ETV Bharat / state

नायर रुग्णालयामधील डॉक्टर आणि नर्स लस घेतल्यानंतरही पॉझिटिव्ह

author img

By

Published : Feb 19, 2021, 9:32 PM IST

Updated : Feb 19, 2021, 10:31 PM IST

मुंबई
मुंबई

कोरोना लस घेतल्यानंतर डॉक्टर-नर्सही पुरेशी काळजी घेत नसल्याने त्यांना कोरोनाची लागण होत आहे. नायर रुग्णालयात दोन रुग्ण आढळले आहेत. यात एका डॉक्टरचा आणि एका नर्सचा समावेश असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. लस घेतल्यानंतरही मास्क आणि सुरक्षित अंतराचे पालन करणे आवश्यक आहे.

मुंबई - मागील दोन महिन्यांपासून नियंत्रणात आलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा कहर सुरू केला आहे. यामुळे यंत्रणाची चिंता वाढली असताना आता आणखी एक चिंताजनक बाब समोर आली आहे. कारण कोरोना लस घेतल्यानंतर डॉक्टर-नर्सही पुरेशी काळजी घेत नसल्याने त्यांना कोरोनाची लागण होत आहे. नायर रुग्णालयात दोन रुग्ण आढळले आहेत. यात एका डॉक्टरचा आणि एका नर्सचा समावेश असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. लस घेतल्यानंतरही मास्क आणि सुरक्षित अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. पण, हे केले जात नसल्याने लसीकरणानंतरही कोरोनाची लागण होत असल्याचे म्हणत नियम पाळा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

आतापर्यंत दीड लाखाच्या आसपास लसीकरण

16 फेब्रुवारीपासून मुंबईत लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना तर दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. दरम्यान, कोविन अँपमधील गोंधळ आणि लशीबाबतच्या समज-गैरसमजामुळे लसीकरणाला थोडा कमी प्रतिसाद मिळत आहे. पण, तरीही 18 फेब्रुवारीपर्यंत आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कर्मचारी असे मिळून 1 लाख 48 हजाराहून अधिक जणांचे लसीकरण पूर्ण झाले.

लस घेतल्यानंतर 45 दिवसानंतर तयार होतात प्रतिपिंडे

कोरोनाची लस आल्याने नागरिकांची कोरोनाबाबतची भीती कमी झाली आहे. त्यामुळे ते निष्काळजीपणा करताना दिसत आहेत. तर लस घेतल्याने आता आपल्याला कोरोनाची भीती नाही, असे म्हणत लसीकरण झालेलेही निष्काळजीपणे वागत आहेत. हाच निष्काळजीपणा महाग पडत आहे. कोरोना वाढत असून लसीकरण केलेल्यांनाही कोरोनाची लागण होत आहे, अशी उदाहरणे देशात, राज्यात आढळत आहेत. अशात मुंबईतही असे दोन रुग्ण आतापर्यंत आढळल्याचे काकाणी यांनी सांगितले. नायर रुग्णालयामधील एका डॉक्टर आणि एका नर्सला लसीकरणानंतर कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लस ही 45 दिवसानंतर शरीरात कोरोनाविरोधात लढणारी प्रतिपिंडे तयार होतात. त्यामुळे 45 दिवस मास्क, सुरक्षित अंतर राखणे अत्यंत आवश्यक आहे. पण, या नियमांचे पालन लस घेतलेले करत नाहीत. त्यामुळे त्यांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे दिसत आहे.

अन्यथा दंड वाढवू!

मुंबईत कोरोना वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. मोठ्या संख्येने नागरिक मास्क न लावता फिरत आहेत. जेव्हा की मास्क हेच सर्वात मोठी लस आहे. त्यामुळे मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे. लस घेतलेल्यांनीही कायम मास्क वापरायला हवा. पण, हे होताना दिसत नाही. त्यामुळे आता लोकल, बाजार, सार्वजनिक ठिकाणी येथे मास्क न लावणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. लोक यानंतरही नियमांचा भंग करतच राहिले तर 200 रुपयांचा दंड वाढवू, असा इशारा दिला आहे.

Last Updated :Feb 19, 2021, 10:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.