ETV Bharat / state

Tunisha Sharma Suicide Case : आरोपी शिझान खानचा जामिनासाठी अर्ज; न्यायलायने दिला हा आदेश

author img

By

Published : Jan 2, 2023, 12:02 PM IST

Updated : Jan 2, 2023, 10:49 PM IST

Sheezan Khan Tunisha
तुनिषाच्या कुटुंबीयांचे सर्व आरोप फेटाळले

तनुषा शर्मा आत्महत्येप्रकरणी (Tunisha Sharma Suicide Case) शिझान खानच्या (Sheezan Khan) जामीनासाठी वसई न्यायालयाकडे अर्ज करण्यात आला आहे. 31 डिसेंबर रोजी शिझानला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता त्याच्या जामीनासाठी वसई न्यायालयात जामीन अर्ज (Bail application in Vasai Court) दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शिझान खानच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत तुनिषाच्या कुटुंबीयांचे सर्व आरोप फेटाळले (denied all the allegations of Tunisha family) आहेत.

मुंबई : तुनिषा शर्माने आत्महत्या (Tunisha Sharma Suicide) केल्यानंतर शिझान खानवर (Sheezan Khan) अनेक आरोप झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. अटक केली. त्यानंतर त्याला वसई न्यायालयात हजर करण्यात आलं. वसई न्यायालयाने 31 डिसेंबर रोजी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि त्यानंतर आता शिझानच्या जामीनासाठी वसई न्यायालयामध्ये अर्ज (Bail application in Vasai Court) करण्यात आला आहे. दरम्यान, शिझान खानच्या कुटुंबियांनी तुनिषाच्या कुटुंबीयांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. शिझानच्या कुटुंबियांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले. या पत्रकार परिषदेत त्याची आई आणि बहिणीचा समावेश होता.

न्यायालयाने काय म्हटलंय : आरोपी शीझानने वसई न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने वालीव पोलिसांना नोटीस बजावून ७ जानेवारीपर्यंत उत्तर दाखल करावे, त्या तारखेला सुनावणी होऊन आदेश दिले जाणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.

तुनिषाच्या आईचा आरोप पूर्णपणे चुकीचा : तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अख्तर शिजान खानचे कुटुंबीय आणि वकील पहिल्यांदाच मीडियासमोर आले. शिझान खानच्या कुटुंबीयांनी सांगितले की, एक संजीव कौशल आहे जो तुनिषाच्या कुटुंबाला सांभाळत आहे. तुनिषाची आई आणि तुनिषाचे संबंध अजिबात चांगले नव्हते. तुनिषाचे तिचे काका संजीव कौशल यांच्याशीही चांगले संबंध नव्हते. शिझान खानची बहीण फलक नाज म्हणाली की, तुनिशा माझ्या बहिणीसारखी होती. तुनिषाचे मानसिक आरोग्य ठीक नव्हते, तुनिषाला फलक दर्ग्यात नेण्यात आले ही गोष्टही खोटी आहे. हिजाबची गोष्टही खोटी आहे. शिजानच्या आईने सांगितले की, तुनिषाची आई विनीता खूप खोटे बोलत आहे. जर शिजानने तुनिषाला सेटवर थप्पड मारली, तर तुनिषाच्या आईने असा आरोप केला आहे की, तुनिषाच्या आईने थप्पड मारली तेव्हा का सांगितले नाही. शीझानची आई म्हणाली तुनिषा ही आमची मूलगी होती. तुनिषा आमच्या घराच्या अगदी जवळ होती. तुनिषाला न्याय मिळावा अशी आमची इच्छा आहे. पवन शर्मा जो स्वत:ला तुनिशाचा मामा म्हणवत आहे. तो तुनिशाचा मामा नाही, तो पूर्वी तुनिशाचा मॅनेजर होता ज्याला तुनिषाने स्वतःहून काढून टाकले होते. तुनिषाच्या आईचा आरोप आहे की शिजान ड्रग्स घेत असे जे खोटे आरोप आहे. तुनिषा आणि शिजानमध्ये खूप चांगले संबंध होते. दोघांमध्येही खूप समजूतदार नाते होते. तुनिषाच्या आईचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे.

