ETV Bharat / state

'एनआयए'ने सचिन वाझेला विविध घटनास्थळांवर नेऊन घेतली माहिती

author img

By

Published : Mar 25, 2021, 6:47 AM IST

Updated : Mar 26, 2021, 2:13 AM IST

Live Updates : 'अँटिलिया' स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांडसंदर्भातील  घडामोडी एका क्लिकवर
Live Updates : 'अँटिलिया' स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांडसंदर्भातील घडामोडी एका क्लिकवर

22:36 March 25

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केला अहवाल - सूत्र

मुंबई - मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे अहवाल सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अहवालात रश्मी शुक्ला यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. रश्मी शुक्ला यांनी अवैधरित्या फोन टॅपिंग केले होते. त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. 

22:03 March 25

एनआयएची टीम घोडबंदर रोड येथे पोहचली.................

घोडबंदर रोड येथून प्रतिनिभी विशाल सवणे यांनी घेतलेला आढावा

ठाणे - एनआयएची टीम गायमुख चौपाटी घोडबंदर रोड येथे पोहोचली आहे. मनसुख हिरेन यांचा मृत्यू होण्यापूर्वी याच ठिकाणावरून विनायक शिंदे या आरोपीने मनसुख हिरेन यांना फोन केला होता. याच प्रकरणाशी संबंधित काही धागेदोरे मिळत आहेत का? या तपासासाठी घोडबंदर रोड येथे एनआयएची टीम पोहचली आहे.  

20:31 March 25

वाझेला घेऊन एनआयएची टीम रेती बंदरला पोहचली

प्रतिनिधी विशाल सवणे यांनी घेतलेला आढावा

ठाणे - मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडलेल्या रेती बंदर या ठिकाणी एनआयएची टीम दाखल झाली आहे. सचिन वाझे याला घेऊन ही टीम रेती बंदर येथे पोहचली आहे.  

20:04 March 25

अंबानींना धमकी देणाऱ्या पत्राची प्रिंट शिंदेंच्या प्रिंटरमधून, वाझेंची कबुली

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

ठाणे - मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओतील धमकीचे पत्र आपणच ठेवल्याची कबुली निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी दिली आहे. त्या मोटारीचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. वाझेंना 25 मार्चपर्यंत एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) कोठडी देण्यात आली होती. आज (दि.25 मार्च) त्यांची कोठडी संपत आहे. त्यापूर्वी त्यांनी धमकीचे पत्र आपणच ठेवल्याची कबुली दिली आहे. तर महत्वाचे म्हणजे या पत्राची प्रिटिंग कॉपी विनायक शिंदे यांच्या घरातील प्रिंटरमधून काढली होती. तोच प्रिंटर तीन दिवसांपूर्वी दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या घरातून जप्त केला आहे.

18:54 March 25

वाझेच्या बॅगमध्ये पैसे

cctv
वाझेच्या बॅगमध्ये पैसे

मुंबई - सचिन वाझेचा आणखी एक सीसीटीव्ही समोर आला आहे. सीसीटीव्हीमध्ये सचिन वाझे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जाताना दिसत आहे. यात एक बँग दिसत असून, त्या बॅगमध्ये पैसे दिसत आहेत. 

18:33 March 25

वाझेचा आणखी एक सीसीटीव्ही समोर; बँग दिसत असून यात पैसे असल्याचा संशय

हॉटेलमधला आणखी एक सीसीटीव्ही समोर

मुंबई - अँटिलिया कार स्फोटकं प्रकरणी सचिन वाझेचा आणखी एक सीसीटीव्ही समोर आला आहे. सीसीटीव्हीमध्ये सचिन वाझे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जाताना दिसत आहे. हॉटेलच्या स्कॅनिंग मशीनचे फोटो देखील समोर आले आहेत. त्या बॅगमध्ये पैसे असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. 

18:00 March 25

उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री वर्षा निवासस्थानी दाखल

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे हे मुख्यमंत्री यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. पुण्यात वाढणाऱ्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात येणार आहे. तसेच फोन टॅप प्रकरणाचा अहवाल देखील यावेळी सादर करण्यात येणार आहे.  

