ETV Bharat / state

Vs Karmarkar Passed Away: क्रीडा पत्रकारितेचे जनक वि. वि. करमरकर यांचे निधन; पत्रकारितेत महत्त्वपूर्ण योगदान

author img

By

Published : Mar 6, 2023, 3:20 PM IST

Vs Karmarkar Passed Away
करमरकर यांचे निधन

मराठी पत्रकारितेत सर्वप्रथम वि. वी. करमरकर यांनी क्रीडा पानाला सुरुवात केल्याने त्यांना क्रीडा पानाचे जनक असे देखील म्हटले जायचं. ज्येष्ठ पत्रकार करमरकर यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी करमरकर यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. अंधेरी येथील पारशी वाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

मुंबई: तुम्ही रोज पेपर वाचता का? या वृत्तपत्रांमध्ये देश-विदेशात खेळला जाणाऱ्या खेळांसंदर्भात माहिती देणारे एक पान असत. ज्याला क्रीडा पान असे म्हणतात. हे क्रीडापान कोणी सुरू केले? तुम्हाला माहिती आहे का? तर हे क्रीडा पान सुरू केले एका मराठी माणसाने. ज्यांचे नाव आहे पत्रकार वि. वि. करमरकर. करमरकर यांनी आतापर्यंत अनेक भूमिका बजावल्या आहेत. माजी क्रीडा संपादक, लेखक, समीक्षक आणि एक लोकप्रिय समालोचक अशी त्यांची मराठी पत्रकारितेत ओळख त्यांनी आपली निर्माण केली. अशा या जेष्ठ अनुभवी क्रीडा समीक्षकाचे निधन झाल्याने सध्या क्रीडा क्षेत्राचा आणि खेळाडूंचा एक ज्येष्ठ मार्गदर्शक हरवल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.


क्रीडा वृत्ताला मानाचे स्थान: आपण मराठी पत्रकारितेचा इतिहास पाहिला तर साधारण 1960 च्या आधी वृत्तपत्रांमध्ये विशेषतः मराठी वृत्तपत्रांमध्ये खेळांच्या बातम्यांना काही विशेष स्थान नव्हते. मात्र, या बातम्यांना एक वेगळी ओळख देऊन एक-दोन परिच्छेदाच्या असणाऱ्या बातम्या आता तुम्हाला एका स्वतंत्र पानावर दिसतात आणि त्यासाठी प्रयत्न करणारी व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ पत्रकार वि. वि. करमरकर. करमरकर यांनी क्रीडा बातम्यांचा एक वाचक वर्ग निर्माण केला आणि यात त्यांनी मराठी क्रीडा पत्रकारितेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं.


मुख्यमंत्र्यांनी दिली श्रद्धांजली: अशा या ज्येष्ठ पत्रकाराच्या निधनाने सध्या सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील एक संदेश देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, "दिवंगत करमरकर यांनी क्रीडा जगताला वृत्तपत्रात हक्काचे स्थान मिळवून दिले. त्यांनी वृत्तपत्रांमध्ये क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसाठी स्वतंत्र पान सुरू केले. म्हणून ते मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक ठरले. त्यांनी क्रीडा क्षेत्रातील इंग्रजी शब्दांना सोपे आणि लक्षवेधी असे मराठी प्रतिशब्द शोधून काढले. करमरकर यांच्या निधनाने क्रीडा पत्रकारितेत पोकळी निर्माण झाली आहे. ज्येष्ठ क्रीडा समीक्षक, पत्रकार वि.वि. करमरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!"

हेही वाचा: Dhiraj Deshmukh Jai Karnataka : आमदार धीरज देशमुखांचा बेळगावात 'जय कर्नाटक'चा नारा, सीमावाद नव्याने चिघळणार?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.