ETV Bharat / state

Buldana Bus Accident: बुलडाणा येथील बस अपघाताची चौकशी करा- रामदास आठवले

author img

By

Published : Jul 1, 2023, 9:09 PM IST

Buldana Bus Accident
रामदास आठवले

नागपूर-पुणे प्रवासी बसला समृद्धी महामार्गावर अपघात (Buldana Bus Accident) झाला. या अपघातात 26 लोकांचा मृत्यू झाला आहे. बुलडाणा येथील अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहत, सदर अपघाताची चौकशी महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी करून शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला. (Union Minister of State Ramdas Athawale)

बुलडाणा बस अपघात प्रकरणी रामदास आठवले यांची प्रतिक्रिया

मुंबई : समृद्धी महामार्गाचे उद्घाटन मोठ्या थाटात (Buldana Bus Accident) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये झाले होते. समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई अंतर कमी झाले होते. सार्वजनिक वाहतुकीसाठी समृद्धी महामार्ग खुला झाल्यापासून अनेक अपघात घडत आहेत. (Union Minister of State Ramdas Athawale)


वाहनचालकांनीसुद्धा खबरदारी घ्यावी : बुलडाणा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताची सखोल चौकशी करावी. या अपघातातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने 5 लाखांची सांत्वनपर मदत आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2 लाखांची सांत्वनपर मदत जाहीर केली आहे. हा अपघात भयंकर आणि दुःखदायक होता. समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्ग हा मृत्यूचा सापळा ठरू नये, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे; मात्र सर्व यंत्रणा आणि वाहनचालकांनीसुद्धा सावधानी ठेऊन पुन्हा असे अपघात होऊ नये याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी पाहणी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलडाणा बस अपघात घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे. योग्यरित्या चौकशी करणे तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी प्रशासनाला दिले आहेत.

असा घडला अपघात: भरधाव वेगात असणारी बस समृद्धी महामार्गावर असणाऱ्या लोखंडी पोलवर धडकली. त्यानंतर हा अपघात घडल्याचा अहवाल अमरावती प्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे. भरधाव वेगात असणारी ही बस समृद्धी महामार्गावरून धावत असताना रस्ता दुभाजकालगत असणाऱ्या स्टीलच्या खांबाला धडकली. यानंतर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसच्या उजव्या बाजूचा चाक डिव्हायडरला धडकताच बसचा टायर फुटला. त्यानंतर ही बस पलटली आणि सिमेंट रोडवर दूरपर्यंत घासत गेली. अतिशय वेगात असणाऱ्या या बसचा डिझेल टँक फुटला आणि आधीच प्रचंड गरम असणाऱ्या बसच्या इंजिनने पेट घेतला. त्यानंतर काही क्षणातच संपूर्ण बस जळाली. यावेळी बसचे आपत्कालीन दार आणि खिडकी देखील उघडू शकली नाही.

हेही वाचा:

  1. Samruddhi Mahamarg Accident : 'समृद्धी महामार्ग' मृत्यूचा सापळा बनलाय? अपघातांची मालिका थांबेना; जाणून घ्या आकडेवारी
  2. Bus Accident in Buldhana : बुलडाणा बस अपघातात 26 जणांचा मृत्यू; रविवारी होणार सामूहिक अंत्यसंस्कार, चालक पोलिसांच्या ताब्यात
  3. Buldana Bus Accident: समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.