ETV Bharat / state

Govt Officials Fake FB Account : शाहरुख खानचा कारनामा; शासकीय अधिकाऱ्यांचे बनावट अकाउंट बनवून फसवणूक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 4:55 PM IST

Govt Officials Fake FB Account : गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. (Accused arrested for making fake Fb Account) बनावट अकाऊंट बनवून विविध वस्तू विक्रीच्या नावाखाली पैसे घेऊन फसवणूक केल्याची घटना घडत आहे. (Fraud from fake facebook account) अशातच शासकीय अधिकाऱ्यांचे बनावट अकाउंट (Pune Cyber crime) बनवून फसवणूक करणाऱ्या शाहरुख खान नावाच्या आरोपीस पुण्याच्या सायबर पोलिसांनी राजस्थान मधून अटक केली आहे. (Pune Crime)

Govt Officials Fake FB Account
बनावट अकाउंट बनवून फसवणूक

आरोपीने कशाप्रकारे आर्थिक फसवणूक केली याविषयी सांगताना पोलीस अधिकारी

पुणे Govt Officials Fake FB Account : पुणे सायबर पोलिसांनी शाहरुख खान या आरोपीला राजस्थानमधून अटक केली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह देशातील इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या नावाने बोगस फेसबुक अकाउंट तयार केल्याचा आरोप शाहरुख खानवर आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावाने बनावट अकाउंट तयार करून आरोपी शाहरुख खानने एका पत्रकाराकडून ७० हजार रुपये उकळले होते. याप्रकरणी फिर्यादीने सायबर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती.

आरोपीला राजस्थानमधून अटक : याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादींना पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावाने फेसबुक रिक्वेस्ट आली. राजेश देशमुख बोलत असल्याचे भासवून त्यांचा मित्र संतोष कुमार, सीआरपीएफ मध्ये कार्यरत असून त्यांचे जुने फर्निचर कमी किमतीत विकत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन झाल्यानंतर आरोपीने जुने फर्निचर विकत घेण्यासाठी ७०,००० रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी रक्कम आरोपीने दिलेल्या बँक अकाऊंटवर ट्रान्सफर केली. काही दिवस झाल्यावर आरोपीकडून फर्निचर पाठविण्यात आले नाही आणि हे सगळं प्रकरणी बोगस आहे असं कळताच फिर्यादींनी पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. पोलिसांनी याचा तपास करत आरोपी शाहरुख खान याला राजस्थान मधून अटक केली. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

अनेक IPS आणि IAS अधिकाऱ्यांच्या नावे बनावट अकाउंट : पुणे सायबर पोलिसांनी राजस्थान मधील अलवर या ठिकाणी पथक पाठवून राजस्थान बहादूरपूर गावातून शाहरुख खानला अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने देशातील अनेक IPS आणि IAS अधिकाऱ्यांचे बनावट प्रोफाइल फेसबुकवर बनवून लाखो रुपये उकळले असल्याची कबुली दिली आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

खात्री करूनच व्यवहार करा : याबाबत डीसीपी श्रीनिवास घाडगे म्हणाले की, समाजात ज्या व्यक्तीची आस्था आहे अशा व्यक्तीच्या नावाने हे लोक बनावट अकाऊंट तयार करतात. यानंतर मदतीचा हात किंवा जवळच्या व्यक्तीला काही साहित्य विक्री करायचे आहे असं सांगितलं जातं. मग त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. असाच हा प्रकार असून नागरिकांनी खात्री केली पाहिजे; मगच व्यवहार केलं पाहिजे असं यावेळी घाडगे म्हणाले.

हेही वाचा:

  1. Cyber Fraud : देवेंद्र फडणवीसांच्या खासगी सचिवाच्या नावे सायबर फ्रॉड; आरोपीला मिरजमधून अटक
  2. Sexual Assault With Animal : लैंगिक भूक भागवण्यासाठी रेडकावर करायचा अनैसर्गिक अत्याचार; वाचा कसं फुटलं बिंग
  3. Whale Vomit Smuggling: व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना भिवंडीत पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.