17:49 March 25

वाझेची संपत्ती जप्त होणार?

cctv
स्कॅनिंग मशीन

सचिन वाझे हा पोलीस दलात एपीआय होता. मात्र, वाझेकडे हजारो कोटींची बेनामी संपत्ती असल्याचे बोलले जात आहे. भाजप नेते किरीट सोमैय्या सांगतात की, सचिन वाझेच्या वसुली गॅंगने हजारो कोटी कमवले आहेत. पैसा कुठून आला कुठे गेला याची चौकशी एनआयए, आरबीआय, ईडी, रजिस्ट्रर ऑफ कंपनी, इन्कम टॅक्स अशा विभिन्न संस्थांनी केला पाहिजे. मनी ट्रेन, लाभार्थी कोण आहे, बीट कॉईनचा उपयोग, निनावी ट्रान्जेक्शन, ऑफसोर्स कंपन्या या सगळ्यांचा तपास व्हायला पाहिजे. 

17:45 March 25

मला भाजपमध्ये येण्यासाठी विचारणा झाली - राजेंद्र पाटील यड्रावकर

कोल्हापूर - राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर केलेल्या आरोपात तथ्य आहे. भाजपमध्ये येण्यासाठी मला विचारणा झाली होती. मात्र, जनतेला विचारात घेऊन मी महाविकास आघाडी सरकारसोबत राहण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.

पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी शिरोळमध्ये निवडून आलेले अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना भाजपमध्ये येण्यासाठी संपर्क केला होता, असा दावा राष्ट्रवादीचे नेते व मंत्री  जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.

17:09 March 25

मला बळीचा बकरा बनवलं जातंय; सचिन वाझेचा कोर्टात दावा

मुंबई - मला बळीचा बकरा बनवलं जात असल्याचे सचिन वाझेने कोर्टात दावा केला आहे. मी दीड दिवस अँटिलिया स्फोटकं प्रकरणाचा तपास अधिकारी होतो. अचानक मला सांगितलं की, तुझ्या विरोधात पुरावे आहेत, तुला अटक करतोय. जी काही चौकशी करायची होती ती करून झालीये, आता आणखी पोलीस कोठडी देऊ नका, अशी विनंती वाझेने कोर्टात केली होती. मात्र एनआयए कोर्टाकडे केलेली विनंती फेटाळली आहे. 

16:53 March 25

सचिन वाझेच्या एनआयए कोठडीत 3 एप्रिलपर्यंत वाढ

मुंबई - सचिन वाझे याला 3 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडीत ठेवण्याचे निर्देश विशेष कोर्टाने दिले आहेत. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर स्फोटकं ठेवल्याचं आहे प्रकरण. 

16:37 March 25

बॉक्सने भरलेली गाडी एनआयए ऑफिसमधून बाहेर; पुरावे असण्याची शक्यता

एनआयए ऑफिसमधून बॉक्सने भरलेली गाडी एफएससीएलकडे

मुंबई - अँटिलिया कार स्पोटकं प्रकरणी एनआयए ऑफिसमधून एक गाडी एफएससीएलकडे रवाना झाली. या गाडीमध्ये बॉक्स भरलेले होते. बॉक्समध्ये मुद्देमाल (पुरावे) असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.  

16:24 March 25

वाझेंच्या गाडीत डेटोनेटर सापडले नाही; वाझेंच्या वकिलांचा युक्तिवाद

मुंबई - केवळ जिलेटिनच्या कांड्या विस्फोट करू शकत नाहीत, त्याच्यासोबत डेटोनेटर असेल तरच ते विस्फोटक मानलं जातं. 'त्या' गाडीत किंवा वाझेंकडे असं कोणतंही डेटोनेटर सापडलं नाही. त्यामुळे याला दहशतवादी कृत्य म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद सचिन वाझेंच्या वकिलांनी केला आहे. 

16:08 March 25

एनआयए कोर्टात सुनावणी सुरू

मुंबई -  वाझे यांचे नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. तसेच वाझे यांनी अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केल्याचा आरोप आहे. विनायक शिंदे, गौर आणि वाझे  यांची समोरासमोर चौकशी करण्याची एनआयएची योजना आहे. एनआयएने कोर्टाकडे सचिन वाझेच्या 15 दिवसांच्या रिमांडची मागणी केली आहे. 

15:21 March 25

परमबीर सिंग यांच्या लेटर बाँम्ब संदर्भात हायकोर्टात आणखी एक याचिका

मुंबई - परमबीर सिंग यांच्या लेटर बाँम्ब संदर्भात हायकोर्टात आणखी एक याचिका दाखल झाली आहे. या संपूर्ण प्रकरणात शरद पवारांच्या भूमिकेचीही चौकशी होण्याची गरज असल्याचा याचिकेत उल्लेख करण्यात आला आहे. 90 वर्षीय रिबेरो यांच्यामार्फत चौकशीचा सल्ला देण्यामागे पवारांचा हेतू काय? असा सवालही या याचिकेत विचारल आहे. 

