ETV Bharat / state

IIT Student Suicide Case : दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणी मोठा खुलासा; पोलीस SIT ला सापडली सुसाईड नोट

author img

By

Published : Mar 27, 2023, 7:28 PM IST

iit
आयआयटी विद्यार्थी

दर्शन सोळंकी याने फेब्रुवारी 2023 महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबई आयआयटीच्या आवारात आत्महत्या केली होती. या आत्महत्येच्या तपासासाठी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आले. दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या एसआयटीला सुसाईड नोट सापडली आहे, ज्यामध्ये त्याने एका विद्यार्थ्याचा छळ केल्याचा आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण लागण्याची शक्यता असून, तपास अधिक गतीने होणार आहे.

मुंबई - पोलिसांनी स्थापन केलेल्या एसआयटीच्या पथकाला दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात सुसाईड नोट सापडल्याने मोठी गती या तपासाला मिळाली आहे. या सुसाईड नोटमध्ये दर्शनने एका विद्यार्थ्याचा छळ केल्याचा आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी सहआयुक्त गुन्हे शाखा लखमी गौतम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना केली होती.

सुसाईड नोट सापडली - या पथकाच्या तपासादरम्यान, दर्शन सोळंकी याच्या आत्महत्येमागील एक कारण म्हणजे त्याच्यावर जातीवाचक टिप्पणी असल्याचे एसआयटीला समजले आहे. तसेच एसआयटीच्या सूत्रांनी पुढे सांगितले की, एसआयटी पथकाला दर्शन सोळंकी याच्या खोलीतून एक सुसाईड नोट सापडली, ज्यामध्ये 'अरमान याने माझी हत्या केली आहे' असे लिहिले आहे. पोलिस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, अरमान इक्बाल खत्री नावाच्या विद्यार्थ्याचे नाव असून ज्यावर सोळंकीचा छळ केल्याचा आणि धमकावल्याचा आरोप आहे. सापडलेली ती धक्कादायक सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली आहे व त्याअनुषंगाने तपास सुरू केला.

विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया व आरोप : मुंबई आयआयटीचे प्राध्यापक नंदकिशोर यांच्या अध्यक्षतेखाली एका चौकशी समितीने दर्शन आत्महत्या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर या समितीने ही आत्महत्या जातीभेदातून झाली नसल्याचे स्पष्ट केले व तसा अहवाल सादर केला होता. हा अहवाल दर्शनच्या कुटुंबीयांनी नाकारला देखील होता. त्यांनी म्हटले आहे की, ज्या वेळेला प्राध्यापक नंदकिशोर समिती याबाबत चौकशी करत होती तेव्हा त्याच्या वर्गमित्रांशी ते बोलले होते पण दर्शनच्या सख्ख्या बहिणीशी त्यांनी चर्चा केली नाही. तसेच याप्रकरणी समितीने जातीभेदाचे कोणतेही मुद्दे विचारात घेतले नसल्याचा आरोप दर्शनच्या कुटुंबीयांनी केला आहे.

चौकशी अहवाल नाकारला होता : तपास कोणत्या दिशेने गेला पाहिजे हे आयआयटीच्या चौकशी समितीने सुरुवातीलाच ठरवले होते. आम्ही पोलिसांना दिलेल्या जबाबाचा उल्लेख त्या चौकशीत अहवालात नाही. त्यामुळे हा तपास एतकर्फी झाला होता, असा आरोपही दर्शनच्या कुटुबीयांनी केला होता. आता चक्क पोलिसांनाच सुसाईड नोट सापडल्याने या प्रकरणाला नवीन वळण लागण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.