ETV Bharat / state

Mumbai Railway Megablock : मुंबईकरांनो लोकलनं प्रवास करताय? जाणून घ्या, मेगाब्लॉकचं वेळापत्रक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2023, 3:27 PM IST

Updated : Oct 22, 2023, 9:38 AM IST

Mumbai Railway Megablock : मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर साप्ताहिक देखभाल दुरुस्तीची कामं करण्यासाठी मेगाब्लॉक करण्यात येणार आहे. (Central and Western Suburban Railways) मध्य रेल्वेवर रात्रीच्या वेळी ब्लॉक करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या पाचव्या सहाव्या मार्गिकेसाठी शनिवारी रात्री, तर हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा मेगाब्लॉक करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. (Mega block on Harbor and Western Railway)

Mumbai Railway Megablock
मेगाब्लॉक

मुंबई : Mumbai Railway Megablock : मेगा ब्लॉक दर आठवड्याला मुख्यत्वे रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर करण्यात येतो. त्यातही पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवासी मेगाब्लॉकच्या बाबतीत भाग्यवान म्हणायला हवेत. कारण पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉकचं प्रमाण कमी आहे. अभियांत्रिकी, यांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामं या मेगाब्लॉकच्या काळामध्ये केली जातात. शनिवारी मध्यरात्रीपासून म्हणजेच रात्री एक ते पहाटे चार वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी मध्यरात्री आणि रविवारी पहाटे प्रवास करत असताना या वेळापत्रकाचा विचार आणि नियोजन करूनच प्रवास करावा.


  • हार्बर मार्गावर सकाळी 10 पासून मेगाब्लॉक: हार्बर मार्गावरील ब्लॉगचा रविवारचा मेगाब्लॉक सकाळी दहा वाजता पासून ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत आहे. या दरम्यान, ट्रान्स हार्बर मार्गावरून मुख्य मार्गावर देखील प्रवास करण्याची परवानगी मध्य रेल्वेने प्रवाशांना दिलेली आहे. मध्य हार्बर रेल्वे मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्ग येथे मेगाब्लॉकचा कालावधी वेगवेगळा आहे.


  • पश्चिम रेल्वेच्या मार्गावर मेगाब्लॉक: पश्चिम रेल्वेवर गोरेगाव रेल्वे स्थानक ते विरारच्या दिशेला बोरिवली रेल्वे स्थानक आणि गोरेगावच्या दिशेला जलद मार्गावर हा मेगाब्लॉक आहे. त्या ठिकाणी देखभाल आणि दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत. रविवारी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हा पश्चिम रेल्वे वरील मेगाब्लॉक असेल.


  • हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक: हार्बर मार्गावरील मानखुर्द रेल्वे स्थानकापासून ते नेरुळ रेल्वे स्थानकापर्यंत अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील मेगाब्लॉक असेल. रविवारी सकाळी 11:15 पासून ते दुपारी 4 वाजून 15 मिनिटापर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे.

  • मध्य रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक: तर मध्य रेल्वेवर ठाणे रेल्वे स्थानकापासून कल्याणच्या दिशेने धावणारी पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेवर मेगाब्लॉक असेल. शनिवारी मध्यरात्री एक वाजेपासून तर रविवारी पहाटे चार वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी दिलेली आहे.

हेही वाचा:

  1. Yamuna Expressway Accident : यमुना एक्सप्रेस वे वर भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू
  2. Ahmednagar Burning Train Fire Video : अहमदनगरमध्ये 'द बर्निंग ट्रेनचा थरार'; पाहा धगधगत्या आगीचा व्हिडिओ...
  3. Train Accident Conspiracy Foiled: मोठी दुर्घटना टळली, रेल्वे रुळावर आढळले मोठं मोठे दगड
Last Updated :Oct 22, 2023, 9:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.