14:53 March 25

परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका केली दाखल

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायलयाने काल सुनावणी दरम्यान दिलेल्या आदेशानुसार ही याचिका दाखल दाखल करण्यात आली आहे. 

14:43 March 25

सचिन वाझेला घेऊन एनआयएची टीम कोर्टात दाखल

मुंबई- सचिन वाझेला घेऊन एनआयएची टीम मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टात दाखल झाली आहे. थोड्याच वेळात सुनावणीला सुरूवात होणार आहे. एनआयए कोठडी वाढवून  घेणार असल्याची माहिती मिळत आहे. 

14:35 March 25

वाझेला घेऊन 'एनआयए'ची टीम कोर्टाकडे रवाना

मुंबई - सचिन वाझेला घेऊन एनआयएची टीम कोर्टाकडे रवाना झाली आहे. 

13:57 March 25

सचिन वाझे आणि मनसुख हिरेन 17 फेब्रुवारीला भेटले

सचिन वाझे आणि मनसुख हिरेन 17 फेब्रुवारीला भेटले

सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्या भेटीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. वालचंद हिराचंद मार्ग जंक्शन येथे दोघांची भेट झाल्याचा दावा एनआयए ने केला आहे. 17 फेब्रुवारीला रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी दोघांची भेट झाली आहे.

12:44 March 25

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे फोन टॅपिंगचा अहवाल आज मुख्यमंत्र्यांकडे सादर करतील - अजित पवार

12:44 March 25

ज्यांनी पोलिसांच्या प्रतिमेला गालबोट लावलयं. त्यांची हयगय केली जाणार नाही - अजित पवार

12:39 March 25

राज्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत सुरू - अजित पवार

राज्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत सुरू आहे. काही पोलीस अधिकाऱ्यांनी मोठी चूक केली. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कठोर निर्णय घेतला आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

12:35 March 25

कोरोनाचे संकट वाढत आहे. तसेच लॉकडाऊनसंदर्भात मतमतांतरे आहेत - अजित पवार

12:34 March 25

कालच्या बैठकीत सहकाऱ्यांची भूमिका जाणून घेतली. चौकशीअंती सत्य बाहेर येईल. जनेतपासून काहीही लपवण्यात येणार नाही - अजित पवार

12:34 March 25

कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही - अजित पवार

12:33 March 25

मनसुख हिरेनला मारण्यासाठी क्लोरोफार्मचा वापर करण्यात आल्याचे एटीएस तपासात निष्पन्न झाले आहे.

12:30 March 25

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या या समितीमार्फतच होतात. त्या बदल्या कोणाच्याही सांगण्यावरून झालेल्या नाही - अजित पवार

12:20 March 25

केंद्रीय तपास यंत्रणा भाजपाचा पोपट आहे - नाना पटोले

सरकारने एटीएसच्या माध्यमातून चौकशी केली होती. गाडीतील जिलेटीन कोठून आले, याबाबतही चौकशी करण्यात आली होती. हिरेनच्या खुनाचाही तपास करण्यात येत होता. मात्र, भाजपाच्या पोपट असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांनी तपास एटीएसकडून काढून तो स्वत:कडे घेतला आहे, असे पटोले म्हणाले. 

12:19 March 25

भाजपा काळातील मंत्र्यांना फडणवीसच क्लीन चिट द्यायचे - नाना पटोले

12:18 March 25

अंबानी- अदाणींसाठी मोदी काम करतात, असा आरोप होते. मग त्यांनीही राजीनामा द्यावा - नाना पटोले

12:16 March 25

भाजपाने चहा, उंदीर घोटाळा केला, त्याची चौकशी केल्यास अनेक प्रकरण समोर येतील - नाना पटोले

12:16 March 25

राजीनामा दिल्यावर राजीनामा घेतला जातो. तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही आरोप झाले आहेत. त्यांनीही राजीनामा द्यावा - नाना पटोले

