ETV Bharat / state

Sanjay Raut On CM : कोण शिंदे? त्यांचं कर्तृत्व काय? संजय राऊतांनी उडवली खिल्ली

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 6:48 PM IST

Sanjay Raut On Eknath Shinde : आज (8 ऑक्टोबर) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यावर टीका केली.

Sanjay Raut On Eknath Shinde
खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली

मुंबई : Sanjay Raut On CM Eknath Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यावर टीका केलीये. यासोबतच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांविषयी देखील भाष्य केले.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत : शीतल म्हात्रे आणि मुख्यमंत्री यांचा काय संबंध? कोण संजय राऊत हा शितल म्हात्रे यांचा प्रश्न बरोबर आहे. परंतु, आता महाराष्ट्राला प्रश्न पडलाय की कोण शिंदे? त्यांचं कर्तृत्व काय? आमची निष्ठा सर्वांना माहितीये, असं संजय राऊत म्हणाले.

त्यांनी इतिहास वाचायला हवा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांविषयी बोलताना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला. शाहिस्तेखानाची बोटं छाटली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विसरता येणार नाही. महाराजांनी वाघनखांनी अफजल खानाचा कोथळा काढला, हे सत्य आहे. महाराजांनी त्यांच्या आयुष्यात अनेक हत्यारांचा वापर केला. आमचं सरकार केव्हापासून इतिहास संशोधक झालंय? वाघनखांविषयी महाराजांच्या वंशजांनासुद्धा संशय आहे. कारण हे सरकार म्युझियममधली वाघनखं आणतंय. ती शिवकालीन असू शकतात आणि आम्ही त्याचा आदर करतो. त्यांनी इतिहास वाचायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आता त्यांच्यासाठी वाघनखापर्यंत पोहचलाय. आता निवडणूक आल्यात, त्यामुळे त्यांना हे विषय आणायचेत.

जे पी नड्डांच्या वक्तव्याचाही केला उल्लेख : देशातून प्रादेशिक पक्ष संपवले पाहिजेत, असं वक्तव्य जे पी नड्डा यांनी केलंय. या वक्तव्याचा समाचार घेत संजय राऊत म्हणाले की, नड्डा यांना कोण गांभीर्याने घेत नाही. भाजपा हळूहळू प्रादेशिक पक्ष होईल. १२ राज्यात भाजपा नाहीये. भाजपा प्रादेशिक पक्षाचा अपमान करतंय. याविषयी नड्डा यांनी काही बोलायला नको. अटलजी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान बनले तेव्हा प्रादेशिक पक्षाच्या जीवावर बनले. हे नड्डा विसरलेत वाटतं, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

जनगणना हा राजकीय मुद्दा नाही : जातीय जनगणना बिहारला झाली. राजस्थानमध्ये सुद्धा जातीय जनगणनेला सुरुवात झालीये. इतर राज्यात मागणी होत आहे, ही चांगली गोष्टी आहे. जातीय जनगणना हा राजकीय मुद्दा नाही. पण ती सध्याची गरज आहे. तसेच निवडणूक दरम्यान त्यांचा वापर केला जाऊ शकतो, असंही राऊत यावेळी म्हणालेत.

हेही वाचा :

  1. Sanjay Raut on State Government : या सरकारच्या चड्डीच्या नाड्या दिल्लीत म्हणून मुख्यमंत्री नेहमी दिल्लीला जातात; राऊतांची राज्य सरकारवर जळजळीत टीका
  2. Sanjay Raut on Nanded Case : महाराष्ट्रात मृत्यूचं तांडव सुरू असताना...; 'त्या' प्रकरणावरून राऊतांची सत्ताधाऱ्यांवर जळजळीत टीका
  3. Sanjay Raut on Dasara Melava : शिंदेंच्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली होती का? दसरा मेळाव्यावरुन राऊतांचा हल्लाबोल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.