ETV Bharat / state

Sharad Pawar : लोकसभेच्या तयारीसाठी शरद पवार अ‍ॅक्शन मोडवर; राष्ट्रवादीकडून बैठकांचे सत्र

author img

By

Published : May 30, 2023, 9:38 PM IST

Updated : May 30, 2023, 10:14 PM IST

देशात लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. अशातच भाजप-शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे गट या सर्व पक्षातील जागावाटप कशाप्रकारचे असणार आहे यावर चर्चा रंगू लागल्या आहेत. प्रमुख नेत्यांच्या उपस्थित महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष बैठका घेत आहेत. मंगळवारी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली.

Sharad Pawar
शरद पवार

जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

मुंबई : लोकसभा निवडणूक तयारीच्या अनुषंगाने मंगळवारी राष्टवादी काँगेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्तित पक्ष कार्यलयात 1 वाजता बैठकीला सुरवात झाली. प्रफुल पटेल, विरोधीपक्ष नेता अजित पवार,प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील जेष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अशा प्रकारची बैठक बुधवारी देखील असणार आहे. 2019 साली राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने लढलेल्या 22 लोकसभा मतदारसंघातील आढावा घेतला जाणार आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत 9 मतदार संघातील मतदारसंघातील आढावा घेण्यात आला. यात प्रमुख पदाधिकारी यांच्याकडून जमेच्या बाजू, कोठे पडतो कमी, काय केले पाहिजे अशा अनेक गोष्टीवर चर्चा करण्यात आली.

Lok Sabha Elections
विविध पक्षांना मिळालेल्या जागा

कोणत्या मतदार संघातील घेतला आढावा : नाशिक, कोल्हापूर, अहमदनगर, महाड, सातारा, परभणी, बीड, उस्मानाबाद, दिंडोरी, बैठकीत विद्यमान आमदार, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष उपस्थितीत होते.


सुवर्णपदक मिळालेल्या महिला, पुरुष खेळाडूंनावर पोलीसंकडून गैरवर्तन केले गेले ही लाजरवानी गोस्ट आहे. सर्व खेळाडू आज देशातील सरकारचे निषेध करत आहेत. इतिहासातील ही पहिली घटना म्हणता येईल महिला खेळाडूंना अशा प्रकारे वागणूक दिली गेली, राष्ट्रवादी पक्षाकडून आम्ही निषेध व्यक्त करतो.- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 2019 साली ज्या मतदार संघात उमेदवार उभे केले होते. त्या मतदार संघातील कार्यकर्त्यांकडून सविस्तर माहिती घेण्यासाठी आज उदया देखील बैठक असणार आहे. काही मतदार संघातील लोकांशी सविस्तर चर्चा केली. काही मतदार संघ बाबत उद्या चर्चा करण्यात येणार आहे. लोकांना, कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याची छोटी प्रक्रिया सुरु आहे. सद्या मतदार संघात काय स्तिथी? त्याचा काय परिणाम होऊ शकतो यावर चर्चा झाली. तयारी कोठे करायची याबाबत अजून ठरवलेले नाही. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सध्या आपापल्या पक्षातील बैठका घेत आहे. त्या पुढील आठवड्यापर्यंत आटोपतील त्यानंतर तिन्ही पक्षांची लवकरात लवकर एकत्र बैठक होईल.


शिंदे गटातील खासदार भाजपच्या तिकिटावर लढले तर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील विद्यमान खासदार त्यांच्या पक्षातून लढण्यास इच्छुक नसून ते भाजपाच्या तिकिटावर लढण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शिंदे गटाची पंचायत झाली आहे. तसे झाले तर शिंदे गटासोबत केलेले शिवसैनिक परत उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जाण्याची शक्यता असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

इंडीक टेल्स आणि हिंदू पोस्ट या वेबसाईट बाबत : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अवमान प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ उद्या बुधवार सकाळी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे. तसेच ते इंडीक टेल्स आणि हिंदू पोस्ट या वेबसाईटवर कारवाई करण्याची मागणी करणार. या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी जलसंपदा मंत्री, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते खासदार सुनिल तटकरे आदी प्रमुख नेते भेट घेणार आहेत.

हेही वाचा - Ajit Pawar on Seat Allocation: कुठल्याही पक्षाकडे मोदींविरोधात लढण्यासाठी ताकद नसल्याने...अजित पवारांचे जागा वाटपाबाबत स्पष्ट वक्तव्य

Last Updated : May 30, 2023, 10:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.