शिझान खानविरोधात तक्रार : अभिनेत्री तुनिषाने शनिवारी २४ डिसेंबरला वसई पूर्वेकडील मालिकेच्या सेटवर गळफास ( Tunisha Sharma Suicide Case ) घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येप्रकरणी आई वनिता शर्मांनी तिचा बॉयफ्रेंड आणि मालिकेतील सहकलाकार शिझान खानविरोधात तक्रार दिली आहे. सध्या शिझान पोलीस कोठडीत आहे. पोलीस त्याची या प्रकरणात कसून चौकशी करत आहेत. तसेच पोलिसांनी तुनिषाने आत्महत्या केलेल्या खोलीतील काही सामानही ( Forensic Team Searching On The Shooting Spot ) जप्त केले आहे. शिझान खानचा फोन आणि त्यादिवशी वापरलेले कपडेही पोलिसांनी जप्त ( Forensic Team seize Cloth Ornaments ) केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत.पोलिसांनी नोंदवले सेटवर उपस्थितांचे जबाब या प्रकरणी आतापर्यंत एकूण १६ जणांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. ही घटना घडली त्या दिवशी सेटवर उपस्थित असलेल्या सर्वजणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. तुनिषा शर्मा ( Forensic Team seiz Cloth, Ornaments ) आणि शिझान खान मागच्या साडेतीन महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, शिझानने ब्रेकअप केल्याने तुनिषा नैराश्याच्या गर्तेत बुडाल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. तसेच त्याचे इतर मुलींशी संबंध असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. वनिता शर्मांच्या आरोपांच्या आधारे पोलीस शिझानची चौकशी करत आहेत.

चहाच्या ब्रेकनंतर आत्महत्या : अभिनेत्री टॉयलेटमध्ये गेली अन् वालीव पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांना माहिती मिळाली की, चहाच्या ब्रेकनंतर अभिनेत्री टॉयलेटमध्ये गेली होती. मात्र ती परत आली नाही तेव्हा पोलिसांनी दरवाजा तोडला आणि तिने गळफास ( Forensic Team Searching On The Shooting Spot ) घेतल्याचे आढळले. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की, तुनिषाने उचलल्या टोकाच्या पावलामुळे तिचे जीवन ( Forensic Team seize Cloth, Ornaments ) संपुष्टात आले. त्याचे कारण पंधरवड्यापूर्वी शीझानसोबतचे तिचे ब्रेकअप असू शकते. या प्रकरणाच्या प्रथम माहिती अहवालात दोघेही रिलेशनशिपमध्ये ( Tunisha Sharma Suicide Case ) होते, असे स्पष्ट होते. 15 दिवसांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले होते. तुनिषा शर्मा ही तणावाखाली होती आणि त्यामुळेच तिने टोकाचे पाऊल उचलले असा संशय असल्याचे असे पोलिसांनी सांगितले आहे.

तुनीषा आत्महत्या प्रकरण : हिंदी टेलिव्हिजन मालिकांमधली अभिनेत्री तुनिषा शर्मानं आत्महत्या केली आहे. वसईनजिकच्या नायगावमध्ये एका मालिकेचं शूटिंग सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली. तुनिषाच्या आत्महत्येला तिचा मित्र शिझान खान जबाबदार असल्याची तक्रार तिच्या आईनं वालीव पोलीस स्थानकात केली आहे. त्यानंतर वसई पोलिसांनी शिझानला ताब्यात घेतलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्मानं शिझान खानच्या मेकअप रूममध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. तुनिशा आणि शिजान हे दोघं सध्या सब टीव्हीच्या अलिबाबा... दास्तान-ए-काबुल या मालिकेत मुख्य भूमिकेत एकत्र काम करत होते. याच मालिकेच्या सेटवर मेकअप करतानाचा एक व्हिडीओ तुनिशानं आत्महत्येच्या काही वेळ आधी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. त्यामुळं सेटवरच्या कलाकार आणि तंत्रज्ञांसह तुनिषाच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. तुनिषानं गळफास घेतल्याचं लक्षात येताच, तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित करण्यात आले होते.

Last Updated :Jan 2, 2023, 10:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.