ETV Bharat / state

ST Workers Strike : ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर; छोटे व्यापारी- शेतकरी संकटात!

author img

By

Published : Dec 4, 2021, 5:58 PM IST

शासनात विलीनकरण करण्याची मागणी करत एसटीचे कर्मचारी (ST Workers Strike) गेल्या एका महिन्यापासून संपावर गेले आहेत. या संपाचा सर्वाधिक फटका हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला (Rural Economy) बसत आहे. एसटीची बससेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांसमोर (Small traders and farmers) माल बाजारात पोहोचवायचा कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एसटी बस
एसटी बस

मुंबई - सर्वांच्या सुख-दु:खात साथ देणारी, ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाचा कणा असणारी ग्रामीण भागाची लाडकी 'लालपरी' अर्थात एसटी गेल्या एका महिन्यापासून आगरात उभी आहे. याचा सर्वात मोठा फटका ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बसला आहे. एसटी उभी असल्याने (ST Workers Strike) आठवडी बाजारात आपला माल पोहोचवायचा कसा? हा प्रश्न छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांसमोर (Small traders and farmers) आहे. एसटी कर्मचारी संपामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर (Rural economy on ventilator) असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

संपाचा आठवडी बाजाराना फटका
ग्रामीण भागातील महिला व वयोवृद्धांसाठी जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली लालपरी अर्थात एसटी तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या अर्थकारणाची नाडी असणारे आठवडी बाजार गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे (Covid 19) बंद होते. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ग्रामीण भागातील एसटी बस व आठवडी बाजार (Weekly market) पुन्हा सुरू झाले होते. ग्रामीण भागाचे अर्थचक्र (Rural economy) रुळावर येत असतानाच एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. एसटीचे शासनात विलीनकरण करावे (ST should be merged with the government), या प्रमुख मागणीसाठी गेल्या एका महिन्यापासून एसटी कर्मचारी संपावर (ST Workers Strike) गेले आहेत. आतापर्यत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यात शासनाला अपयश आले आहे. परिणामी, एसटीचा संप सुरूच असल्याने सर्वसामान्य नागरिकांबरोबर आणि एसटी महामंडळाचे मोठे नुकसान होत आहे. काही वर्षात आठवडी बाजारांवर पहिला आघात नोटाबंदीने (Demonetization), तर दुसरा आघात वस्तू आणि सेवा कराने (Goods and Service Tax) केला. तर तिसरा आघात कोरोना महामारीने (Covid 19 epidemic) केला आहे. या तिनही आघातांतून बाहेर पडण्याचे प्रयत्न हळूहळू सुरू असतानाच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुन्हा एकदा आठवडी बाजारांना फटका बसला आहे.

महिला व वयोवृद्ध नागरिकांना फटका
सध्या एसटीच्या गाड्या बंद असल्याने ग्रामीण भागाचा शहरी भागाशी असणारा संपर्क तुटल्यासारखी परिस्थिती असून, प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण ठप्प झाले आहे. शहरी भागात काही कामानिमित्त जायचे म्हटले तर मोटारसायकल किंवा खासगी वाहनाने जावे लागत आहे. त्यासाठी दोनशे ते तीनशे रूपयांचे पेट्रोल (Petrol) लागते. तर, खासगी वाहने ग्रामीण भागातील नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नसल्याने नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. तर महिला व वयोवृद्ध नागरिकांना दवाखाने (Hospitals), बँक (Banks) आदी कामांसाठी शहरी भागात येण्यास बस बंद असल्याने कुठलीच सुविधा राहिलेली नाही. यामुळे त्यांना जादा पैसे देऊन खाजगी वाहनाने अथवा गावातील तरूणांना मोटारसायकलवरुन घेऊन जाण्यासाठी विनंती करावी लागत आहे.

ग्रामीण भागात खासगी बसेस सोडा - दीपक चव्हाण
एसटी कर्मचाऱ्यांच्या गेल्या ३० दिवसांपासून सुरु असलेल्या संपामुळे ग्रामीण भागातील छोटे व्यावसायिक, हातगाडीवाले (Small business, handcart owners) यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण आठवडी बाजारामध्ये शेतीपूरक व्यवसायाची (Agricultural business) उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असून, एसटी बंद असल्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शहरातून माल आण्यासाठी एसटी बंद असल्याने अव्वाचा सव्वा पैसे देऊन खासगी वाहनातून त्यांना माल आणावा लागत आहे. राज्य सरकारने (State Government) एसटी कर्मचारी संपााच्या पार्श्वभूमीवर खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीला परवानगी (Private vehicles allowed for passenger transport) दिली असली तरी, खासगी वाहन फक्त लांब पल्याची प्रवासी वाहतूक करत आहेत. ग्रामीण भागात खासगी बसेस धावत नसल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक आणि व्यापारी यांना फटका बसत आहे. संपााच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात सुद्धा खासगी बसेस सोडण्याचे निर्देश शासनाने द्यावेत, अशी मागणी प्रवासी संघाचे कार्यध्यक्ष दीपक चव्हाण यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलतांना केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.