12:15 March 25

सुशांतसिंह प्रकरणातून महाराष्ट्रचं चुकीचं चित्र दाखवले - नाना पटोले

12:13 March 25

सरकारवर टीका करताना, भाजपा महाराष्ट्राची बदनामी करत आहे - नाना पटोले

12:13 March 25

बिनबुडाच्या आरोपांवर राज्यपालांनी विश्वास ठेऊ नये - नाना पटोले

12:13 March 25

भाजपाने केलेल्या सर्व आरोपांवर राज्यपालांना सविस्तर पत्र देणार होते - नाना पटोले

12:12 March 25

भाजपाने केलेला आरोप खोटे आहेत - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

11:38 March 25

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली

 मी राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली आणि त्यांना आरपीआय (ए) पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट देण्याची मागणी केली. ही एक गंभीर बाब आहे. जोपर्यंत महाराष्ट्र सरकार हटविले जात नाही.  तोपर्यंत चौकशी होऊ शकत नाही, असे  केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितेल. 

11:33 March 25

संजय राऊत यांची फडणवीसांवर टीका

आपले विरोधीपक्षनेते हे खुप मोठे नेते आहेत. कदाचित ते मोदीं पेक्षाही मोठे नेते असावेत. त्यांची उंची मोठेपणाची सह्याद्री पेक्षाही मोठी आहे. म्हणूनच ते पुन्हा मुख्यमंत्री होवू शकले नाहीत असा टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. राजभवनात बुधवारी फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत हे फार मोठे नेते नाहीत त्यामुळे त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही असे फडणवीस म्हणाले होते. त्या पार्श्वभूमिवर राऊत यांनी गुरूवारी फडणवीसांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही.

10:53 March 25

संजय राऊत यांची राज्यपालांवर टीका

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी पाठवून सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला. त्याबद्दल काय झालं याचा खुलासा होणं गरजेचं आहे. अभ्यास करत आहेत वैगेरे ठीक आहे, त्यातून त्यांना काही पीएचडी करायची आहे का?, असा टोला त्यांनी लगावला.  

10:53 March 25

वारंवार राजीनाम्याची आणि सरकार बरखास्त करण्याची मागणी यामुळे विरोधी पक्षाचं हसू होतं - संजय राऊत

09:49 March 25

सचिन वाझे यांची 25 मार्चला NIA ची कोठडी संपणार

अँटिलिया या निवासस्थानाजवळील स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकांप्रकरणी मुंबई पोलीस खात्यातील क्राइम ब्रांच अधिकारी सचिन वाझे यांना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांची कोठडी संपणार आहे.  

09:30 March 25

स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके व धमकीचे पत्र ठेवल्याचे वाझेकडून कबूल

मुकेश अंबानी यांच्या घराच्या काही अंतरावर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटक व धमकीच्या पत्राच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेने तपास करत असताना मुंबई पोलीस खात्यातील क्राइम ब्रांच अधिकारी सचिन वाझे या अधिकाऱ्याला अटक केल्यानंतर त्याची चौकशी सध्या सुरू आहे. आतापर्यंत सचिन वाझे या अधिकाऱ्याच्या झालेल्या चौकशीमध्ये त्याने  स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटक व धमकीचे पत्र ठेवल्याचं कबूल केल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे. दरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सचिन वाझे  वापरत असलेल्या तीन आलिशान गाड्या जप्त करण्यात आलेले आहे 

09:27 March 25

परमबीर सिंह-अनिल देशमुख प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधिशांची समिती करणार

 परमबीर सिंह-अनिल देशमुख प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधिशांची समिती करणार आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत न्यायाधीशमार्फत चौकशीचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

08:59 March 25

अँटिलियापासून काही अंतरावर पुन्हा सापडली बेवारस दुचाकी

 उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारीला सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तपास सुरू आहे. आता पुन्हा एकदा मुकेश अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावर एक बेवारस दुचाकी आढळली आहे. MH 01dd 2225, असा या दुचाकीचा क्रमांक असून यासंदर्भात आरटीओ विभागातून पोलिसांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. ही दुचाकी आरटीओ रजिस्ट्रेशनवर नमूद नाही, गाडीचा चेसी नंबरही आरटीओकडे रजिस्टर नसल्याचे समोर आले आहे

08:03 March 25

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहले आहे.  मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, "दूध का दूध, पानी का पानी" करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन, असे त्यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी टि्वट करून माहिती दिली. 

