ETV Bharat / state

Mumbai Rape Case : धक्कादायक, बलात्कारानंतर मानसिक आजारानं ग्रस्त पीडितेचा मृत्यू, आरोपीला न्यायालयानं ठोठावली दहा वर्षांची कोठडी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 1:47 PM IST

Mumbai Rape Case : मानसिक आजारानं ग्रस्त असलेल्या 19 वर्षीय तरुणीवर एका नराधमानं बलात्कार केल्यानं मुंबईत खळबळ उडाली होती. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं अत्याचारी नराधमाला 10 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

Mumbai Rape Case
संग्रहित छायाचित्र

मुंबई Mumbai Rape Case : मानसिक आजारानं ग्रस्त महिलेवर नराधमानं बलात्कार ( Mumbai Rape Case ) केल्यानंतर काही दिवसांनी पीडितेचा मृत्यू झाला. मात्र प्रत्यदर्शीची साक्ष ग्राह्य धरत मुंबई सत्र न्यायालयानं या नराधमाला 10 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. 'साक्ष देण्याची गरज नाही, इतका निंदनीय अपराध केला' असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश प्रिया बनकर यांनी या नराधमाला 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

मानसिक आजारानं ग्रस्त तरुणीवर बलात्कार : मुंबईमध्ये 19 वर्षाची तरुणी एकटी रस्त्यावर राहत होती. तिच्यावर 2021 मध्ये एका नराधमानं बलात्कार केला. ती तरुणी अगोदरच विविध मानसिक आजारांनी त्रस्त होती. तिच्या आजाराचा आणि एकटेपणाचा फायदा उचलत नराधमानं तिच्यावर बलात्कार केला. मात्र यामुळे तिच्यावर मोठा आघात झाला. आधीच मानसिक आजारी त्यात बलात्कार झाल्यानं काही काळानंतर पीडितेचं निधन झालं.

चित्रपटगृहाच्या मागं रात्री केलं कुकर्म : मुंबईतील घटाकोपर उपनगरात 2021 मध्ये नराधमानं बलात्कार केल्याची घटना घडली होती. घाटकोपरमध्ये चित्रपट गृहाच्या मागं रात्री पीडितेला नराधमानं एकटं गाठलं. तिच्या आजूबाजूला कोणीही नव्हतं, रात्रीची वेळ असल्यानं वर्दळदेखील अत्यंत कमी झाली होती. त्यामुळे आडमार्गावर या नराधमानं पीडितेवर बलात्कार केला.

प्रत्यक्षदर्शीनं घेतली पोलीस ठाण्यात धाव : या नराधमानं पीडितेवर अत्याचार केल्याची घटना एका प्रत्यदर्शीनं पाहिली होती. त्यामुळे या प्रत्यक्षदर्शीनं थेट पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणी दोन पथकं तयार करुन नराधमाचा शोध घेतला. घटनास्थळी पाळतदेखील ठेवली, त्यानंतर पोलिसांनी नराधमाला अटक करुन खटला दाखल केला होता.

बलात्कारानंतर काही दिवसांनी पीडितेचा झाला मृत्यू : मुंबई सत्र न्यायालयामध्ये खटला दाखल होण्यापूर्वीच नेतील पीडितेचा मृत्यू झाला. परंतु एका व्यक्तीनं घटना प्रत्यक्ष पाहून तक्रार दिली होती. त्यामुळे पोलिसांनी साक्षीदारांना न्यायालयामध्ये उभं केलं. पीडितेचा मृत्यू झाला असेल, मात्र घटनेची सत्यता तक्रारदाराच्या साक्षीनं समोर येते. आरोपीच्या कृत्याबाबत पुष्टी मिळत असून त्याचा न्यायालयानं गंभीर विचार केला. न्यायालयानं पीडितेच्या मावशीला देखील साक्ष देण्यासाठी न्यायालयात आणलं. पीडितेवर मानसिक आजारी असल्यानं वैद्यकीय उपचार सुरू होते. तिला कोणी सोबत असल्याशिवाय काहीच कळत नसे, असं त्यांनी न्यायालयात सांगितलं. त्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रिया बनकर यांनी "फिर्यादीची साक्ष देण्याची देखील गरज नाही"असं म्हणत आरोपीला दहा वर्षाची कोठडीची शिक्षा सुनावली.

हेही वाचा :

  1. Mentally Challenged Girl Raped : मुंबईत मतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी अटकेत, जेवणाच्या बहाण्याने घरी बोलवून करायचा अत्याचार
  2. Minor Girl Rape in Mumbai : धक्कादायक : 7 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.