ETV Bharat / state

Ajit Pawar Demand : 'या' तालुक्याचे नामांतर ‘राजगड’ करा; अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

author img

By

Published : Apr 27, 2023, 9:56 PM IST

Ajit Pawar letter
अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना याबाबत पत्र लिहिले आहे. त्यात वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड करण्यात यावे, अशी आग्रही मागणी केली आहे.


मुंबई: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल 27 वर्षे स्वराज्याचा कारभार राजगडावरुन चालवला होता. राजगडाचे ऐतिहासिक महत्व, वेल्हे आणि महाराष्ट्रवासियांच्या मनातले राजगडाबद्दलचे आदराचे स्थान लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड करण्यात यावे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.



महसुलमंत्री, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र : वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड करावे. पुणे जिल्हा परिषदेच्या 22 नोव्हेबर 2021 रोजीच्या सर्वसाधारण सभेत वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड करण्याबाबत सकारात्मक ठराव झाला आहे. त्यावेळी वेल्हे तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायतींनी, तालुक्याचे नामांतर राजगड करण्याचे ठराव सादर केले होते. किल्ले राजगडाबद्दल वेल्हे तालुकावासियांच्या, तमाम महाराष्ट्रवासियांच्या मनात असलेली आदर, अभिमानाची भावना लक्षात घेऊन वेल्हे तालुक्याचे नामांतर तातडीने करण्यात यावे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. वेल्हे तालुक्यातील राजगड या किल्ल्याशी तालुक्यामधील तमाम नागरिकांचे जिव्हाळयाचे संबध आहे. सदर किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम राजधानी देखील होता. नामकरण करावा अशी वेल्हे तालुक्यातील नागरिकांची इच्छा आहे.



तालुक्याला शिवकालीन वारसा: वेल्हे तालुक्याला शिवकालीन व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. राजगड आणि तोरणा दोन्ही किल्ले सदर तालुक्यात येतात. जुन्या दस्तानुसार तोरणा किल्ल्याचे नाव प्रचंडगड आहे. सदर तालुक्याचे मुख्य ठिकाण हे वेल्हे बु. घेरा जागी तालुक्याचे नाव वेल्हे असे दिसते. तालुक्यातील सर्व जनतेच्या भावना लक्षात घ्यावात. लवकरात लवकर सरकारने नामांतराला मान्यता द्यावी. तसेच किल्ले राजगडाबद्दल वेल्हे तालुकावासियांच्या, तमाम महाराष्ट्रवासियांच्या मनात असलेली आदर, अभिमानाची भावना लक्षात घेऊन वेल्हे तालुक्याचे नामांतर तातडीने करण्यात यावे अशी मागणी पत्रातून अजित पवारांनी केली आहे.

हेही वाचा: Chandrakant Patil Taunts Ajit Pawar अजितदादांसाठी मी धावतपळत आलो पण ते बैठकीला आलेच नाहीतचंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.