ETV Bharat / state

Aditi Tatkare On Irshalwadi : इर्शाळवाडीची नोंद दरडग्रस्त गावांच्या यादीमध्ये नाही, सर्वे नव्याने करण्याची गरज - आदिती तटकरे

author img

By

Published : Jul 20, 2023, 7:36 PM IST

Aditi Tatkare
Aditi Tatkare

रायगडमध्ये जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावाची नोंद दरडग्रस्त ( Irshalwadi landslide ) गावांच्या यादीमध्ये नाही. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी झालेला सर्वे पुन्हा एकदा नव्याने करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया रागडच्या आमदार आदिती तटकरे ( MLA Aditi Tatkare ) यांनी दिली आहे.

आदिती तटकरे यांची पत्रकार परिषद

मुंबई : रायगडमध्ये जिल्ह्यातील इर्शाळगड गावात सततच्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात अद्यापही अनेकजण ढिगाऱ्यखाली असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. डोंगराळ भागामुळे एनडीआरएफला शोध आणि बचाव कार्यात अडचणी येत आहेत. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रायगडमधील पाताळगंगा नदीलगत असलेल्या आपटा गावाचा संपर्क तुटला आहे. याठिकाणी रस्त्यांवर चार फुटांपेक्षा जास्त पाणी साचले आहे. यावर रायगडच्या आमदार आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

निवाऱ्यांची तात्काळ व्यवस्था : यावर बोलताना मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, इर्शाळगड हे जवळपास 40 ते 45 घरांचे गाव आहे. आमच्या माहितीनुसार, ही घटना रात्री 11 ते 11.30 च्या दरम्यान घडली. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडायला फक्त 2 ते 5 मिनिटे मिळाली. गाव डोंगरात असल्यामुळे नागरिकांना मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी उशीर झाला होता. मात्र, माहिती मिळाल्यानंतर एनडीआरफचे जवान 12.30 पर्यंत घटनास्थळी दाखल झाले होते. अजुनही मदतकार्य सुरू आहे. गंभीर जखमी रुग्णांना एमजीएममध्ये दाखल करण्यात येत आहे. तर इतरांना चौकच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जे सुरक्षित आहेत त्यांना निवाऱ्यांची तात्काळ व्यवस्था करण्यात आली आहे.

गावाची नोंद दरडग्रस्त गावांच्या यादीत नाही : 2021 मध्ये माळीण गावात अशीच भूस्खलनाची घटना घडली होती. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. रायगड जिल्हा हा डोंगर-दऱ्यांनी वेढलेला आहे. त्यामुळे भविष्यात येथेही अशा घटना घडू शकतात. यावर काही ठोस उपाय आहे का, असा प्रश्‍न विचारला असता आदिती तटकरे म्हणाल्या की, आता ज्या गावात दुर्घटना घडली त्या गावाची नोंद दरडग्रस्त गावांच्या यादीमध्ये नाही. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी झालेल्या सर्वे पुन्हा एकदा नव्याने करण्याची गरज आहे.

मदतकार्यात अडथळे : दुर्गम भागात दरड कोसळल्याने कोणतीही यंत्रणा तिथे पोहोचण्यास उशीर होतो. सध्या त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. महाड, म्हसळा, माणगाव या तालुक्यात धोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. पेणमध्ये अडकलेल्या 17 लोकांना हलवण्यात आले आहे. आजच्या घटनेतील बाधितांसाठी महाड मधली 2 एकर जागा पुनर्वसन विभागाला मदतीसाठी देण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव सभागृहात मान्यतेसाठी आहे. सध्या NDRF टीम सोबतच SDRF कॅम्प उभारण्यात यावेत, अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. अशी प्रतिक्रिया मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

हेही वाचा - Irshalgad Landslide : इर्शाळवाडीत बचावकार्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.