ETV Bharat / state

Shah Rukh Khan : लाच दिल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानलाही करा आरोपी; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

author img

By

Published : Jun 12, 2023, 6:12 PM IST

Shah Rukh Khan
शाहरुख खान

समीर वानखेडे प्रकरणात लाच दिल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खान विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. कायद्यानुसार लाच घेणारा आणि देणारा दोघेही दोषी असतात, असे याचिकेत म्हटले आहे.

मुंबई : अभिनेता शाहरुख खान विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. समीर वानखेडे प्रकरणात शाहरुख खान यालाही आरोपी करण्यात यावे, या मागणीसाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. अ‍ॅडव्होकेट निलेश ओझा यांनी ही याचिका दाखल केली आहे.

'लाच देणारा ही दोषी असतो' : समीर वानखेडे प्रकरणात सीबीआयने देखील गुन्हा दाखल केला आहे. त्या एफआयआर मध्ये शाहरुख खान याने 50 लाख रुपये लाच दिल्याचा उल्लेख आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार लाच घेणारा आणि देणारा दोघेही दोषी असतात, त्यामुळे जर शाहरुख खान याने लाच दिली तर त्यालाही आरोपी करण्यात यावं, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.

शाहरुख खानकडे 25 कोटी रुपयांची लाच मागितली : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान कॉर्डेलिया जहाजावर पार्टी करत असताना तेथे एनसीबीने धाड टाकली होती. तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात ही धाड टाकण्यात आली होती. एनसीबीने आर्यन खानवर ड्रग्जच्या वापराचे आरोप ठेवले होते. या प्रकरणी त्याला तुरुंगातही जावे लागले होते. आर्यन खानला तुरुंगातून सोडण्यासाठी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानकडे 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

एनसीबी, सीबीआयकडून एकत्रित गुन्हा दाखल : कोट्यावधींची लाच व बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी एनसीबी आणि सीबीआय यांनी समीर वानखेडेंवर एकत्रित गुन्हा नोंदवलेला आहे. समीर वानखेडे यांनी मात्र हा आरोप नाकारला आहे. आपल्यावरील एफआयआर रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी न्यायालयात केली होती. मात्र न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली आहे. या प्रकरणी 23 जून पुढील सुनावणी होणार आहे.

हे ही वाचा :

  1. Sameer Wankhede Bribe Case: सॅम डिसूजाला अटकेपासून संरक्षण नाहीच, चौकशीला सामोरे जाण्याचे हायकोर्टाचे आदेश
  2. Sameer Wankhede Case: समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ? क्रुझ ड्रग पार्टीमध्ये मुंबई बेलाड पियर दंडाधिकारी यांचा सहभाग- न्यायालयात गौफ्यस्फोट
  3. Shahrukh Khan Extortion case: समीर वानखेडे यांना 23 जूनपर्यंत अटक करता येणार नाही- मुंबई उच्च न्यायालय
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.