ETV Bharat / state

Sanjay Raut criticizes Modi : मणिपूर हिंसाचारावर बोलायला 56 दिवस का लागले? पंतप्रधान मोदींचा काहीतरी राजकीय स्वार्थ - संजय राऊत

author img

By

Published : Jul 21, 2023, 2:08 PM IST

खासदार संजय राऊत
खासदार संजय राऊत

मुंबईतील निवासस्थान आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी मणिपूरच्या घटनेवरुन पंतप्रधान मोदींच्यावर टीका केली. मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढण्यात आली होती, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. मणिपूरच्या हिंसेमागे पंतप्रधान मोदींचा काहीतरी राजकीय स्वार्थ असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई : मणिपूरबाबत खासदार राऊत म्हणाले की, हा विषय काही नवीन नाही. या देशांमध्ये एका जमातीच्या दोन मुलींची नग्न धिंड काढली जाते आणि पंतप्रधान जवळ-जवळ 56 दिवसानंतर त्यावरती वक्तव्य करतात. ते सुद्धा संसद सुरू असताना संसदेच्या बाहेर. याचा अर्थ तुम्ही संसदेला मानत नाही. नवीन संसद कशासाठी उभी केली आहे? लोकशाहीचा डंका कशासाठी? या देशाच्या मीडियाने बोध घ्यायला पाहिजे. अनेक विषयांवर तुम्ही चर्चा घडवू शकत नाही. तुम्ही अदानींंवर चर्चा करू शकत नाही. भ्रष्टाचारावर चर्चा करू शकत नाही. तुम्ही मणिपूरवर चर्चा करायला तयार नाहीत. मग पार्लमेंट हवे कशाला? मग तुम्ही पतंप्रधान कसले आहात?

पार्लमेंट आहे म्हणून तुम्ही पंतप्रधान आहात हे लक्षात घ्या. मणिपूरचा विषय हा अत्यंत गंभीर आहे. मणिपूरच्या विषयावर युरोपियन पार्लमेंटवर चर्चा होते. पण मणिपूरचा विषयावर आपल्याच पार्लमेंटवर चर्चा करू देत नसतील तर ही लोकशाही अत्यंत धोक्यात आहे. - संजय राऊत

मणिपूरची घटनेवरुन आणि राज्यातील सरकारवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने सुजित पाटकर यांना अटके केली आहे, यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदीवर जोरदार टीका केली. त्याचबरोबर शिंदे गटाला खडेबोल सुनावले आहेत.

मणिपूरच्या घटनेमागे मोदींचा स्वार्थ : पुढे बोलताना राऊत म्हणाले की, "70 दिवस होत आले तरी मणिपूर अजून शांत करता येत नाही. तुम्ही येथे बसून जगाचे प्रश्न सोडवायच्या गोष्टी करत आहात. त्यांचे जे भक्त मंडळी त्यांना विश्वगुरू म्हणते मग त्यांना मणिपूर शांत करायला इतका वेळ लागतो? मणिपूर हा देखील हा देशाचा भाग आहे, मणिपूर या देशाचे नागरिक आहेत. मणिपूरच्या महिलांना देशात रस्त्यावर आणून नग्न करून मारले जाते. ही या देशातल्या 140 कोटी जनतेची जनतेसाठी चिंतेची गोष्ट आहे. समान नागरी कायदा आणत आहात मणिपूर मधला कायदा आणि सुव्यवस्था आधी नीट करा. एवढी हिंमत तुमच्यात आहे का? पंतप्रधानांच्या प्रत्येक कृतीमागे त्यांचा राजकीय स्वार्थ असतो. पंतप्रधान स्वार्थाशिवाय काही करत नाही. त्यांचे काय स्वार्थ आहे हा येणारा काळ ठरवेल."

चांगले काम केल्याने टार्गेट : कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना अटक केली आहे. आता लवकरच राऊत देखील तुरुंगात जातील, असा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. याबाबत बोलताना खासदार राऊत म्हणाले की, या मुंबईमध्ये सर्वच कोविड सेंटरमध्ये उत्तम काम केले गेले. डॉक्टर असोत की नर्सेस असतील ते चालवणारे लोक असतील पेंडामिक अॅक्ट त्यानुसार काम केले. पण, विरोधकांच्या पोटात गोळा आलेला आहे. लोकांचे जीव वाचवले. लोकांना सेवा दिली. याचा फायदा यांना महानगरपालिकेत होईल, त्यामुळे टार्गेट केले. हा यांचा जवळचा, तो त्यांचा जवळचा. आता परवा एक अश्लील व्हिडिओ क्लिप आली. आता ती व्यक्ती फडणवीसांच्या जवळची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे आहेत. आता त्यांचा त्यामध्ये सहभाग आहे का?

सगळे भाजपचे निकटवर्तीय : मुंबई अथवा महाराष्ट्रात कोविडच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाला हा डाग लावण्याचा प्रयत्न आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संदर्भातील ईडीला पत्र दिले आहे. झाकीर नाईक, टेररिस्ट दाऊदचा हस्तक किती कोटी आले. त्याच्या अकाउंटला त्याची ईडी चौकशी करत नाही. नवाब मलिकला पकडले इक्बाल मिरचीला सोडले. तुमच्या पक्षात घेतले. राहुल कुल मनी लाँड्रिंग तुमच्याच निकटवर्तीय आहेत ना? भीमा पाटस सहकारी कारखान्याचे प्रकरण, दादा भुसेंची मनी लाँड्रिंग प्रकरण कुठे गेले? एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय ना? बाकी सगळे पिढीचे पदवीधारक तुमच्या मंत्रिमंडळात आहेत ना? उत्तम सेवा कोविड सेंटरने मुंबईत दिली आहे. लोकांचे प्राण वाचवले. पण, बदनाम करायचे छळ करायचे. पण लक्षात ठेवा 2024 ला सरकार बदलेल आणि ज्यांनी ज्यांनी या खोट्या कराव्या केलेल्या आहेत त्या सगळ्यांना त्याची उत्तर द्यावी लागतील. हिशोब द्यावा लागेल.

2024 ला सरकार बदलणार : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचे बॅनर लावले आहेत. त्यावर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे. याबाबतही खासदार राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार भावी मुख्यमंत्री आहेतच आणि लवकरच मुख्यमंत्री होणार आहेत. भावी म्हणजे फार भावी राहणार नाहीत. मलाही राजकारण माहित आहे. काय घडामोडी घडत आहेत त्याही मला माहिती आहेत. मग त्या कायदेशीर आणि राजकीय असतील. अजित पवार हे भविष्यातले आणि लवकर लवकर ते मुख्यमंत्री होतील. मी पहिल्याच दिवशी सांगितले महाराष्ट्राला लवकरच नवे मुख्यमंत्री मिळतील. अजित पवारांच्या वाढदिवसाला जर असे काही बॅनर लागले. पण शिंदे गटाने हे सत्य स्वीकारले पाहिजे - खासदार संजय राऊत

हेही वाचा -

  1. Monsoon Session 2023 Updates : मणिपूर महिला अत्याचारावरुन विरोधकांचा संसदेत हल्लाबोल; विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभा सोमवारपर्यंत तहकूब
  2. Manipur violence : मणिपूरमध्ये महिलांना विवस्त्र केल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.