ETV Bharat / state

Schools Reopening in Maharashtra : शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

author img

By

Published : Jan 19, 2022, 6:50 PM IST

Updated : Jan 19, 2022, 7:32 PM IST

राज्यात अचानक कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे शाळा आणि महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता अनेक पालक संघटनांनी शाळा सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे.

Education Minister Varsha Gaikwad
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई - राज्यात अचानक कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे ( Omicron Patients Increasing in Maharashtra ) शाळा आणि महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ( Schools Closed in Maharashtra ) मात्र, आता अनेक पालक संघटनांनी शाळा सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे. सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ( Edcuation Minister Varsha Gaikwad on School Reopening ) यांनी दिली आहे.

उद्या मंत्री मंडळाच्या बैठकीत होणार निर्णय -

गेल्या काही दिवसांपासून कोरोना व ओमायक्रोनच्या वाढत्या संसर्गामुळे धोका लक्षात घेता राज्य सरकारने राज्यातील शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटत असून त्याचा प्रभावही कमी झाला आहे. त्यामुळे आता शाळा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी विविध घटकांतून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने सोमवार पासून शाळा सुरू कारण्याबाबत एक प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावात राज्यातील शाळा कोरोना नियमांचे पालन करुन सुरू कराव्यात. त्या संबंधी निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आलेला आहे. या प्रस्तावावर उद्याचा मंत्री मंडळाचा बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा - Jayant Patil over election victory : निवडणुकांचे निकाल पाहता राष्ट्रवादी राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला - जयंत पाटील

शाळे संबंधित मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील -

शालेय शिक्षण विभागाने तयार केल्या प्रस्ताव बाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, सध्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन आणि भविष्यातील धोक्यांचाही विचार करुन एसओपी नियमांची आखणी केली आहेत. त्यात आणखी काही नियमाची भर घालावी लागणार आहे. शेवटी मुलांचे आरोग्य आणि सुरक्षितता हे आमची भूमिका आहे. म्हणून त्या संबंधीचे अधिकार हे स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून सतत शाळा सुरू-बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे.

सध्या राज्यात कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेतात कोविड मुक्त काही जिल्ह्यांमध्ये मध्यंतरी शाळा सुरू झाल्या होत्या. त्याच पद्धतीने पुन्हा एकदा कोविड मुक्त गावात किंवा भागात शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव आहेत. हा प्रस्ताव सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आलेला आहे. यासंबंधीत मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, अशी अपेक्षा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.

Last Updated :Jan 19, 2022, 7:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.