ETV Bharat / state

NCP Iftar Party : इफ्तार पार्टीला पवार कुटुंबीयांची उपस्थिती; पाहा व्हिडिओ

author img

By

Published : Apr 18, 2023, 9:23 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इस्लामिक जिमखाना येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या इफ्तार पार्टीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे जेष्ट नेते छगन भुजबळ यांच्यासह अजिप पवार यांनी हजरी लावली.

NCP President Sharad Pawar
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

संविधान, कायदा सुव्यवस्थेची पायमल्ली - शरद पवार यांचे प्रतिपादन

मुंबई : अजित पवार भाजपाच्या वाटेवर असल्या संदर्भात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिल्यानंतर संध्याकाळी पक्षाच्यावतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या इफ्तार पार्टीला पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी आवर्जून उपस्थिती लावली. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार अशा पद्धतीचा चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार काही आमदारांची जुळवाजुळव करत आहेत अशा पद्धतीच्या चर्चा सुरू होत्या याला अन्य राजकीय पक्षांमधूनही मोठ्या प्रमाणात हवा देण्यात आली. मात्र अजित पवार यांनी हे पहिल्यातील वादळ ठरवत दुपारी पत्रकार परिषद घेऊन या सर्व चर्चेवर पडदा टाकला. आपण पक्षातच आहोत आणि जिवात जीव असेपर्यंत पक्षातच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इफ्तार पार्टीला पवारांची उपस्थिती : दरम्यान अजित पवार यांच्या या सर्व चर्चा नाट्य नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इस्लामिक जिमखाना येथे रमजान निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या इफ्तार पार्टीला शरद पवार उपस्थित राहतात का अजित पवार उपस्थित राहतात का या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होते किंवा दोघांची काय देहबोली आहे यासंदर्भामध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र या इफ्तार पार्टीला पक्षाचे नेते शरद पवार यांच्या सह अजित पवार, सुप्रिया सुळे छगन भुजबळ अनिल देशमुख दिलीप वळसे पाटील विद्या चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.

संविधान आणि कायदा सुव्यवस्थेची पायमल्ली : दरम्यान यावेळी बोलताना पक्षांतर्गत भोजपुरी अथवा अजित पवार यांच्या संदर्भात कोणतेही भाष्य न करता देशांमध्ये केंद्रीय यंत्रणांनी अनावश्यक कारवाया सुरू केल्या आहेत. संविधानाची पायलबल्ली होत आहे. कायदा सुव्यवस्था आपल्या मर्जीप्रमाणे राबवली जात आहे. हेच योग्य चित्र आहे असे भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे देशासाठी आणि लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

हेही वाचा - Ajit Pawar Criticized CM : अजित पवारांनी महाराष्ट्र भूषण कार्यक्रमावरुन शिंदे सरकारला फटकारले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.