President Police Medal : देवेन भारतींसह राज्यातील ४ पोलीसांना राष्ट्रपती पोलीस पदक; महाराष्ट्राला ७४ पदके

President Police Medal : देवेन भारतींसह राज्यातील ४ पोलीसांना राष्ट्रपती पोलीस पदक; महाराष्ट्राला ७४ पदके
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा झाली आहे. यात महाराष्ट्रातील एकूण 74 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यात मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह चार पोलीस अधिकाऱ्यांनाही राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.
मुंबई : त्याचप्रमाणे राज्यातील 31 पोलिसांची पोलीस शौर्यपदक, 39 पोलीस अधिकाऱ्यांची पोलीस पदकसाठी निवड करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली.
चार पोलिसांना राष्ट्रपती पदक - उद्या प्रजासत्ताक दिनी राज्यातील चार पोलिस अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने सन्मानित केलं जाणार आहे. राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह, मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक (वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई) संभाजी देशमुख आणि ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांचा समावेश आहे.
गुणवंत पोलीस पदक : यासह नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर आणि परिक्षेत्रातील सुखदेव मुरकुटे यांना गुणवंत पोलीस पदक जाहीर झालं आहे. राज्यातील 31 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदाकाने सन्मानित केलं जाणार आहे.
कोणाला राष्ट्रपती पोलीस पदक? : उद्या 74 व्या प्रजासत्ताक दिनी राज्यातील चार अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात येणार आहे. राष्ट्रपती पोलीस पदक मिळवलेल्या चार पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह, मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक (वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई) संभाजी देशमुख आणि ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांचा समावेश आहे. तसेच 31 अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
हेही वाचा - Republic Day High Alert : प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट, मुंबई पोलीस सतर्क
