ETV Bharat / state

Kirit somaiya : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी किरिट सोमैय्या यांची रश्मी ठाकरे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

author img

By

Published : Jan 1, 2023, 1:30 PM IST

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) परिवाराचे अलिबाग येथील १९ बंगले (Uddhav Thackeray bungalows) कुठे गेले? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या ( BJP leader Kirit Somaiya ) यांनी आज पत्रकार परिषदेत विचारला होता. किरीट सोमैय्या (Kirit Somaiya) यांनी काल एक ट्विट करत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) इशारा दिला होता. काल इशारा दिल्यानंतर किरीट सोमय्या यांनी आज थेट रश्मी ठाकरेंच्या (Rashmi Uddhav Thackeray Family) विरोधात पोलीस स्टेशनला (Kirit somaiya police complaint) तक्रार दाखल केली आहे.

Kirit somaiya
भाजप नेते किरिट सोमय्या

रायगड : 2022 वर्षातील शेवटच्या दिवशी 5 नेत्यांची नावे घेत भाजप नेते किरीट सोमैय्या ( BJP leader Kirit Somaiya ) यांनी एक ट्विट करत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) लढाईचा इशारा दिला आहे. काल इशारा दिल्यानंतर किरीट सोमैय्या यांनी आज थेट ठाकरेंच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. किरीट सोमैय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात तक्रार (Kirit somaiya police complaint) दाखल केली आहे.

रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैय्या ( BJP leader Kirit Somaiya ) यांनी ठाकरे परिवारावर आरोप केला आहे. मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray bungalows ) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Uddhav Thackeray Family) यांनी घेतलेल्या जागेवर 19 बंगले होते. 19 बंगल्यांप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या रश्मी ठाकरे यांच्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

महाविकास आघाडीला इशारा : किरीट सोमैय्या यांनी नव्या वर्षात घोटाळे बाहेर काढणार असल्याचे जाहीर केले आहे. याबाबतचे ट्विट करताना त्यांनी 5 नेत्यांची नावे जाहीर केली आहेत. उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे साई रिसॉर्ट प्रकरण किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर आहे. यासह ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते अस्लम खान यांच्या नावाचाही उल्लेख सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आणि महाविकास आघाडीला इशारा दिला आहे.

जमिनीचे व्यवहार : रश्मी उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात जमिनीचे व्यवहार झाले असल्याचा आरोप सोमैय्यांनी केला आहे. त्यामध्ये घोटाळा झाला असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही मान्य केले आहे. हे बंगले रश्मी ठाकरे यांच्याशी संबंधित अन्वय नाईक यांनी 2009 मध्ये बांधले. 2014 मध्ये ठाकरे कुटुंबीयांनी ते विकतही घेतले असल्याचा आरोप सोमैय्या ( BJP leader Kirit Somaiya ) यांनी केला आहे.

बंगले गेले कुठे : त्यानंतर हे बंगले रश्मी ठाकरे ( Rashmi Thackeray ) यांच्या नावावर झाले. २०२० मध्ये त्यांनी १९ बंगल्यांचा मालमत्ता करही भरला. रश्मी ठाकरे, मनिषा वायकर यांनी हा कर भरला आहे. एवढेच नाही तर, त्यापूर्वीची दोन वर्षे रश्मी ठाकरे यांनी, त्याआधी सहा वर्षांचा मालमत्ता कर अन्वय नाईक यांनी भरला आहे. मात्र, आता हे बंगले गायब आहेत. हे बंगले एका रात्रीत कुणी तोडले? कुणी चोरले? तसेच याबाबतचा आदेश कुठल्या अधिकाऱ्याने दिला? बंगले तोडण्याची परवानगी घेतली होती काय? या सगळ्याचा तपास होणार आहे, असे सोमैय्या यांनी सांगितले.

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची हातसफाई : माजी महापौर किशोरी पेडणेकर (Former Mayor Kishori Pednekar) यांनी २०१७ मध्ये शपथपत्रात वरळी येथील गोमातानगर मधील पत्ता दिला आहे. त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत गोमाता जनता एसआरए सह. गृह. संस्था वरळीतील सदनिका, गाळ्यामध्ये बेकायदेशीर घुसखोरी केल्याचे सिद्ध झाले आहे. एसारएकडून चौकशीनंतर हे गाळे ४८ तासात खाली करण्याचे आदेश मुंबई महापालिकेकडून देण्यात आले आहेत. असा दावा करीत मुंबईतील गरीब झोपडपट्टीवासियांच्या सदनिका महापौर किशोरी पेडणेकर यांनी लाटल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

अनिल परब यांच्या विरोधात लढाई सुरू राहील : पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करून दापोलीत साई रिसॉर्ट उभारल्याप्रकरणी शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची सुनावणी आज झाली. त्याला अनिल परब, सदानंद कदम गैरहजर राहिले. त्यांचा पंधरा हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. याप्रकरणी पुढेही जोमाने लढाई सुरू राहणार असल्याचे सांगून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे परिवाराच्या गैरव्यवहारा संदर्भात चौकशी (Submit inquiry report on Uddhav Thackeray bungalow) करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.