ETV Bharat / state

India Vs New Zealand Match : भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान घातपाताची धमकी देणारा 17 वर्षीय युवक ताब्यात

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2023, 10:43 PM IST

Updated : Nov 16, 2023, 9:42 AM IST

India Vs New Zealand Match : भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य सामन्यादरम्यान घातापाताची धमकी देणाऱ्याच्या मुसक्या लातूर पोलिसांनी आवळल्या आहेत. या प्रकरणी लातूर जिल्ह्यातून एका 17 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं आहे. त्यानं एक्स मीडियावरून वानखेडे स्टेडियमला आग लावण्याची धमकी दिली होती.

India Vs New Zealand Match
India Vs New Zealand Match

मुंबई India Vs New Zealand Match : वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यादरम्यान घातापाताची धमकी देणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यत घेतलं आहे. या अल्पवयीन तरुणाविरुद्ध लातूर जिल्ह्यातील औसा पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी ईटीव्ही भारतला दिलीय.

एक्स सोशल मीडियावर धमकी : देशात सध्या सुरू असलेली क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आज भारत-न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यापूर्वी मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर ट्विट करून धमकी देण्यात आली होती. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यादरम्यान स्टेडियमला आग लावणार असल्याचं ट्विटमध्ये म्हटंल होतं. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर गुन्हे शाखेसह अन्य विभागांना याबाबत माहिती दिली. या धमकीनंतर काही तासांतच लातूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

बंदोबस्तात वाढ : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 9.15 वाजता एका व्यक्तीनं मुंबई पोलिसांच्या एक्स हॅंडलला ट्विट टॅग करत वानखेडे मैदानावर मोठा घातापात करणार अलसल्याची धमकी दिली होती. मात्र चौकशी केल्यानंतर हा खोडसाळपणा असल्याचं उघडकीस आलं होतं. या पोस्टनंतर मुंबई पोलिसांनी वानखेडे स्टेडियमसह आजूबाजूच्या परिसरात बंदोबस्त वाढवला होता. त्यानंतर सायबर सेलनं पोस्ट केलेल्या व्यक्तीचा शोध घेतला, असता तो लातूरमधील औसाचा असल्याचं आढळून आलं.

पोस्ट करणारी व्यक्ती अल्पवयीन : पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचं लोकेशन सापडताच मुंबई सायबर सेलच्या पश्चिम विभागानं लातूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर लातूर पोलीस तात्काळ पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीच्या घरी दाखल झाले. त्यावेळी पोस्ट करणारी व्यक्ती अल्पवयीन असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी या अल्पवयीन मुलाची चौकशी केली असता, तो विराट कोहलीचा चाहता असल्याचं उघड झालं. सामन्यादरम्यान विराट कोहली आपल्या फलंदाजीतून स्टेडिमवर आग लावणार असल्याचं त्यानं यावेळी पोलिसांना सांगितलं. माध्यमात बातम्या आल्यानंतर तरुणानं पोस्ट डिलीट केल्याचं एका पोलीस अधिकाऱ्यानं यावेळी बोलताना सांगितलंय. या प्रकरणाचा तपास सध्या लातूर पोलिसांकडून सुरू आहे.

हेही वाचा -

  1. Babar Azam : विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर बाबर आझमचा मोठा निर्णय, पाकिस्तानचं कर्णधारपद सोडलं
  2. Sachin Tendulkar : 'मी पाहिलेला तरुण मुलगा आता 'विराट' खेळाडू बनला', कोहलीच्या विक्रमानंतर क्रिकेटच्या 'देवा'ची प्रतिक्रिया
  3. Cricket World Cup 2023 : शमीनं एकाच षटकात घेतले २ बळी, विल्यमसन ६९ धावा करून बाद, मिशेलचं शतक; वाचा स्कोर
Last Updated :Nov 16, 2023, 9:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.