ETV Bharat / state

Breaking News : गांधींच्या सावरकरांच्याबद्दल अनुद्गार मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ

author img

By

Published : Mar 23, 2023, 6:47 AM IST

Updated : Mar 23, 2023, 12:12 PM IST

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
Maharashtra Breaking News

12:09 March 23

गांधींच्या सावरकरांच्याबद्दल अनुद्गार मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ

मुंबई - विधानसभा दहा मिनिटांसाठी तहकूब. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबद्दल अनुद्गार काढल्याच्या मुद्द्यावरून गदारोळ होत आहे. सत्ताधारी पक्षातील प्रताप सरनाईक संजय शिरसाठ आणि आशिष शेलार यांनी उपस्थित केला मुद्दा. राहुल गांधी आणि काँग्रेसने माफी मागण्याची केली आग्रही मागणी.

12:02 March 23

राहुल गांधींना मोदी बदनामी प्रकरणी 2 वर्षांची शिक्षा, जामिनही मंजूर

सुरत - राहुल गांधी यांच्यावरील अब्रुनुकसानीचा आरोप येथील सत्र न्यायालयात सिद्ध झाला आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याचवेळी पुढील कोर्टात अपिलासाठी त्यांना लगेचच कोर्टाने जामिनही मंजूर केला आहे. आता राहुल गांधी वरच्या कोर्टात जामिनासाठी अर्ज करतील. मोदी आडनावासंदर्भात त्यांनी केलेले वक्तव्य त्यांना महागात पडले आहे.

11:58 March 23

NIA च्या पथकाचे नागपुरात सर्च ऑपरेशन

नागपूर - NIA च्या पथकाचे नागपुरात सर्च ऑपरेशन. प्रतिबंधित जाकीर नाइक इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आईआरएफ) च्या काही लोकांसोबत अब्दुल नामक इसमाची चर्चा सुरू होती. त्याचबरोबर पाकिस्तानमधील व्यक्तींशी संशयास्पद चाट प्रकरणी NIA ने त्या इसमाची चौकशी केली असल्याची माहिती मिळाली आहे. NIA च्या पथकाने इसमाला नोटीस दिली असून मोबाइल जप्त केल्याची माहिती आहे.

11:55 March 23

नागपूरमध्ये संशायस्पद चॅटिंगच्या आधारे तरुणाची एनआयएकडून चौकशी

नॅशनल इन्वेस्टींगेशन एजन्सी (NIA) पथकाने आज सकाळी नागपुरात सर्च केल्याची माहिती पुढे आली आहे. नागपूरच्या लकडगंज भागात असलेल्या सतरंजीपुरा भागात पहाटे 4 च्या दरम्यान एनआयए पथकाने कारवाई केली आहे. अब्दुल मुक्तगीर नामक तरुणाने २०१७ साली पाकिस्तानमध्ये राहत आलेल्या एकाशी व्हाट्सअपवर चॅटिंग केली होती. संशयास्पद चॅटिंगच्या आधारे एनआयए पथकाने अब्दुला मुक्तगीरची चौकशी केली आहे. एनआयएच्या पथकाने इसमाची चौकशी केल्यानंतर त्या इसमाला नोटिस दिला असून मोबाइल जप्त केला आहे.

11:16 March 23

2011 च्या खुनाच्या प्रयत्न प्रकरणातून ठाणे न्यायालयाकडून एकाची निर्दोष मुक्तता

ठाण्याच्या न्यायालयाने 2011 च्या हत्येच्या प्रयत्न प्रकरणातून नवी मुंबईतील एका भोजनालय मालकाची निर्दोष मुक्तता केली आहे. 16 मार्च 2011 रोजी त्याच्या भोजनालयाजवळ पार्किंगच्या वादातून एका व्यक्तीवर विळ्याने हल्ला केल्याचा त्याच्यावर आरोप होता.

11:15 March 23

चंद्रपुरात रस्ते अपघातात डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात एक व्यक्ती आणि त्याची पत्नी, दोघेही डॉक्टर, त्यांच्या कारला ट्रकने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी दिली.

11:15 March 23

कारागिराच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई येथे एका सुताराच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी दिली.

11:14 March 23

आरोग्य सेवा कंपनीला आग, दोन जण जखमी

पालघर जिल्ह्यातील एका आरोग्य सेवा कंपनीला गुरुवारी सकाळी लागलेल्या आगीत दोन जण जखमी झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. तारापूर एमआयडीसी औद्योगिक परिसरात असलेल्या फर्मच्या रिअॅक्टरमध्ये सकाळी साडेसहा वाजता आग लागली.

11:08 March 23

विधानभवनात उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांचे एकत्र आगमन

विधान भवनात आज आगळंवेगळं चित्र पहायला मिळाले आहे. उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस एकत्र गप्पा मारत आले आहेत.

