ETV Bharat / state

Mumbai Corona Update : मुंबईत १५१ नवे रुग्ण, १ मृत्यूची नोंद

author img

By

Published : May 15, 2022, 7:40 PM IST

Mumbai Corona Update
मुंबई कोरोना अपडेट

मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट (The third wave of corona virus) आटोक्यात आली आहे. यामुळे रुग्णसंख्येत घट (Decrease in patients) होऊन गेले काही दिवस ५० च्या आत रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या वाढ होऊन १०० च्या वर रुग्णसंख्येची नोंद होत आहे. रविवारी १५१ नव्या रुग्णांची तर १ मृत्यूची नोंद (Death record) झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून ८८५ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत.

मुंबई: मुंबईत रविवारी १५१ नवे रुग्ण नोंदवण्यात आले ( Mumbai Corona Update ) आहेत. आज १२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६१ हजार ६१४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४१ हजार १६३ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ८८५
सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५८५५ दिवस इतका आहे.

मुंबईत सध्या एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०११ टक्के इतका आहे. मुंबईत आज नोंदवण्यात आलेल्या १५१ रुग्णांपैकी १४६ म्हणजेच ९७ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ९४४ बेड्स असून त्यापैकी २५ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहुन अधिक बेड रिक्त आहेत.


मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. १० मे रोजी १२२, ११ ला १२४, १२ ला १३९, १३ ला १५५, १४ मे ला १३१, १५ मे ला १५१ रुग्णांची नोंद झाली आहे.


हेही वाचा : 12 new AC local :खुशखबर पश्चिम रेल्वे मार्गावर उद्यापासून 12 नव्या एसी लोकल धावणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.