन भागात विभागली गेली आहे. सर्व मराठी माणसांना एकत्र आणणारी शिवसेना आपल्या अंतर्गत वादामुळे दोन गटात विभागली गेली आहे. आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात शिवसेना आहे. त्याच कारण तसेच आहे. शिवसेना जेव्हा स्थापन झाली त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसांना न्याय मिळवून दिला होता. शिवसेनेची अॅक्शन अनेकांचा घाम काढणारी होती. याचमुळे याला भगवे वादळ म्हटले जात परंतु शिवसेनेत अंतर्गत वादाचा वादळ आले आहे. इतर वादळाप्रमाणे शिवसेना या वादळातून बाहेर पडेल का असा प्रश्न बहुतेकांना पडला आहे.

शिवेसना नाव का ठेवले : आज शिवसेना 57 वर्षाची झाली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना जेव्हा स्थापन केली त्यावेळी उद्धव ठाकरे हे फक्त 6 वर्षांचे होते. बाळ केशव ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेना स्थापन केली. शिवसेनेला शिवेसना नाव उद्धव ठाकरे यांचे बाबांनी दिले. बाबा म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांचे वडील केशव ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे या नावाने ओळखले जातात. त्यांच्या विवेकवादी आणि सुधारणावादी कार्यामुळे त्यांना हे नाव दिले गेले आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी संघटनेला शिवसेना हे नाव दिले. शिव म्हणजे महादेव नव्हे तर महाराष्ट्राचे प्रतीक असलेल्या शिवाजी महाराजांसाठी आहे आणि ‘सेना’ म्हणजे लष्कर. मुंबईतील मूळ मराठी लोकांसाठी एक चळवळ उभी करणे. ज्यांना नोकऱ्यांच्या संधी मिळवून देण्यासाठी शिवसेना काम करू लागली होती. शिवसेनेचा पहिला मेळावा 30 ऑक्टोबर 1966 रोजी विजया दशमीच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांनी नागरिकांना संबोधन केले होते. त्यावेळी त्यांनी राजकारणाला "एक्झिमा" असे संबोधले होते. यामुळे शिवसेना फक्त 20 टक्के राजकारण आणि उर्वरित 80% कार्य सामाजिक कार्य करेल असे सांगितले होते.

दोन गट आणि दोन स्थापना दिवस (सेना विरुद्ध सेना): एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांनी भाजपसोबत सत्तेची चूल मांडली. त्यानंतर शिंदे मुख्यमंत्री होत त्यांनी थेट शिवसेनेच चिन्ह आणि नावावर आपला हक्क सांगू लागले. या प्रकरणी निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजून निर्णय दिला. यामुळे हा वर्धानपन दिन त्यांच्यासाठी पहिला असेल. परंतु या दिवशी दोन्ही गटाच्या शिवसेनेकडून वेगवेगळे कार्यक्रम केले जाणार आहेत.

शिवसेनेचे यश: सर्वात मोठ्या प्रादेशिक राजकीय पक्षांपैकी एक असलेल्या शिवसेनेकडे अनेक आघाडीच्या जनसंघटना आहेत. त्यांची नावे भारतीय विद्यार्थी सेना नावाची विद्यार्थी शाखा, युवासेना नावाची पक्षाची युवा शाखा आणि शिवसेना महिला आघाडी नावाची महिला शाखा, अशी आहेत. या विविध शाखांनी समाजाच्या विविध विभागांच्या हितसंबंधांचे लक्षणीय समर्थन केले आहे. या आघाडीच्या संघटनांच्या शाखा महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही आहेत. मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, राजस्थान, बिहार आणि केरळ या राज्यांमध्ये या शाखा कार्यरत आहेत. महिला आघाडी मुंबईतील घरातील घरगुती वाद मिटवते. या संघटनेच्या सक्रिय सहभागामुळे कुटुंबातील महिलांचे अत्याचार कमी झाले आहेत. शिवसेनेचा दावा आहे की महाराष्ट्र राज्यातील उच्च दर्जाच्या उद्योगपतींना मोठ्या प्रमाणात मदत केली आहे, कारण त्यांच्या कठोर नियमांमुळे उद्योगांमध्ये शांततापूर्ण कामकाजाची परिस्थिती मोठ्या प्रमाणात राखली गेली आहे. यामुळे उद्योगाची उत्पादकता वाढली, असा पक्षाचा दावा आहे. शिवसेनेने कामगारांच्या कामगार संघटना आणि सीपीआय आणि सीपीआय-एम सारख्या डाव्या पक्षांच्या कामगार शाखांशी वारंवार वाद होत असतो.

महाविकास आघाडीची स्थापना : अनेकांना माहिती आहे की, 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेची युती होती. परंतु निवडणूक झाल्यानंतर ही युती मुख्यमंत्री पदाच्या मागणीवरुन तुटली आहे. भाजपसोबत सोडचिठ्ठी करत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करत सरकार स्थापन केले होते.

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा : दोन अडीच वर्षांनंतर, पक्षाचे बहुसंख्य आमदार शिंदे यांच्या बंडात सामील झाल्याने उद्धव यांना राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरे यांनी 29 जून 2022 रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे हे नवे मुख्यमंत्री बनले. शिंदेंना बंडासाठी भाजपचा पाठिंबा मिळाला होता. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. मुख्यमंत्री होऊन आपण बाळासाहेब ठाकरेचे स्वप्न केल्याचे म्हटले होते.

शिवसेनेच्या बंडखोरांचा इतिहास : शिवसेनेचे नवे बंडखोर एकनाथ शिंदे आहेत मात्र, बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्याविरोधात बंड केले होते. काँग्रेसप्रमाणे शिवसेनेच्या नेत्यांनी रागाच्या भरात, निराशेने किंवा मतभेदामुळे बाळासाहेबांची साथ सोडली आहे.

छगन भुजबळ : शिवसेनेत पहिले बंड छगन भुजबळ यांनी केले होते. वर्ष 1991 मध्ये माझगाव येथील पक्षाचे आमदार होते. त्याच वर्षी भुजबळ यांनी शिवसेना (ब) स्थापन करण्यासाठी पक्षाच्या 52 पैकी 17 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता.

नारायण राणे : शिवसेनेत तिकिटे आणि पदे विकली जात असल्याचा आरोप झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणेंना पक्षातून काढले होते. जुलै 2005 मध्ये पक्षविरोधी कारवायां केल्यामुळे नारायण राणेंची सेनेतून हकालपट्टी केली गेली.

राज ठाकरे: बाळ ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांनी 2005 मध्ये शिवसेनेचा राजीनामा दिल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात मोठा धक्का बसला होता.

हेही वाचा -

  1. Shiv Sena Anniversary: शिवसेनेचा आज ५७ वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरेंसह शिंदे गट करणार जोरदार शक्तीप्रदर्शन
  2. Sanjay Raut in Shivsena melava : नेहमी मोदींचे नाव घेता, ते तुमचे बाप आहेत का सांगा - संजय राऊत
  3. Maharashtra Politics: राज्यात रंगले पोस्टर वॉर; राज ठाकरे, आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी, राजकीय चर्चांना उधाण
Last Updated :Jun 19, 2023, 10:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.