ETV Bharat / bharat

Monsoon Session 2023 Updates : मणिपूर महिला अत्याचारावरुन विरोधकांचा संसदेत हल्लाबोल; विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभा सोमवारपर्यंत तहकूब

author img

By

Published : Jul 21, 2023, 10:50 AM IST

Updated : Jul 21, 2023, 12:49 PM IST

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना मणिपूर प्रकरणावरुन चांगलेच धारेवर धरले आहे. मणिपूरमधील महिला अत्याचाराप्रकरणी विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज पहिल्या दिवशी बंद पाडले आहे. आजही संसदेचे कामकाज वादळी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Monsoon Session 2023
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये झालेल्या दोन महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणामुळे विरोधकांनी संसदेच्या अधिवेशनात चांगलाच गदारोळ केला. या प्रकरणावरुन विरोधकांनी संसदेचे कामकाज बंद पाडल्याने आता आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणामुळे भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये चांगलेच राजकारण तापले आहे. मणिपूर प्रकरणावर चर्चेसाठी सरकार तयार असतानाही विरोधकांनी संसदेचे कामकाज विस्कळीत केल्याचा आरोप भाजपने केला आहे. संसदेत या विषयावर चर्चा झाली, तर काँग्रेसशासित राज्यांमधील महिलांवरील अत्याचाराचा विषय पुढे आला असता, असा आरोपही भाजपने केला आहे. दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दिवसही वादळी ठरला असून लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. दरम्यान राज्यसभेतही विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब : विरोधकांनी लोकसभेत मणिपूरच्या महिलांवर अत्याचार प्रकरणामुळे चांगलाच गदारोळ केला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज अगोदर 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. मणिपूर महिलांवरील अत्याचारप्रकरणी सत्ताधारी चर्चा करण्यास तयार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतरही विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी प्रचंड गदारोळ केल्यामुळे लोकसभा सोमवार 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

  • #WATCH | Defence Minister Rajnath Singh on the Manipur violence says, "I feel the opposition is not serious about the discussion on the Manipur issue. The government wants to discuss the Manipur issue. PM Modi himself said that the country is ashamed of whatever has happened in… pic.twitter.com/GlTZ3sj9uM

    — ANI (@ANI) July 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लोकसभा आणि राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी घोषणाबाजी करत हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चेची मागणी केली. यावेळी विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब केल्यानंतर भाजपने विरोधकांवरच आरोप केला आहे. संसदेबाहेरही काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि समाजवादी पक्षासह विरोधी पक्षांनी मणिपूरमधील जातीय हिंसाचार आणि दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या कथित व्हिडिओवरून केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली.

विरोधक सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचा निर्धार : विरोधकांनी मणिपूर घटनेवरुन संसदेत गदारोळ केल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. याबाबत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकारांना माहिती दिली. सरकारने चर्चेसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले असतानाही काँग्रेस आणि उर्वरित विरोधी पक्षांनी सभागृहाचे कामकाज विस्कळीत केल्याचे पीयूष गोयल यांनी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा निर्धार करूनच विरोधक आले होते, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

  • #WATCH | On Manipur situation, Congress MP Pramod Tiwari says, "I would like to say just one thing, especially for BJP, PM and others - Samar shesh hai, nahi paap ka bhaagi keval vyaaghra, jo tatasth hain, samay likhega unka bhi apraadh...How the CM is still holding onto his… pic.twitter.com/Vu3R9sIOJz

    — ANI (@ANI) July 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काँग्रेसशासित राज्यांमध्ये महिलांशी गैरवर्तन : बंगालमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान हिंसाचाराच्या घटना झाल्यामुळे विरोधक चिंतेत असल्याचा टोला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी यावेळी लगावला. काँग्रेसशासित राज्यांमध्ये महिलांशी गैरवर्तन होत आहे. कदाचित यामुळे विरोधक चर्चेपासून दूर पळत असल्याचेही पीयूष गोयल म्हणाले. सरकार मणिपूरवर चर्चेसाठी तयार आहे. परंतु दुर्दैव आहे की काँग्रेस, टीएमसी आणि बाकीचे विरोधी पक्ष स्वतःला लपवण्यासाठी यापासून दूर पळत आहेत. त्यांना कोणतीही चर्चा करायची नसल्याचेही पीयूष गोयल यांनी यावेळी स्पष्ट केले.

