ETV Bharat / state

कोरोनाची लक्षणे आढळलेल्या पोलिसाने मांडली व्यथा...पाहा व्हिडिओ

author img

By

Published : Apr 26, 2020, 9:34 PM IST

Updated : Apr 26, 2020, 11:30 PM IST

Police found Corona's symptoms shared a video
कोरोनाची लक्षणे आढळलेल्या पोलीसाने मांडली व्यथा

मुंबई पोलीस दलातील एका शिपायाने सरकारच्या गलथान कारभाराबद्दल आपली व्यथा एका व्हिडिओमार्फत व्यक्त केली आहे.

मुंबई - संपूर्ण देशासह जगात कोरोनाविरुद्ध युद्ध सुरू असताना मुंबईत मात्र पालिका प्रशासनाची पोल खोल करणारे एक दृश्य समोर आले आहे. मुंबई पोलीस दलातील एका शिपायाने सरकारच्या गलथान कारभाराबद्दल आपली व्यथा एका व्हिडिओमार्फत व्यक्त केली आहे.

कोरोनाची लक्षणे आढळलेल्या पोलीसाने मांडली व्यथा

ह्या व्हिडिओमध्ये असलेल्या पोलीस शिपायाचे म्हणणे आहे, की मागच्या बुधवारपासून त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती. त्यांनतर पोलिसांसाठी असलेल्या रुग्णालयात गेले असता तेथील प्रशासनाने त्यांची रवानगी केईम रुग्णालयात केली. तेथील डॉक्टरांनी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. परंतु, तिथे पोहोचल्यावर आणि भीषण परिस्थिती पाहता ही सर्व व्यथा ह्या कोरोना वॉरियरने व्हिडिओ रूपाने मांडली आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबई पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनाव्हायरसने बळी घेतला असून डॉक्टर,नर्सेस पाठोपाठ आता पोलिसांना सुद्धा कोरोना आपले लक्ष्य बनवत आहे.

Last Updated :Apr 26, 2020, 11:30 PM IST

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.