ETV Bharat / state

Juice Jacking Scam : स्मार्टफोन चार्जिंगला लावताच बँक खाते होईल साफ; 'अशी' घ्या तुमच्या मोबाईलची काळजी

author img

By

Published : Jul 29, 2023, 9:48 PM IST

Juice Jacking Scam
Juice Jacking Scam

स्मार्टफोन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच मोबाईलचा भरपूर वापर करतात. मोबाईल चार्जिंग करतांना काळजी घ्यावी लागणार आहे. मात्र, अनेकदा मोबाईलची बॅटरी कमी झाल्यानंतर आपण सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्ज करतो. मात्र, असे करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकते, तुमची महत्वाची माहिती चोरीला जावू शकते. यालाच ज्यूस जॅकिंग असे म्हटले जाते.

अंकुर पुराणिक माहिती देतांना

मुंबई : घराबाहेर असताना मोबाईल किंवा लॅपटॉपचे चार्जिंग संपल्यावर अनेकजण विमानतळ, रेल्वे स्थानक अशा सार्वजनिक ठिकाणी मोबाईल, लॅपटॉप सारखे गॅजेट चार्जिंगला लावतात. ही चूक खूप महागात पडू शकते. सध्या 'ज्यूस जॅकिंगद्वारे लोकांना टार्गेट करण्याचे प्रकार वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारांच्या विळख्यात न अडकण्यासाठी आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे.

ज्यूस जॅकिंग म्हणजे नेमके काय? : याबद्दल सायबर एक्सपर्ट अंकुर पुराणिक यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला आहे. मोबाईल हा आपल्या जीवनातला खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. खास करून ट्रॅव्हल करताना आपल्या मोबाईलची बॅटरी खूप लवकर डिस्चार्ज होते. एअरपोर्टवरती, कॅफेमध्ये किंवा रेल्वे स्टेशनवर यूएसबी चार्जिंग पोर्ट दिलेला असतात. एसे पोर्टला मोबाईल चार्जिंग लावणे धोकादायक असू शकते, असे मत अंकुर पुराणिक यांनी व्यक्त केले आहे.

तुमची गोपनीय माहिती चोरील : आता तुम्ही म्हणाल, मोबाईल चार्ज करतांना माहिती कशी चोरली जाऊ शकते? तर, तुम्ही तुमचा मोबाईल चार्जिंगला लावतांना त्या चार्जिंग पोर्टमध्ये सायबर गुन्हेगार एखादा प्रोग्राम सेट करुन तुमाचा मोबाईल हॅक करु शकतात. तसेच तुमच्या मोबाईलमध्ये 'मालवेअर' इन्स्टॉल करून तुमची मोबाईल माहिती सहज चोरू शकतात. यामुळे सायबर गुन्हेगार किंवा हॅकरला तुमच्या मोबाइलची संपूर्ण स्क्रीन, म्हणजे तुम्हाला मिळालेला OTP, वापरकर्ताचे नाव, तुम्ही टाइप केलेला पासवर्ड, ऑनलाइन बँकिंग आदी माहिती मिळवता येते. तुमची बँक शिल्लक किती आहे? तुमचे लोकशन काय आहे. तुम्ही काय करता अशी माहिती हॅकरला सहज मिळते.

काय आहे ज्यूस जॅकिंग स्कॅम : अर्थ क्षेत्रातील आर्थिक फसवणुकीवरील आरबीआयच्या पुस्तिकेत ज्यूस जॅकिंग हा एक घोटाळा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ज्यूस जॅकिंगद्वारे सायबर गुन्हेगार मोबाईल, लॅपटॉपसारख्या नेहमीच्या वापरातील उपकरणांमधून महत्त्वाचा डेटा चोरतात. ज्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते.

काय कराल? : यूएसबी डेटा ब्लॉकर्स वापरण्याचा विचार करा.

स्वतःचा चार्जर ठेवा : नेहमी वैयक्तिक चार्जर वापरा. सार्वजनिक ठीकाणी चार्जिंग स्टेशनचा वापर करणे टाळा.

ऑटो कनेक्ट बंद करा : तुमच्या डिव्हाइसवरील ऑटो कनेक्ट फिचर बंद करा, ते नकळतपणे नेटवर्क किंवा डिव्हाइसशी कनेक्ट होऊ शकतात.

ज्यूस जॅकिंगसाठी हल्लेखोर विमानतळ, हॉटेल, कॅफे अशा ठिकाणच्या सार्वजनिक चार्जिंग पोर्टचा वापर करतात. संवेदनशील माहिती चोरण्यासाठी तिथे हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतात. त्यासाठी मोबाईच चार्जिंगला लावतांना काळजी घ्यावी असे अवाहन अंकुर पुराणिक यांनी केले आहे.

हेही वाचा - Sharad Pawar Retirement : शरद पवार 'या' महिन्यात राजकारणातून होणार निवृत्त? पण...

Uddhav Thackeray : एक-एक फोडण्यापेक्षा...; उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान

Ambenali Ghat : महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी; 'हा' घाट राहणा्र 15 दिवस बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.