ETV Bharat / state

Sanjay Raut on State Government : या सरकारच्या चड्डीच्या नाड्या दिल्लीत म्हणून मुख्यमंत्री नेहमी दिल्लीला जातात; राऊतांची राज्य सरकारवर जळजळीत टीका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 2:19 PM IST

Sanjay Raut on State Government : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. यावेळी त्यांनी अनेक विषयांवरून राज्य सरकारवर टीका केलीय.

Sanjay Raut on State Government
Sanjay Raut on State Government

संजय राऊत यांची पत्रकार परिषद

मुंबई Sanjay Raut on State Government : राज्यातील सरकारी रुग्णालयांमधील रुग्णांच्या मृत्यूबाबत विरोधकांकडून राज्य सरकारवर सातत्यानं निशाणा साधला जातोय. नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये शासकीय रुग्णालयात होणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. राज्याच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत बैठकीसाठी दिल्लीला जात आहेत. या सरकारच्या चड्डीच्या नाड्या दिल्लीत असल्यानं हे नेहमी दिल्लीत जातात, अशी जळजळीत टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी राज्य सरकारवर केलीय.



राज्यातील सरकार सीबीआय, ईडीनं आणलं : राज्यातील सरकारी रुग्णालयात लोक मरत आहेत. मृत्यूचं तांडव सुरू आहे. गेल्या 8 दिवसांत 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. मुख्यमंत्री नक्षलवादावर चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेलेत. पण, नक्षलवादात जेवढे लोक मरण पावले नाहीत त्यापेक्षा जास्त लोक राज्यातील हॉस्पिटलमध्ये मरण पावले आहेत, अशा शब्दांत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. महाराष्ट्रातील हे सरकार शिंदेंनी आणलं आहे का? देवेंद्र फडणवीस यांनी आणलं आहे का? की अजित पवारांनी आणलं आहे? तर हे सरकार दिल्लीतून ईडीनं आणलेलं आहे. इन्कमटॅक्सनं आणलेलं आहे. सीबीआयनं आणलेलं आहे, असंही राऊत म्हणाले.


यांची तर चायना मेड शिवसेना : गणपती उत्सवाच्या काळात भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा हे मुंबईतील गणपतींचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या स्वागताचे बॅनर लावले होते. यावर बोलताना राऊत म्हणाले की, नड्डा यांच्या स्वागताचे बॅनर्स मुख्यमंत्र्यांनी लावलेले आहेत. हे स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचा चेला म्हणवतात आणि नड्डा यांचे बॅनर्स लावता? किती ही लुच्चेगिरी? भाजपाच्या नेत्यांच्या स्वागताचे बोर्ड लावताय? तुम्ही स्वतःला शिवसेना समजता तर मग जे पी नड्डा यांच्या स्वागताचे बॅनर लावायचे, भाजपाच्या नेत्यांना भेटायला दिल्लीला जायचं. हे शिवसेनेनं कधीही केलं नाही. यांची शिवसेना ओरिजनल नाही तर हा चायना मेड माल असल्याचा घणाघात यावेळी संजय राऊतांनी केलाय.


देवेंद्र डमरू वाजवतात, दोन माकड नाचतात : राज्यात इतकी माणसं मरत आहेत. राज्यातील शासकीय रुग्णालयात गेल्या 8 दिवसांत दीडशेच्या आसपास लोकं मेली आहेत. मात्र मुख्यमंत्री दिल्लीला आहेत. कधी रात्री बारा वाजता, कधी पहाटे चार वाजता तुम्ही दिल्लीला जाता. दिल्लीला काय आहे? याचा अर्थ हे सरकार दिल्लीनं बनवलेलं आहे. एकनाथ शिंदे यांना सुद्धा ईडी आणि सीबीआयनं फोडलंय. देवेंद्र फडणवीस डमरू वाजवतात आणि हे दोन नाचतात, अशीही टीका खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर केलीय.

हेही वाचा :

  1. Sanjay Raut on Nanded Case : महाराष्ट्रात मृत्यूचं तांडव सुरू असताना...; 'त्या' प्रकरणावरून राऊतांची सत्ताधाऱ्यांवर जळजळीत टीका
  2. Nitesh Rane On Sanjay Raut : ... तर संजय राऊतांना त्यांच्या पत्रकार परिषदेत जाऊन प्रश्न विचारणार; नितेश राणेंचा इशारा
  3. Sanjay Raut on Dasara Melava : शिंदेंच्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली होती का? दसरा मेळाव्यावरुन राऊतांचा हल्लाबोल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.