ETV Bharat / state

12 new AC local :खुशखबर पश्चिम रेल्वे मार्गावर उद्यापासून 12 नव्या एसी लोकल धावणार

author img

By

Published : May 15, 2022, 5:37 PM IST

प्रवाशांचा सुविधेसाठी (For convenience of passengers) मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेने (Western Railway ) सुद्धा आपल्या मार्गावर उद्यापासून 12 नवीन एसी लोकल (12 new AC local ) फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतल्याची खुशखबर (Good news ) आहे. त्यामुळे आता पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकल फेऱ्या संख्या 20 वरून 32 वर पोहचणार आहे.

Ac local
एसी लोकल

मुंबई: एसी लोकलच्या तिकीट दरात 50 टक्के कपात केल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकल मधिल प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे एसी लोकलच्या भाडे कपातीनंतर पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ झाली. मात्र एसी लोकलच्या फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना अडचण होत होती. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने शनिवारपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण, टिटवाळा आणि अंबरनाथ या स्थानकादरम्यान 12 एसी लोकल फेऱ्याची संख्या वाढविली आहे.

आता मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर एसी लोकल फेऱ्यांची संख्या 44 वरून 56 पर्यंत पोहोचलेली आहे. मध्य रेल्वेच्या निर्णयानंतर आता पश्चिम रेल्वेने सुद्धा आता उद्यापासून 12 एसी लोकल फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पश्चिम रेल्वेवर एसी सेवांची एकूण संख्या आता 20 वरून 32 पर्यंत पोहोचणार आहे.


पश्चिम रेल्वे प्रशासनाने सांगितले की पूर्वी प्रति दिवस साधारणता 1500 ते 2500 तिकिटांची विक्री होत होती. मात्र, वाढती उष्णता आणि तिकीट दराच्या कपातीमुळे प्रवासी संख्या वाढली. आता पाच हजाराहून अधिक तिकिटांची विक्री होत आहे. प्रवाशांचा हा प्रतिसाद पाहता फेऱ्यांमध्ये वाढ करणे अनिवार्य होते. त्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे.

हेही वाचा : स्मार्टफोनच्या अती वापराने तरुणांचे मानसिक आरोग्य होऊ शकते बाधित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.