ETV Bharat / state

MNS Jagar Yatra: अमित ठाकरे यांच्या जागर यात्रेला सुरुवात; 'मनसे'चे हे आंदोलन शांततेत, मात्र यापुढे...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2023, 5:35 PM IST

Updated : Aug 27, 2023, 6:14 PM IST

MNS Jagar Yatra
पळस्पे फाटा येथून मनसेच्या जागर यात्रेला सुरुवात

मुंबई- गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोकण जागर यात्रेला आजपासून सुरूवात झाली. महामार्गावरील पळस्पे फाटा येथून अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या पदयात्रेला सुरुवात झाली. (Jagar yatra started From Palaspe Phata) तर एकूण आठ टप्प्यात पदयात्रा निघणार असून, प्रत्येक टप्प्यात 15 किलोमीटरची पदयात्रा असणार आहे.

माहिती देताना अमित ठाकरे

नवी मुंबई : गेली 17 वर्ष रखडलेल्या मुंबई- गोवा महामार्गावर मनसेचे युवा नेतृत्व अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी कोकण जागर यात्रेचे आयोजन पळस्पे फाटा येथून करण्यात आले होते. या यात्रेत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, संजय घाडी यांच्यासोबत नवी मुंबई, पनवेल व उरण तालुक्यातील शेकडो मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (MNS Jagar Yatra)



एकूण आठ टप्प्यात पदयात्रा निघणार : मनसेचे नेते राज ठाकरे यांनी मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल नाराजी व्यक्त करत मनसे सैनिकांना जनहितार्थ आंदोलन सुरू करण्याचे आदेश दिले. त्याचा दुसरा भाग म्हणून कोकण जागर यात्रेचे आयोजन हे रविवारी पळस्पे फाटा ते खारपाडा येथे करण्यात आले. तर या आंदोलनाचे नेतृत्व अमित ठाकरे यांनी केले. मुंबई-गोवा महामार्गाच्या संथ गतीने चाललेल्या कामासंदर्भात मनसे रस्त्यावर उतरले आहेत. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जागर यात्रेला सुरूवात झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल तालुक्यातील पळस्पे फाटा येथून अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेला सुरुवात झाली आहे.


मुंबई गोवा महामार्गाचा संथगतीने सुरू असलेला कारभार पाहता, नागरिकांच्या मनात राग आहे. गेल्या 17 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्णत्वास गेले नाही. रस्ते बांधायला सरकारला 17 वर्ष लागतात का? मनसेचे आजचे आंदोलन आता शांततेत होत आहे. मात्र, यापुढे आंदोलन झाले तर कसे होईल याबाबत काहीच सांगू शकत नाही - अमित ठाकरे, मनसे नेते



मुंबई-गोवा महामार्गावर 2500 लोक मृत्युमुखी : या गणपतीपर्यंत अथवा वर्षअखेरपर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. मात्र प्रशासनाने आपला शब्द पाळला नाही तर नागरिकांचा संताप तुम्हाला नक्की दिसेल असेही व्यक्तव्य, अमित ठाकरेंनी केले. त्याचबरोबर मुंबई गोवा महामार्गावर आत्तापर्यंत 2500 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. या लोकांच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार? त्यांच्यासाठी रस्त्यावर का नाही उतरायचे? असा प्रश्न अमित ठाकरेंनी प्रशासनाला विचारला आहे. मनसे आगोदर हात जोडून आंदोलन करत होते, नंतर हात सोडून आंदोलन करत आहे. असेही अमित ठाकरेंनी म्हटले आहे.

हेही वाचा -

  1. Amit Thackerays Padyatra : मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावरून अमित ठाकरेंची पदयात्रा सुरू, मनसेचे अनेक कार्यकर्ते सहभागी
  2. Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं; मनसेचा आरोप
  3. Mumbai Goa Highway : कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-गोवा महामार्गावरील एक लेन 'या' तारखेपर्यंत होणार पूर्ण
Last Updated :Aug 27, 2023, 6:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.