ETV Bharat / state

Nashik Drug Racket : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, नाशिकमधील फॅक्टरीतून ३०० कोटींचं ड्रग्ज जप्त

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 11:01 PM IST

Nashik Drug Racket : मुंबई पोलिसांनी नाशिक येथील फॅक्टरीवर छापा टाकून ३०० कोटीचं ड्रग्ज जप्त केलं. पोलिसांनी या प्रकरणी १२ आरोपींना अटक केली आहे.

Nashik Drug Racket
Nashik Drug Racket

सहाय्यक पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी

मुंबई Nashik Drug Racket : मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी गुरुवारी (६ ऑक्टोबर) रात्री नाशिक येथील फॅक्टरीवर छापा टाकून ३०० कोटींच्या अमली पदार्थासह आरोपीला अटक केली. झिशान इक्बाल शेख असं आरोपीचं नाव आहे.

सापळा रचून अटक केली : ८ ऑगस्टला साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही जण एमडी ड्रग्जची विक्री करत असल्याची माहिती साकीनाका पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अन्वर सय्यद (वय ४२) याला १० ग्रॅम एमडीसह अटक केली. या अटकेनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यानंतर जावेद अयुब खान (वय २७ ) आसिफ नाशीर सेख (वय ३०), इकबाल मोहम्मद अली (वय ३०), सुंदर राजन शक्तीवेल (वय ४४), हसन सुलेमान सेख (वय ४३), आरिफ नासिर सेख (वय ४२), आयुब अब्दुल सत्तार सय्यद (वय ३२), नासिर उमर सेख उर्फ़ चाचा (वय ५८), अजहर असमत अंसारी (वय ३२) आणि रेहान आलम सुलतान अहमद अंसारी (वय २६) यांना जे जे मार्ग, कल्याण शिळफाटा आणि नाशिक अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली.

कारखान्यात १३३ किलो ड्रग्ज सापडलं : अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली असता पोलिसांना नाशिक येथील शिंदे गाव येथं असलेल्या फॅक्टरीबाबत माहिती मिळाली. या फॅक्टरीवर छापा टाकण्यासाठी साकीनाका पोलिसांचे पथक १५ ते २० दिवस नाशिक रोडवर ठाण मांडून बसलं होतं. साकीनाका पोलिसांनी २० दिवसांच्या प्रयत्नानंतर नाशिकमधील ड्रग्ज फॅक्टरी गाठली. येथून ड्रग्जचा पुरवठा केला जात होता. नाशिकमधील या कारखान्यात १३३ किलो ड्रग्ज सापडलं असून, कारखान्याचा चालक झिशान शेख याला अटक करण्यात आली आहे.

ड्रग्जची किंमत ३०० कोटी रुपये : या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असताना अन्वर सय्यद, जावेद खान, आसिफ शेख, इक्बाल मोहम्मद अली, सुंदर शक्तीवेल, हसन शेख, आरिफ शेख, अयुब सय्यद, नासिर शेख, अझहर अन्सारी, रेहान आलम अन्सारी आणि जीशान शेख यांना अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान एकूण १५१ किलो एमडी जप्त करण्यात आलं. जप्त केलेल्या एमडी ड्रग्जची किंमत ३०० कोटी रुपये आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परम जीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त भरतकुमार सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार साकीनाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पुलिस निरीक्षक गबाजी चिमटे यांच्या पथकानं कारवाई केली.

हेही वाचा :

  1. Drugs Factory Destroyed : ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या भावाचा ड्रग्ज कारखाना उध्वस्त; १३५ किलो एम डी ड्रग्ज जप्त
  2. Govt Officials Fake FB Account : शाहरुख खानचा कारनामा; शासकीय अधिकाऱ्यांचे बनावट अकाउंट बनवून फसवणूक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.