ETV Bharat / state

Sanjay Raut : मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करता येत नाही का? संजय राऊतांचा सरकारला सवाल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2023, 12:38 PM IST

Sanjay Raut : 'संसदेच्या विशेष सत्रात मराठा आरक्षणा संदर्भात घटनादुरुस्तीवर चर्चा व्हायला हवी', अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसंच, 'आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमध्ये पोलिसांचा काहीच दोष नाही, हा आदेश वरून देण्यात आला होता', असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut
संजय राऊत

मुंबई : Sanjay Raut : जालन्यात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यातील राजकारण चांगलच तापलंय. विरोधी पक्षाचे नेते आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उतरले आहेत. शनिवारी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेतली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशनात प्रस्ताव आणावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करता येत नाही का : 'सर्वोच्च न्यायालयानं लोकायुक्तांच्या अधिकाराबाबत दिल्ली सरकारच्या बाजूने निर्णय दिला. तो निर्णय फिरवण्यासाठी संसदेत घटनात्मक दुरुस्ती करण्यात आली. नवीन विधेयक मांडून कायदा केला गेला. केंद्र सरकारच्या हातातून अधिकार जात होते. त्यामुळे त्यांनी एवढं सर्व केलं. मग आता मराठा आरक्षणाच्या संदर्भात काही घटनादुरुस्ती करता येत नाही का? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.

हेही वाचा : Raj Thackeray Met Maratha Protestors : सरकारला तुमची फक्त मतं पाहिजेत; मराठा आंदोलकांच्या भेटीसाठी राज ठाकरे जालन्यात

संसदेच्या विशेष सत्रात चर्चा व्हायला हवी : 'तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी, लोकनियुक्त सरकारचा आवाज दाबण्यासाठी संसदेत विशेष विधेयक आणता. जबरदस्तीनं ते मंजूर करून घेता. आता तुम्ही संसदेचं विशेष सत्र बोलावलं आहे. या सत्रात मराठा आरक्षणा संदर्भात काही घटनादुरुस्ती करून मराठा आणि ओबीसी समाजात जे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत, त्यांना न्याय देता येईल का? यावर चर्चा व्हायला हवी', असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा : Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक; उपमुख्यमंत्र्यांची आंदोलकांसोबत चर्चा

लाठीचार्जमध्ये पोलिसांचा दोष नाही : जालना येथील लाठीचार्ज प्रकरणात राज्य सरकारच दोषी असल्याचा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला. 'राज्य सरकारनच आदेश दिले. तो अदृश्य फोन कोणाचा होता? लाठी हल्ला झाला त्यात पोलिसांचा दोष नाही. तिकडच्या पोलीस प्रमुखांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. यामध्ये तुम्ही पोलिसांचा बळी घेत आहात. वरिष्ठांचा आदेश आल्याशिवाय पोलीस हा निर्णय घेऊच शकत नाहीत. हा संवेदनशील विषय आहे. हे आंदोलन चिरडून टाका असे आदेश वरून आले होते, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय.

राज्यात तीन-तीन जनरल डायर : 'महाराष्ट्रात जनरल डायर कोण? हे सर्वांना समजलंय. महाराष्ट्रात जनरल डायरचं राज्य आहे. राज्यात एक नाही तर तीन-तीन जनरल डायर आहेत. जनरल डायरच्या मानसिकतेनं राज्य चालू आहे', अशी जळजळीत टीका खासदार संजय राऊत यांनी यावेळी बोलताना केली.

हेही वाचा : Maratha Reservation Protest : सत्तेवर असताना मराठ्यांना शरद पवार का न्याय देऊ शकले नाहीत?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.