10:56 March 23

सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या याचिकेवर महत्त्वाचा निर्णय..प्रशासकीय बाब असल्याची न्यायालयाची टिप्पणी

सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली 1.33 एकर जमीन वकिलांसाठी चेंबर ब्लॉकमध्ये बदलण्याची मागणी करणाऱ्या याचिकेबाबत न्यायालयीन बाजूने निर्णय घेऊ शकत नाही. या प्रशासकीय बाबी आहेत आणि न्यायालयीन निर्णयासाठी बाब नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

10:02 March 23

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या घोषणा

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणा दिल्या आहेत. पन्नास खोके एकदम ओके, बोलाची कढी बोलाचा भात, लावली वाट, अदानी के दलाल को, जुते मारो सालो को... अशा घोषणाबाजी करण्यात आली आहे.

09:52 March 23

इंडिगोच्या विमानात दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या दोन प्रवाशांना अटक

मुंबईहून मुंबईला येणाऱ्या इंडिगोच्या विमानात दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या दोन प्रवाशांना सहार विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. दारू पिऊन विमानातील कर्मचाऱ्यांसोबत शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

08:43 March 23

भाजपकडून खासदारांना व्हिप जारी, सभागृहात सादर होणार आहेत महत्त्वाची विधेयके

भारतीय जनता पक्षाने (भाजप) पक्षाच्या लोकसभा खासदारांना महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी आज सभागृहात उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे.

08:39 March 23

नागपूरमध्ये एनआयएची धाड, पाकिस्तानमध्ये एका नागरिकाने फोन केल्याचा संशय

नागपूरमध्ये एनआयएचे धाड सत्र आहेत. एका नागरिकाने पाकिस्तानमध्ये फोन केल्याचा संशय आहे.

08:31 March 23

माहिमच्या समुद्रातील मजार पाडण्यासाठी बीएमसीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल

राज ठाकरे यांनी दर्ग्यावरून इशारा दिला होता. माहिमच्या समुद्रातील मजार पाडण्यासाठी बीएमसीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

07:24 March 23

पुण्यातील सोमेश्वर कारखान्याच्या बॅगसला आग

पुण्यातील सोमेश्वर कारखान्याच्या बॅगसला आग लागली आहे. आगीत १ हजार टन बगॅस जळून खाक झाला आहे.

07:09 March 23

उद्यापासून रमजान सुरू होणार

उद्यापासून रमजान सुरू होणार आहे. तिरुअनंतपुरममध्ये झालेल्या मुस्लिम इमामांच्या बैठकीत उद्या राज्यात रमजानच्या उपवासाचा पहिला दिवस असल्याची माहिती देण्यात आली आहे.

07:09 March 23

चीनमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन, उईघुर कार्यकर्त्याने संयुक्त राष्ट्रसंघात उपस्थि केला प्रश्न

उईघुर कार्यकर्त्याने चीनला शिनजियांगमधील मानवाधिकारांचे उल्लंघन रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या शिफारशी लागू करण्यास सांगितले

07:08 March 23

पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. ख्रिश्चन, हिंदू आणि अहमदी यांच्यासह धार्मिक अल्पसंख्याकांना भेदभाव आणि छळाचा सामना करावा लागतो. जबरदस्ती विवाह आणि ऑनर किलिंगच्या संदर्भात महिलांच्या हक्कांवर चिंता आहे: नासिर अझीझ खान, युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीचे केंद्रीय प्रवक्ते

07:04 March 23

अनधिकृत माहिममधील मजार बांधकामाची जिल्हा प्रशासन करणार चौकशी

राज ठाकरे यांनी माहिममध्ये अनधिकृत मजार बांधण्यात आल्याचा सभेमधून आरोप केला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने माहिम प्रकरणात पथकाची नियुक्ती केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेले पथक घटनास्थळी ८ वाजता पाहणी करणार आहे. समुद्रातील मजार हे ६०० वर्षे जुनी असल्याचा ट्रस्टचे खंडवानी यांनी दावा केला आहे.

06:34 March 23

Maharashtra Breaking News : राज ठाकरेंची सभा म्हणजे हास्य जत्रा - किशोरी पेडणेकर

मुंबई: राज ठाकरे यांच्या सभेबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, राज ठाकरे यांची सभा म्हणजे महाराष्ट्रात सध्या हास्य जत्रा सुरू आहे. त्यांच्याबद्दल काय बोलायचे? गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भव्य सभा मुंबईतील शिवाजी पार्क येथे पार पडली. या सभेत मनसैनिकांनी राज ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले आहे. राज ठाकरे यांनीही आपण आता नवीन टीझर प्रदर्शित करणार असल्याचे या सभेत सांगितले. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे

Last Updated :Mar 23, 2023, 12:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.