ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis: भाजप म्हणजे राजकारणातील 'सिरीयल किलर आणि बलात्कारी'- संजय राऊत यांची गंभीर टीका

author img

By

Published : Jul 4, 2023, 12:56 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारचा दिवस ढवळून निघाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 40 आमदारांनी उचललेल्या या पावलामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालत होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे आता अजित पवार देखील राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला हक्क सांगताना दिसत आहेत. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut
संजय राऊत

संजय राऊत यांची भाजपवर टीका

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारमध्ये प्रवेश केल्यानंतर रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली. याबाबत महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुंबईतील आपल्या निवासस्थानी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपली प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, प्रश्न फायदा किंवा तोट्याचा नाही. त्यांनी आधी शिवसेनेत फूट पाडली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, फुटलेल्या लोकांचा पक्ष आणि चिन्हावर दावा करायचा विचार नव्हता. हे दिल्लीचे डोके होते, असे ते म्हणाले आहेत.

त्यांना महाराष्ट्रातून बाळासाहेब ठाकरे हे नाव नष्ट करायचे आहे. अगदी त्याच पद्धतीने राष्ट्रवादीच्या लोकांना हाताशी धरून पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यात आलेला आहे. हे राजकारणातील सिरीयल किलर आणि सिरीयल रेपिस्ट आहेत- संजय राऊत



भाजपचे वस्त्रहरण : पुढे बोलताना राऊत म्हणाले की, पक्ष फोडायचा आणि त्या पक्षावर दावा करायला लावायचा. हे यांचे कारस्थान आहे. जे स्वतः इतिहास घडवत नाहीत, ते दुसऱ्यांचा इतिहास नष्ट करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात फुटलेल्या आमदारांवर कार्यवाही होणार आहे. तोच निर्णय हा राष्ट्रवादीच्या तुटलेल्या गटाला देखील लागू शकतो. काही लोक याला ऑपरेशन लोटस म्हणत आहेत. पण कुठले लोटस? त्यांचेच ऑपरेशन झाले. अशी फूट पाडल्यामुळे महाराष्ट्रात नव्हे तर देशात भाजपचे वस्त्रहरण झालेले आहे. हीच वेळ भविष्यात तुमच्यावर देखील येऊ शकते हे लक्षात ठेवा, असे राऊत म्हणाले आहेत.


राजकारणात उलथापालथ : मोदी 24 तासापूर्वी काय बोलतात आणि महाराष्ट्रात काय घडते, हे जगाने पाहिले आहे. जोपर्यंत त्यांना जिंकण्याचा आत्मविश्वास निर्माण होणार नाही, तोपर्यंत ते निवडणुका घेणार नाहीत. मुंबईला दोन वर्षापासून महापौर नाही नगरसेवक नाही. महाराष्ट्राच्या राजकारणासोबतच देशाच्या राजकारणात देखील उलथापालथ होत आहे. भविष्यात महाविकास आघाडीसोबत काय करायचे आहे? त्याबद्दल पक्षप्रमुख संवाद साधतील. त्या संदर्भात बैठक सुरू आहे. राष्ट्रवादीबरोबर गेलो म्हणून काही नेते रडले होते. पण सोमवारी या शिंदे गटातील मंत्री हे अजित पवार यांच्या पायाला डोके लावत होते. शपथविधीनंतर फडणवीस आता विवाहित आहेत. आता मी त्यांना काही शाप देणार नाही. ते ढोंगी आहेत. ते शब्दाला पक्के नाहीत. राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून हे अनेक दिवस कारस्थान करत आहेत, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

हेही वाचा :

  1. Maharashtra Political Crisis: अजित पवारांच्या बंडानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटाने बोलवली पदाधिकाऱ्यांची बैठक, ठाकरे पवारांची साथ देणार का?
  2. Maharashtra Political Crisis: शिवसेनेत बंडखोरी केलेल्या १६ आमदारांच्या अपात्रततेचा लवकर निर्णय घ्या- ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव
  3. Maharashtra political crisis : बंडानंतर शरद पवारांनी गेम पालटला... अजित पवारांच्या गटामधून आमदार मकरंद पाटील पुन्हा वापस
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.