ETV Bharat / state

Mohammed Shami News : शामीला अटक करू नका, दिल्ली पोलिसांची विनंती, मुंबई पोलिसांनी 'त्या' गुन्ह्याची करून दिली आठवण

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 16, 2023, 11:58 AM IST

Mohammed Shami News
मोहम्मद शामी

Mohammed Shami News : मुंबईत झालेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंड हतबल दिसत होता. न्यूझीलंडचा पराभव करत भारतानं अंतिम फेरी गाठलीय. दरम्यान, मोहम्मद शामीच्या धडाकेबाज गोलंदाजीवरुन दिल्ली पोलिसांनी त्यांच्या एक्स हँडलवर (पूर्वीचे ट्विटर) मुंबई पोलिसांना टॅग करत एक मजेदार पोस्ट केली आहे. त्यावर मुंबई पोलिसांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिली.

मुंबई Mohammed Shami News : क्रिकेट विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर 70 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 50 षटकात 4 गडी गमावून 397 धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 48.5 षटकात सर्वबाद 327 धावाच करू शकला. या विजयासह भारतानं रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्यात आपली जागा पक्की केली. दरम्यान, या विजयासाठी जितकी विराट कोहली अन् श्रेयस अय्यरच्या शतकांची चर्चा होत आहे, तितकीच चर्चा मोहम्मद शामीच्या घातक गोलंदाजीचीही होत आहे. एकीकडं मोहम्मद शामीवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. तर दुसरीकडं शामीबाबत दिल्ली पोलिसांनी एक्स हँडलवर (पूर्वीचे ट्विटर) मुंबई पोलिसांना टॅग करुन केलेल्या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

दिल्ली पोलिसांनी केली पोस्ट- एकदिवसीय सामन्यात सात विकेट घेणारा मोहम्मद शामी पहिला भारतीय गोलंदाज ठरलाय. तसंच शामीचे 7/57 चे आकडे हे एकदिवसीय आणि एकदिवसीय विश्वचषकातील भारतीयांचं सर्वोत्तम गोलंदाजीचं प्रदर्शन आहे. शामीच्या या कामगिरीमुळं त्याच सर्व स्तरातून कौतुक केलं जातंय. असं असतानाच दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी मोहम्मद शामीच्या गोलंदाजीबाबत एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांना उद्देशून दिल्ली पोलिसांनी म्हटलंय की, मोहम्मद शामीला अटक करू नका.

  • You missed pressing charges of stealing innumerable hearts @DelhiPolice and listing a couple of co-accused too😂

    P.S.: Dear citizens, both the departments know the IPC thoroughly and trust you for a great sense of humour 😊 https://t.co/TDnqHuvTZj

    — मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) November 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दिल्ली-मुंबई पोलिसांमध्ये नेमकं घडलं काय : मोहम्मद शामीनं सामन्यात केलेल्या धडाकेबाज कामगिरीविषयी दिल्ली पोलिसांनी ही मजेशीर पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, मुंबई पोलीस, आम्ही आशा करतो की, आज झालेल्या हल्ल्यासाठी तुम्ही मोहम्मद शामीला अटक करणार नाही. याला उत्तर देताना मुंबई पोलिसांनीही एक गंमतीशीर पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिलंय की, दिल्ली पोलीस, तुम्ही असंख्य लोकांची मनं चोरण्यासाठी कलम लावायला विसरलात आणि तुम्ही सहआरोपींची यादीही दिली नाही. मजेशीर पोस्ट करताना मुंबई पोलिसांच्या एक्स हँडलवर म्हटलयं की, प्रिय नागरिकांनो, दोन्ही शहराच्या पोलिसांना आयपीसी नीट माहीत आहे. तुमच्या विनोदबुद्धीवर आमचा विश्वास आहे.

हेही वाचा -

  1. Cricket World Cup 2023 AUS vs SA Semifinal : ऑस्ट्रलिया की दक्षिण आफ्रिका? दुसऱ्या उपांत्य सामन्यात कोलकाताच्या 'ईडन'वर कोणाचं 'दिल' होणार 'गार्डन'
  2. Anushka Sharma Showers Praises Virat Kohli : 'विराट' पराक्रमानंतर अनुष्काची खास पोस्ट, पतीचं केलं भरभरून कौतुक
  3. IND vs NZ Semifinal Records : वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघानं 'बुलेट ट्रेन'च्या वेगानं मोडले 'हे' विक्रम, आता वर्ल्ड कप राहणार लक्ष्य
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.