ETV Bharat / state

Kangana Ranaut Vs Javed Akhtar : अभिनेत्री कंगना प्रकरणात जावेद अख्तर यांची दिंडोशी सत्र न्यायालयात धाव; न्यायालयाने दिले कंगनाला निर्देश

author img

By

Published : Aug 8, 2023, 7:57 PM IST

कंगना रणौत आणि वाद हे समीकरणच आता झालेले आहे. कंगना रणौत आणि जावेद अख्तर यांच्यात वाद झाला होता. आज त्याबाबत दिंडोशी सत्र न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने कंगना रणौतला जावेद अख्तर यांच्या फेरनिरीक्षण याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

Kangana Ranaut Vs Javed Akhtar
जावेद अख्तर आणि अभिनेत्री कंगना रणौत

मुंबई : दिंडोशी येथील सत्र न्यायालयात आज कंना विरुद्ध जावेद अख्तर खटल्याची सुनावणी झाली यावेळी. कोर्टाने अभिनेत्री कंगना राणौत हिला जावेद अख्तर यांच्या फेरनिरीक्षण अर्जावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. दिंडोशी न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए झेड खान यांच्यासमोर ही सुनावणी झाली. यावेळी कथित धमकीशी संबंधित प्रकरणात रणौत यांना नोटीस देऊन आपले म्हणणे मांडण्यास सांगितले. या प्रकरणी 24 ऑगस्टला पुढील सुनाावणी होईल.

गीतकार जावेद अख्तर यांनी सत्र न्यायालयासमोर फेरनिरीक्षण याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी असे नमूद केले आहे की, अंधेरी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना अयोग्य पद्धतीने समन्स जारी केले होते. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे. वकील जय भारद्वाज यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेनुसार प्रथमदर्शनी असे दिसते की, अशा प्रकारचे समन्स काढण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे दिसत नाही. दंडाधिकाऱ्यांनी कोणतेही तथ्य न तपासता हे समन्स काढले आहे, असे अख्तर यांच्या याचिकेत म्हटले आहे.

खटल्याची पार्श्वभूमी - हे प्रकरण २०२० सालातील आहे. यामध्ये गीतकार जावेद अख्तर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कंगना रणौतने एका दूरचित्रवाणी मुलाखतीत त्यांच्याविरुद्ध बदनामीकारक विधाने केली होती. त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेस धक्का पोहोचला होता. जून 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या कथित आत्महत्येनंतर रनौतने एका मुलाखतीत जावेद अख्तर यांच्याबद्दल बदनामीकारक विधाने केली होती. असा आरोप अख्तर यांनी केला होता. तर कंगनाने त्याच न्यायालयात कथित खंडणी आणि धमकावल्याबद्दल अख्तर यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. आता या प्रकरणी दिंडोशी कोर्टात पुढील खटला सुरू असून येत्या २४ ऑगस्टला पुढील सुनावणी होईल.

हेही वाचा -

  1. जावेद अख्तर मानहाणी प्रकरण : ...तर कंगना रणौतला होणार अटक
  2. Javed Akhtar: जावेद अख्तर यांना मुंबई सत्र न्यायालयाचा अंतरिम दिलासा नाही, पुढील सुनावणी 17 फेब्रुवारी रोजी
  3. Javed Akhtar News: मुलाखतीवेळी जावेद अख्तर यांचा अपमान; म्हणून खटला दाखल करावा लागला..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.