ETV Bharat / state

Constitution Day : संविधान जागृतीसाठी न्यायाधीश रस्त्यावर ; संविधान दिनाच्या निमित्ताने जनजागृतीचा प्रयत्न

author img

By

Published : Nov 27, 2022, 9:32 AM IST

Constitution Day
संविधान दिन

भारतीय राज्यघटनेचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे आणि ती समजून घेतली (Judges rally on Street for Constitution Awareness) पाहिजे. प्रत्येकाला आपल्या मूलभूत अधिकारांची आणि कर्तव्याची माहिती व्हायला हवी, यासाठी संविधान दिनाच्या निमित्ताने मुंबईतील लघुवाद न्यायालयाच्या न्यायाधीशांनी काल यात्रा काढून जनजागृती करण्याचा प्रयत्न (occasion of Constitution Day) केला.

मुंबई : संविधान दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असतानाच मुंबईतील लघुवाद न्यायालयाच्या न्यायाधीशांनीही जनजागृतीसाठी रस्त्यावर उतरून यात्रा काढत नागरिकांचे लक्ष वेधून (Judges rally on Street for Constitution Awareness) घेतले. लघुवाद न्यायालयाच्या न्यायाधीशांनी लघुवाद न्यायालयापासून हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकापर्यंत यात्रा काढून संविधानाप्रती जनजागृती व्हावी यासाठी प्रयत्न केला. लघुवाद न्यायालयाचे अनेक न्यायाधीश आणि वकील तसेच कर्मचारी वर्ग या यात्रेत सहभागी झाला होता. हुतात्मा चौकात ही यात्रा समाप्त केल्यानंतर संविधानाची गरज आणि संविधानाचे महत्त्व न्यायाधीशांनी उपस्थितांना (occasion of Constitution Day) सांगितले.


अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा महत्त्वाचा अधिकार : यावेळी बोलताना लघुवाद न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश सुनील जेसू यांनी सांगितले की, संविधानातील कलम 21 अ प्रमाणे नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अत्यंत मूलभूत अधिकार संविधानाने दिला (Constitution Day) आहे. या अधिकाराची जपणूक करणे आणि प्रत्येकाला हा अधिकार मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासोबत संविधानाने अनेक महत्त्वाचे अधिकार नागरिकांना दिले आहेत. भारतीय राज्यघटना प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे वागायला पाहिजे, असेही ते (Constitution Awareness) म्हणाले.

संविधान जागृतीसाठी न्यायाधीश रस्त्यावर

संविधानाचे वाचन करण्याचे आवाहन : तर यावेळी बोलताना न्यायाधीश तृप्ती मिटकरी यांनी नागरिकांना राज्यघटनेचे आणि संविधानाचे वाचन करण्याचे आवाहन केले. संविधानाच्या वाचनानंतर प्रत्येक व्यक्तीला त्याचे अधिकार आणि कर्तव्य याची जाणीव नक्की होईल. तसेच हा देश अखंडितपणे संविधानावर चालावा, यासाठी प्रत्येकाने संविधानाचे व्यवस्थित पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी (Judges rally on Street in Mumbai) केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.