ETV Bharat / sports

Sachin Tendulkar : 'मी पाहिलेला तरुण मुलगा आता 'विराट' खेळाडू बनला', कोहलीच्या विक्रमानंतर क्रिकेटच्या 'देवा'ची प्रतिक्रिया

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2023, 6:15 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

Sachin Tendulkar : विराट कोहलीच्या विक्रमी ५० शतकानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं सोशल मीडियावर पोस्ट टाकून विराटचं अभिनंदन केलं. "एका भारतीयानं माझा विक्रम मोडला यापेक्षा जास्त आनंद मला इतर कशानंही होऊ शकत नाही", असं तो म्हणाला.

मुंबई Sachin Tendulkar : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध वनडेतील ५०वं शतक झळकावून सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा विक्रम मोडला. आता विराट वनडे क्रिकेटममध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारा फलंदाज बनला आहे.

  • The first time I met you in the Indian dressing room, you were pranked by other teammates into touching my feet. I couldn’t stop laughing that day. But soon, you touched my heart with your passion and skill. I am so happy that that young boy has grown into a ‘Virat’ player.

    I… pic.twitter.com/KcdoPwgzkX

    — Sachin Tendulkar (@sachin_rt) November 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सोशल मीडियावर पोस्ट टाकली : याशिवाय विराट कोहली आता एका वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्यानं या बाबतीतही सचिनला मागे टाकलं. कोहलीच्या या विराट कामगिरीचं आता स्वत: सचिननं कौतुक केलं आहे. सचिननं विराटच्या शतकानंतर 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट टाकून विराट कोहलीचं अभिनंदन केलं.

काय म्हणाला सचिन तेंडुलकर : "जेव्हा तू मला पहिल्यांदा भारतीय ड्रेसिंग रुममध्ये भेटलास, तेव्हा माझ्या पायाला स्पर्श केलास, म्हणून तुझी इतर संघ सहकाऱ्यांनी थट्टा केली होती. त्या दिवशी मला हसू आवरता आलं नाही. पण लवकरच, तू तुझ्या पॅशननं आणि कौशल्यानं माझ्या हृदयाला स्पर्श केलास. तो तरुण मुलगा आता ‘विराट’ खेळाडू झाला आहे, याचा मला खूप आनंद आहे", असं सचिन तेंडुलकर म्हणाला.

भारतीयानं विक्रम मोडल्याचा आनंद : सचिन पुढे म्हणाला की, "एका भारतीयानं माझा विक्रम मोडला यापेक्षा जास्त आनंद मला इतर कशानंही होऊ शकत नाही, ते ही सर्वात मोठ्या स्टेजवर, विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आणि माझ्या घरच्या मैदानावर! असं सचिननं नमूद केलं.

एका विश्वचषकात सर्वाधिक धावा : याशिवाय विराट कोहली एका एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्या सचिन तेंडुलकरला मागे टाकलं. सचिननं २००३ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये ६७३ धावा केल्या होत्या. आता विराटनं सचिनचा हा २० वर्ष जुना विक्रम मोडला. विराटच्या नावे या विश्वचषकात ७११ धावा आहेत.

हेही वाचा :

  1. Virat Kohli : विराट कोहलीची शतकांची 'हाफ सेंच्यूरी', सचिनचा रेकॉर्ड मोडला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.