ETV Bharat / state

Raped On Doctor Woman : महिला डॉक्टरवर नराधमाचा बलात्कार; फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन उकळले पैसे

author img

By PTI

Published : Nov 16, 2023, 11:27 AM IST

Raped On Doctor Woman : मुंबईतील एका डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन ब्लॅकमेल केल्यानं मुंबई पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. बलात्कार केल्यानंतर व्हिडिओ आणि फोटो पतीसह मित्रांना पाठवण्याची धमकी देत हा नराधम पीडितेला ब्लॅकमेल करत होता. या महिला डॉक्टरकडून या नराधमानं 3 लाख 33 हजार रुपये उकळले आहेत.

Raped On Doctor Woman
संग्रहित छायाचित्र

मुंबई Raped On Doctor Woman : महिला डॉक्टरवर नराधमानं बलात्कार करुन पीडितेला ब्लॅकमेल करुन पैसे उकळल्यानं खळबळ उडाली. ही घटना गावदेवी परिसरात घडली असून याप्रकरणी नराधमावर गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी महिला डॉक्टरवर बलात्कार करुन ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमाला अटक केली आहे.

  • बॅडमिंटन क्लबमध्ये झाली होती ओळख : पीडित डॉक्टर महिला ही आपल्या पतीसोबत झालेल्या कौटुंबीक कलहामुळे वेगळी राहते. त्यामुळे ही महिला ताडदेव परिसरात असलेल्या एका बॅडमिंटन क्लबमध्ये जात होती. या ठिकाणी तिची या 38 वर्षीय नराधमासोबत ओळख झाली होती. या ओळखीतून नराधमानं महिला डॉक्टरसोबत मैत्री केली.

भेटायला बोलावून केला बलात्कार : डॉक्टर महिला पतीपासून वेगळी राहत असल्यानं या नराधमानं तिच्याकडं तिच्या खासगी आयुष्यावर गप्पा मारायला सुरुवात केली. आपण तुमच्या वादावर तोडगा काढू, असं त्यानं तिला आश्वासन दिलं. त्यातूनच तिला भेटायला बोलावलं. या नराधमानं 20 ऑगस्टला मरीन ड्राईव्ह परिसरात असलेल्या एका क्लबमध्ये भेटल्यानंतर गप्पा मारुन मद्यपान केलं. त्यानंतर त्यानं तिला घरी सोडायला गेल्यानंतरही महिलेच्या घरी दोघांनी मद्यपान केलं. त्यानंतर दारूच्या नशेत महिला डॉक्टरवर बलात्कार केल्याचा आरोप महिलेनं केला. त्यानंतर

व्हिडिओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी : दारूच्या नशेत महिला डॉक्टरवर बलात्कार केल्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्यानं तिच्याकडं पैसे मागितले. परंतु तिनं नंतर नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या नराधमानं तिचे व्हिडिओ, फोटो आणि चॅट्स तिच्या पती आणि मित्रांना पाठवण्याची धमकी दिल्याचा दावा पीडितेनं केला. तिनं त्याला 3 लाख 33 लाख रुपये दिल्याचा आरोपही पीडितेनं केला आहे. मात्र तरीही नराधम ब्लॅकमेल करुन पैसे मागत असल्यानं तिनं पोलिसांशी संपर्क साधला. पीडित महिला डॉक्टरच्या तक्रारीवरुन नराधमाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 376, 384 अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती गावदेवी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यानं वृत्तसंस्थेला दिली आहे.

हेही वाचा :

  1. Mumbai HC On Rape Case : संमतीने लैंगिक संबंध कलम 376 नुसार बलात्कार नाही; मुंबई उच्च न्यायालयाकडून पुन्हा अधोरेखित
  2. Rape On Student : माणुसकीला काळीमा! आश्रम शाळेतील विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार
  3. Titwala Rape : टिटवाळा रेल्वेस्थानकाजवळ विवाहितेवर बलात्कार, एकाला अटक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.