07:09 March 25

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर नाराजीचा सूर

फोन टॅपिंग प्रकरणाचे पडसाद राज्य मंत्रिमडळाच्या बैठकीमध्ये उमटल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले सर्व आरोप बैठकीत खोडून काढले. तसेच मी कधीही मुंबई पोलीस आयुक्त किंवा इतर कोणाला इतर कोणाला पैसे जमा करायला सांगितले नव्हते, अशा प्रकारचे स्पष्टीकरण गृहमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वांसमोर दिले.

07:08 March 25

रश्मी शुक्ला व परमबीर सिंग यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई

रश्मी शुक्ला यांच्याविरोधात राज्यसरकार कायदेशीर कारवाई करणार आहे. फोन टॅपिंग प्रकरणात ही कारवाई केली जाणार आहे. तर परमबीर सिंग यांच्या विरोधातही शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी होणार आहे. निवृत्त न्यायाधीशामार्फत ही चौकशी करण्यात येणार आहे.

07:08 March 25

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांना भेटणार

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगीतले. या भेटीत राज्य सरकार आपली बाजू राज्यपालांकडे मांडणार होते. मात्र, अद्याप कोणत्याही प्रकारची राज्यपालांची वेळ घेण्यात आली नसून राज्यपाल राजभवना बाहेर जाणार असल्याचे राज भवनाने जाहीर केले आहे.

06:17 March 25

सचिन वाझेवर बेकायदा कारवाई प्रतिबंधक (युएपीए) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणात आरोपी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेवर बेकायदा कारवाई प्रतिबंधक (युएपीए) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदा कारवाई प्रतिबंधक कायदा (युएपीए) हा देश आणि देशाबाहेर बेकायदा कृत्ये रोखण्यासाठी अत्यंत कठोर तरतुदी अंतर्भूत असलेला कायदा आहे. हा कायदा संपूर्ण देशात लागू होतो. या कायद्याद्वारे एनआयए कोणत्याही दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या संशयित आरोपीला दहशतवादी घोषित करू शकते. 

06:16 March 25

'एनआयए'ने 'एटीएस'कडून दोन्ही आरोपींचा ताबा घेतला

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा सर्व तपास आणि त्यांच्या ताब्यातील दोन्ही आरोपींना राज्य दहशतवाद विरोधी पथकाने राष्ट्रीय तपास संस्थेकडे दिले आहे. आता या प्रकरणाचा संपूर्ण तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करणार आहे. विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोघांनाही एनआयएने आपल्या ताब्यात घेऊन ठाण्यातून मुंबईमधील एनआयएच्या कार्यालयात आणले आहे.

06:15 March 25

परमबीर सिंग यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश

मुंबई - अँटिलिया स्फोटके आणि मनसुख प्रकरणात वाझेंना अटक होताच परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली. या प्रकरणात सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिला.

06:07 March 25

'अँटिलिया' स्फोटके, हिरेन हत्या, गृहमंत्र्यावरील आरोपासंदर्भातील घडामोडी एका क्लिकवर

मुंबई - उद्योगपती  मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेमधील निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटकेनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली. यानंतर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब टाकत महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा परमबीर सिंग यांनी आरोप केला. या स्फोटक घटनाक्रमानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.  परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बचा आधार घेत राज्यातील विरोदी पक्षांनी राज्यपालाकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला स्पोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ आढळून आली होती. स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी चौकशी केली जात आहे. तसेच सचिन वाझे यांना क्राईम ब्रँच पदावरून हटवले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याजवळील मुंब्रा खाडीत सापडला होता. प्रकरणाच्या चौकशीदरम्यान मनसुख हिरेन आणि सचिन वाझे एकमेकांना ओळखत असल्याचे समोर आले आणि हिरेन यांची हत्या वाझेंनी केल्याचा संशय बळावला. वाझेंची चौकशी झाल्यानंतर त्यांना अँटिलिया कार स्फोटक प्रकरणी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर वाझेंना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी देण्यात आली होती.

 अँटिलिया स्फोटके आणि मनसुख प्रकरणात वाझेंना अटक होताच परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागरी सुविधा कक्षाचे अधिकारी संजय पाटील आणि मुंबई गुन्हे शाखेचे माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे या दोघांना त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावले होते. तसेच महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करावी, असे आदेश गृहमंत्र्यांनी दिल्याचा आरोपही परमबीर सिंग यांनी केला. तर हे आरोप गृहमंत्र्यांनी फेटाळले आहेत.

Last Updated :Mar 26, 2021, 2:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.