ETV Bharat / state

PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी, दुपारी वंदे भारत एक्सप्रेसला दाखवणार हिरवा झेंडा

author img

By

Published : Feb 10, 2023, 11:30 AM IST

Updated : Feb 10, 2023, 1:06 PM IST

PM Narendra Modi Mumbai Visit
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर, स्वागतासाठी जय्यत तयारी

मुंबई : मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर अशा दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर तिथेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी भारतीय जनता पक्षाने देखील संपूर्ण मुंबईवर बॅनरबाजी केलेली पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमा सोबतच सांताक्रुज चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपास प्रकल्प या दोन प्रकल्पाचे लोकार्पण देखील पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे. तसेच मुंबईतील अल्जामिया-तुस-सैफियाहच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटनही करणार आहेत.

  • #WATCH | Two Vande Bharat Trains are starting today. Thanks to PM Modi for giving a gift to the residents of Mumbai, Pune, Nashik & devotees of Shirdi Sai Baba & Trimbakeshwar: Railways Minister Ashwini Vaishnaw on PM Modi to flag off 2 Vande Bharat trains in Mumbai today pic.twitter.com/wFFW34ys70

    — ANI (@ANI) February 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

स्वागतासाठी संपूर्ण मुंबईभर बॅनरबाजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने मुंबईवर पोलीस बंदोबस्त देखील चोख करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा दुपारी असला तरी आज सकाळपासूनच मुंबईची सुरक्षा व्यवस्था अगदी चोख करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्रवेशद्वारावर आणि आजूबाजूच्या परिसरात मोठा पोलीस फाटा साईनाथ असलेला पाहायला मिळत आहे. तसेच पंतप्रधानांच्या स्वागतासाठी संपूर्ण मुंबईभर बॅनरबाजी केलेली देखील पाहायला मिळते.


कसा असणार पंतप्रधानांचा मुंबई दौरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुपारी २.३० वाजता मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे. तिथून थेट हेलिकॉप्टरने पंतप्रधान आयएनएस शिक्रा हेलिपॅडवर जाणार आहेत. तीन वाजताच्या दरम्यान पंतप्रधान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचतील. ३.३० वाजताच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्लॅटफॉर्म नंबर 18 वर जातील. दुपारी चार वाजताच्या दरम्यान पंतप्रधान वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे. त्याआधी वंदे भारत ट्रेनबाबत प्रेझेंटेशन दिले जाईल. पंतप्रधान वंदे भारत ट्रेनमध्ये लहान मुलांबरोबर संवाद साधणार आहेत.

ऑलझकेरिया ट्रस्ट सैफी नवीन कॅम्पसचे उद्घाटन : उद्घाटनाच्या कार्यक्रमातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण होईल. जवळपास साडेचारच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण होईल. त्यानंतर पंतप्रधान गाडीने आयएनएस शिक्रावर पोहोचणार आहे. तेथून हेलिकॉप्टरने पंतप्रधान विमानतळावर जातील. विमानतळावरून गाडीने अंधेरी मरोळ येथे पंतप्रधान जाणार आहेत. मरोळला जवळपास ५.३० च्या दरम्यान ऑलझकेरिया ट्रस्ट सैफी नवीन कॅम्पसचे उद्घाटन करतील. कार्यक्रमानंतर पुन्हा गाडीने पंतप्रधान मुंबई विमानतळावर पोहोचतील आणि त्यानंतर विमानाने दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहेत.



हेही वाचा : PM Modi In Mumbai : पंतप्रधानांच्या हस्ते अरबी अकादमीच्या नवीन कॅम्पसचे होणार उद्घाटन

Last Updated :Feb 10, 2023, 1:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.