ETV Bharat / state

Somaiya Press Conference : कोविड सेंटरचे टेंडर मिळवण्यासाठी एकाच स्टँप पेपरचा दोन ठिकाणी वापर, किरीट सोमय्या यांचा आरोप

author img

By

Published : Jan 21, 2023, 1:13 PM IST

Updated : Jan 21, 2023, 2:05 PM IST

Kirit Somaiya press conference
किरीट सोमय्या पत्रकार परिषद

किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिकेतील भ्रष्टाचारावर भाष्य केले आहे.पालिकेचे तत्कालीन नेत्यांनी दोन सदस्यांची समिती नेमली. सहआयुक्त सुनील धामणे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली होती. महापालिकेने 6 एप्रिल 2022ला समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. जून 2022ला या समितीने अहवाल दिला होता, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

मुंबई : कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या 100 कोटींच्या घोटाळ्याचा चौकशी अहवाल आला आहे. महापालिकेचे सहआयुक्त सुनील धामणे यांनी हा अहवाल सादर केला आहे. या अहवालात भ्रष्टाचार झाल्याचे कबूल करण्यात आले आहे. पण कोणतीही कारवाई करू नये, अशी शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणी सुनील धामणे यांचीच चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

चौकशी करण्याची मागणी : कोरोना काळात १०० कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी महविकास आघाडीवर केला होता. संजय राऊत यांचे मित्र सुजित पाटकर यांनी कोविड सेंटर चुकीच्या मार्गाने मिळवले असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला होता. या बाबत झालेल्या चौकशीचा अहवाल महानगर पालिकेकडून आला आहे. महानगरपालिकेचे सह आयुक्त सुधीर धामणे यांनी हा अहवाल सादर केला होता. या अहवालात भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र तरीही यामध्ये कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही. त्यामुळे सहआयुक्त सुधीर धामणे यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करून त्यांचीच चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

कागदपत्रे देखील खोटी : कोविड सेंटरचे काम मिळावे यासाठी सुधीर पाटकर यांनी सादर केलेली कागदपत्रे देखील खोटी असल्याचा आज नवा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला आहे. तसेच एकाच स्टँम्प पेपरवर महापालिकेने दोन करार केल्याची धक्कादायक माहिती या अहवालात देण्यात आली. या प्रकरणी महापालिकेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात मुंबई महापालिकेने तातडीने पोलिसात तक्रार करावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. आज मुलुंड येथे आपल्या निवस्थानी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा आरोप केला आहे.




एकाच मुद्रांकवर दोन वेगवेगळे करार : किरीट सोमय्या यांनी उपस्थित केलेल्या आरोपाबाबत महापालिकेने एप्रिल २०२२मध्ये दोन अधिकाऱ्यांची समिती नेमली. मनपा सहायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने काम केले. तीन महिन्यानंतर या समितीने आपला अहवाल सादर केला होता. त्यावेळी राज्याचे मुख्यमत्री म्हणून उध्दव ठाकरे हे काम करत होते. या अहवालात स्पष्ट लिहल आहे की, लाईफ टाईम हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसची निर्मिती कधी झाली. या प्रकरणात समितीने महापालिकेकडून कायदेशीर सल्ला देखील मागितला असल्याचे किरीट सोमय्या यांनी आज सांगितले. कायदेशीर नियमांचे पालन करून निर्माण केलेली कंपनी सोबतच करार केला जाऊ शकतो. मात्र संबंधित कंपनीने नोटरी करण्यातच फसवणूक केली आहे. कराराची सही २०१० रोजीची दाखवली आहे. पण नोटरी २०२२ मध्ये केली आहे. एकाच मुद्रांकवर दोन वेगवेगळे करार देण्यात आले. तसेच एकच नोटरीचे कागदपत्र पुण्याच्या कोविड सेंटरसाठी देखील करण्यात आला आल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी यावेळी केला. त्यामुळे या सर्व प्रकरणात सहआयुक्त याची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे त्याची त्वरित हकालपट्टी महापालिकेने करावी अशी मागणी देखील किरीट सोमय्या यांनी केली आहे.



लोकायुक्त यांच्या निर्णयाचे स्वागत : रेमडीसिविर बाबत आपण केलेल्या याचिकेवर लोकायुक्त यांनी दिलेल्या आदेशाचे आपण स्वागत करत आहोत. महविकास आघाडीच्या काळात रेमडीसिविरचा प्रचंड मोठा घोटाळा सुरू होता. रेमडीसिविर खरेदीत आपण केलेले आरोप खर असल्याचे लोकायुक्त यांनी सांगितले आहे. राज्य सरकारने दोन महापलेकला रेमडीसिविर एकाच दिवशी दिले. ज्यामध्ये किमतीत मोठी तफावत आहे. महाराष्ट्र सरकारने या किमतीवर नियंत्रण ठेवायला हवे होते. पण ते ठेवण्यात आले नसल्याचे लोकायुक्त म्हणले असल्याचे सोमय्या म्हणाले आहेत.



हेही वीचा : Kirit somaiya नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी किरिट सोमैय्या यांची रश्मी ठाकरे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

Last Updated :Jan 21, 2023, 2:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.