ETV Bharat / city

Jayant Patil over election victory : निवडणुकांचे निकाल पाहता राष्ट्रवादी राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला - जयंत पाटील

author img

By

Published : Jan 19, 2022, 4:52 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत मतदान केल्याबद्दल राज्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आभार मानले आहेत. जयंत पाटील ( NCP leader Jayant Patil ) म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा ( Rashtrawadi Pariwar Sanvad ) करून तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. पक्षाच्या बांधणीसाठी विविध उपक्रमे, आंदोलने, कार्यक्रमे हाती घेतली होती.

जयंत पाटील
जयंत पाटील

मुंबई - राज्यातील बहुतांश नगरपंचायत निवडणुकांचे निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागले आहेत. हे निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरल्याची ( NCP become numbe one party in MH ) प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil on NCPs victory in election ) यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत मतदान केल्याबद्दल राज्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आभार मानले आहेत. जयंत पाटील म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा ( Rashtrawadi Pariwar Sanvad ) करून तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. पक्षाच्या बांधणीसाठी विविध उपक्रमे, आंदोलने, कार्यक्रमे हाती घेतली होती.

हेही वाचा-AAP Goa CM Candidate : 'भष्ट्राचारमुक्त गोव्याची हमी देतो'; जाणून घ्या... कोण आहेत अमित पालेकर?

जनता दरबार उपक्रमातून जनतेची कामेही तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचाही फायदा या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाला आहे. या निकालांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलणाऱ्यांना चांगलीच चपराक लागली आहे. पक्षासाठी सदैव काम करणाऱ्या, पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करताना सर्व कार्यकर्त्यांचे जयंत पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा- NCP Shivsena Allience in GOA Election : गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती; उत्पल पर्रिकरांबाबत संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.