ETV Bharat / state

Sanjay Raut On Eknath Shinde : गरज संपली आता तुम्ही गाशा गुंडाळा- संजय राऊत यांचा शिंदे गटाला टोला

author img

By

Published : Jul 6, 2023, 2:04 PM IST

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर तुफान हल्लाबोल केला. तुमची गरज संपली आता गाशा गुंडाळा, असा इशाराही संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या गटाला दिला आहे.

Sanjay Raut On Eknath Shinde
खासदार संजय राऊत

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या नाट्यमय बदलानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार सत्तेमध्ये सामील झाल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी पसरल्याच्या चर्चा आहेत. इतकेच नाही तर शिंदे गटाचे काही आमदार उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार असल्याचे देखील बोलले जात आहे. या सर्व राजकीय परिस्थितीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. गरज संपली आता, तुम्ही गाशा गुंडाळा, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.

हा औटघटकेचा खेळ आहे : एकनाथ शिंदे यांच्या गटात काय चालले हे पहायला मी बसलो नाही. राज्यातील राजकीय घडामोडीवर उद्धव ठाकरेंनी नांदा सौख्यभरे या एका ओळीत प्रतिक्रिया दिली होती. हीच भूमिका त्यांच्यासाठी योग्य असून हे अपेक्षित होते. हा आऊटघटकेचा खेळ आहे. बहुमत 170 चे असताना देखील नव्याने राष्ट्रवादीच्या आमदारांचा चाळीसचा एक गट आणला जातो. याचा अर्थ तुमची गरज संपली, आता तुम्ही ताशा गुंडाळा असा होत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आमदार बसले बाशिंग बांधून : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची शपथ होते, पण या गटाच्या बाशिंग बांधून बसलेल्या आमदारांना शपथ दिली जात नाही. महाराष्ट्राला पुन्हा एकदा नवीन मुख्यमंत्री मिळेल, असा दावाही संजय राऊत यांनी यावेळी केला. ना घर का ना घाट का अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. ही परिस्थिती त्यांनी स्वतःहून ओढून घेतलेली आहे. स्वाभिमान असेल आणि जुनी वक्तव्ये आठवत असतील तर द्या राजीनामे. तुमच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. स्वाभिमान अभिमान त्यांच्या भांडणांमध्ये आम्हाला पडायचे नाही. मात्र ते आपापसात झुंजून संपून जातील असेही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

अजित पवारांचा 90 जागेवर दावा : बुधवारी वांद्रे येथे अजित पवार व त्यांच्या समर्थक आमदारांचा मेळावा झाला. या मेळाव्यात अजित पवार यांनी 90 जागा मिळतील असा दावा केला. अजित पवार यांच्या या दाव्यावर खासदार राऊत म्हणाले की, 90 जागा अजित पवार जर मागत असतील तर यांना काय मिळणार आहे? किती तुकडे मिळणार आहेत? यांच्याशी चर्चा देखील कोणी करणार नसल्याचे संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

एकदा चीनमध्ये घुसून दाखवा : मणिपूर येथील हिंसाचार अद्याप शांत झालेला नाही. यावर खासदार राऊत म्हणाले की, मणिपूरमधील स्थिती जम्मू कश्मीर पेक्षा भयंकर आहे. त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करायला वेळ आहे. संघटनात्मक बदल करायला वेळ आहे. परंतु मणिपूरबाबत एक शब्द बोलायला तयार नाहीत. मणिपूरचे इंटरनेट बंद करणे म्हणजे मणिपूरला देशापासून वेगळे करणे आहे. पाकिस्तानला उठसुट दम देत आहात एकदा त्या चीनमध्ये घुसून दाखवा, असे आव्हानही संजय राऊत यांनी यावेळी केले.

हेही वाचा -

  1. Sanjay raut on maharashtra politics crisis : मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांना हटविण्यात येणार, 16 आमदार ठरणार अपात्र : संजय राऊत
  2. Maharashtra Political Crisis: भाजप म्हणजे राजकारणातील 'सिरीयल किलर आणि बलात्कारी'- संजय राऊत यांची गंभीर टीका
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.