ETV Bharat / state

Ashish Shelar on Uddhav Thackeray : कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प उद्धव ठाकरेंमुळे पाकिस्तानात?

author img

By

Published : Jul 29, 2023, 4:55 PM IST

Updated : Jul 29, 2023, 6:56 PM IST

Ashish Shelar Criticize Uddhav Thackeray
आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका

कोकणातील नाणार येथे होणारा रिफायनरी प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प होता. मात्र तो प्रकल्प आता पाकिस्तानला जाण्याची शक्यता आहे. एवढा मोठा प्रकल्प पाकिस्तानला गेला, तर महाराष्ट्राचे मोठे नुकसान होणार असून उद्धव ठाकरे याला जबाबदार आहेत, असा आरोप मुंबई भाजपा प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे.

आशिष शेलार यांची प्रतिक्रिया

मुंबई : कोकणातील नाणार येथे होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सातत्याने विरोध केला आहे. त्यामुळे हा प्रकल्प इथे होऊ शकला नाही. कोकणातील नागरिकांना मिळणारा रोजगारही मिळाला नाही. आता हा प्रकल्प देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करीत आहे. या प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी आरामको या तेल कंपनीने आता पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केल्याचे समजते आहे. दहा अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर पाकिस्तान, सौदी अरेबियाने स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली आहे, असे अशी शेलार म्हणाले.

  • ◆ कोकणातील नाणार येथे होणारा देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करीत आहे.
    ◆ या प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी अराम्कोने या तेल कंपनीने आता पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केली आहे.
    ◆ १० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या… pic.twitter.com/bClTAg5SJr

    — Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

उबाठा गटाने महाराष्ट्राचे नुकसान केले : गेली सहा वर्ष कोकणातील नानार येथे रिफायनरीला विरोध करणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने कोकण, महाराष्ट्र, देशाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. हा प्रकल्प भारताला मिळू नये म्हणून ज्या आंतरराष्ट्रीय शक्ती काम करत आहेत. त्या नानार विरोधी आंदोलनात तर सहभागी नव्हत्या ना? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. देशविरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींशी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची हात मिळवनी तर नव्हती ना? असा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने नाणारला विरोध करून सरळ सरळ पाकिस्तानला मदत केली आहे. महाराष्ट्रातील कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प पाकिस्तानला जाण्यास अप्रत्यक्षरीत्या मदतच केल्याचा ठपका आशिष शेलार यांनी ठाकरेंवर ठेवला आहे.

पाकिस्तानात जाणार प्रकल्प? : पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाद शरीफ यांच्या नेतृत्वाखाली सरकार ग्वादर या सामरिक दृष्ट्या महत्त्वाच्या बंदरावर ग्रीनफिल्ड रिफायनरी योजना कार्यान्वित करण्यासाठी सौदी अरेबिया सोबत अंतिम टप्प्यात बोलली करत आहे. दोन आठवड्यात विद्यमान सरकारची मुदत संपण्यापूर्वी सर्व कागदोपत्री कामे पूर्ण करण्यासाठी पाकिस्तान सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सौदी अरेबियातून पाकिस्तानात रिफायनरी क्षेत्रात गुंतवणूक होण्यासाठी सरकारने नवीन धोरण अमलात आणले असल्याची माहिती समोर आली आहे. यातून पेट्रोल, डिझेलवर 25 वर्षांसाठी साडेसात टक्के सीमाशुल्क लागणार आहे. त्यासाठी या योजनेत पेट्रोल केमिकल सुविधा सोबतच एकीकृत पेट्रोल केमिकल संकुल उभारले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा प्रकल्प ग्वादरला जाण्याची शक्यता अधिक असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा - विरोध करणारी गावे वगळून ठरलेल्या ठिकाणीच रिफायनरी होणार, दिल्लीत लवकरच बैठक - आमदार नितेश राणे

Last Updated :Jul 29, 2023, 6:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.