  • #WATCH | On Manipur situation, Congress MP Manish Tewari says, "There can be nothing more unfortunate than comparing this to any other state, that too at this time. For the last 77-78 days, there is an atmosphere of anarchy in Manipur. It won't be wrong to say that there is… pic.twitter.com/eHDPMuru6D

    — ANI (@ANI) July 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांचा आक्षेप : राज्यसभेच्या अध्यक्षांनी मणिपूरवर अल्पकालीन चर्चेसाठी नोटिसांना परवानगी दिली. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष आणि सभागृहातील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आक्षेप घेतला. सभागृहाचे सर्व कामकाज आधी स्थगित करण्यात येऊन नियम 267 अंतर्गत मणिपूरवरील चर्चेसाठी त्यांच्या नोटीस घेण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

  • #WATCH | Parliamentary Affairs Minister Pralhad Joshi on the ruckus in parliament over the Manipur issue says, "We are ready to discuss whenever the Speaker directs. Union Home Minister Amit Shah has officially told the Speaker and the Chairman that we are ready for a discussion.… pic.twitter.com/BwmSAHRR2L

    — ANI (@ANI) July 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भाजपचा विरोधी पक्षांवर निशाणा : मणिपूर हिंसाचार प्रकरणावरुन संसेदत गदारोळ झाल्यानंतर भाजपने विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. विरोधकांच्या अनेक सदस्यांनी नियम 176 अन्वये अल्पकालीन चर्चेसाठी नोटीस दिली होती. त्यांना वाटले आम्ही सहमत होणार नाही. मात्र आम्ही चर्चेसाठी सहमत झालो. त्यानंतर त्यांना कामकाज ठप्प करण्याचे दुसरे कारण मिळाल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांना दिली.

  • #WATCH | "I would like to make an appeal to the opposition to not change their stand repeatedly and not indulge into politics as it is a very sensitive matter related to women's dignity, north-east and border state...I think the parliament session should run as we're ready to… pic.twitter.com/gcFB2Tp7N8

    — ANI (@ANI) July 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सल्लागार समितीची बैठक देखील उधळली : विरोधकांनी व्यवसाय सल्लागार समितीची बैठक देखील उधळली. यावरून त्यांना आजपासूनच संसदेच्या कामकाज थांबवायचे असल्याचे स्पष्ट होत असल्याचे मत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही विरोधकांवर हल्लाबोल केला. राज्यसभेत पीयूष गोयल आणि लोकसभेत प्रल्हाद जोशी यांनी सरकार मणिपूरवर चर्चेसाठी तयार असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतरही काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली. कोणत्या नियमानुसार चर्चा व्हायला हवी यावर विरोधकांनी वाद घातला.

  • AAP MP Raghav Chadha on the ruckus in parliament over the Manipur issue says, "The violence in Manipur has shaken our collective conscience. I request the central govt to wake up from their slumber & discuss the Manipur issue...The entire country wants to know what is happening… pic.twitter.com/O6vkfW9anD

    — ANI (@ANI) July 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर कसा बाहेर आला व्हिडिओ : मणिपूरमध्ये दोन महिलांवर अत्याचार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच कोंडीत पकडले आहे. मणिपूरमध्ये झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे. मात्र दोन महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस अगोदरच कसा बाहेर आला, यावरुन माजी मंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री एन बीरेन सिंग या प्रकरणी कारवाई करत आहेत. पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणी चिंता व्यक्त करुन कारवाईचे आदेश दिल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषेदेत दिली.

हेही वाचा -

  1. Parliament Monsoon Session 2023 : लोकसभा-राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित
  2. Parliament Monsoon Session 2023 : संसदेचे पावसाळी अधिवेशन 'या' मुद्द्यांवरुन वादळी होण्याची शक्यता
Last Updated :Jul 21, 2023, 12:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.