ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला; राज ठाकरेंची खोचक टीका

author img

By

Published : Jul 2, 2023, 4:50 PM IST

Maharashtra Political Crisis
संपादित छायाचित्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना रुचली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवार यांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडल्याची टीका राज ठाकरेंनी केली.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. मात्र अजित पवार यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांना पचली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडल्याची खोचक टीका राज ठाकरेंनी केली.

  • आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .

    उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !

    तसंही…

    — Raj Thackeray (@RajThackeray) July 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय म्हणाले राज ठाकरे : आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृष्यातील दिगू टिपणीस झाला, असे ट्विट राज ठाकरे यांनी केले. यामध्ये उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच ! तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला, अशी खोचक टीका राज ठाकरे यांनी केली.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला : राज ठाकरे यांनी राज्याच्या राजकारणाचा आता चिखल झाल्याचेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. याबाबत राज ठाकरे यांनी लिहिताना 'ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.

बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?' असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.

काय आहे प्रकरण : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्याचे दिसून आले आहे. अजित पवार यांच्यासोबत 29 आमदार असल्याने राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांचाही या बंडात सहभाग असल्याचे दिसून येते.

हेही वाचा -

  1. Maharashtra Political Crisis : अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री, आता शिंदेंप्रमाणे पक्षावर दावा ठोकणार का?,
  2. Maharashtra New Cabinet : राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप, 'या' आमदारांनी घेतली शपथ
  3. Maharashtra Political Crisis : ... म्हणून आम्ही एकत्र आलो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.