ETV Bharat / state

Corona Update: मुंबईत रुग्ण वाढ सुरूच, ११७ नवे रुग्ण, शून्य मृत्यूची नोंद

author img

By

Published : May 6, 2022, 7:38 PM IST

Mumbai Corona Update
मुंबई कोरोना अपडेट

मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट (The third wave of corona virus) आटोक्यात आल्यामुळे रुग्णसंख्येत घट (Decrease in patients) झाली होती. पण त्यात वाढ होऊन २६ एप्रिलला १०२, २७ एप्रिलला ११२, ३ मे ला १०० तर ४ मे ला ११७, ५ मे ला १३० रुग्ण सापडले. आज त्यात किंचित घट होऊन ११७ रुग्णांची नोंद झाली आहे. आज शून्य मृत्यूची नोंद (Zero death record) झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून ६८२ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत.

मुंबई: मुंबईत शुक्रवारी ११७ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ९३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण १० लाख ६० हजार ४३४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४० हजार १६५ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७०६ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ७५२४ दिवस इतका आहे.

मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००९ टक्के इतका आहे. मुंबईत आज सापडलेल्या ११७ रुग्णांपैकी ११३ म्हणजेच ९७ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २५ हजार ९५९ बेड्स असून त्यापैकी १८ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहुन अधिक बेड रिक्त आहेत.

मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ७७ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा तर मे महिन्यात ६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.



मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले.

नंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. १९ मार्चला २९, २० मार्चला २७, २१ मार्चला २८, २२ मार्चला २६, २४ मार्चला ५४, ३१ मार्चला ४२, १ एप्रिलला ३२, २ एप्रिलला ४९, ३ एप्रिलला ३५, ४ एप्रिलला १८, ५ एप्रिलला ५६, ६ एप्रिलला ५१, ७ एप्रिलला ४१, ८ एप्रिलला ४९, ९ एप्रिलला ५५, १० एप्रिलला ३५, ११ एप्रिलला २६, १२ एप्रिलला ५२,१३ एप्रिलला ७३, १४ एप्रिलला ५६, १५ एप्रिलला ४४, १६ एप्रिलला ४३, १७ एप्रिलला ५५, १८ एप्रिलला ३४, १९ एप्रिलला ८५, २० एप्रिलला ९८, २१ एप्रिलला ९१, २२ एप्रिलला ६८, २३ एप्रिलला ७२, २४ एप्रिलला ७३, २५ एप्रिलला ४५, २६ एप्रिलला १०२, २७ एप्रिलला ११२, २८ एप्रिलला ९०, २९ एप्रिलला ९३, ३० एप्रिलला ९४, १ मे ला ९२, २ मे ला ५६, ३ मे ला १००, ४ मे ला ११७, ५ मे ला १३०, ६ मे ला ११७ रुग्णांची नोंद झाली आहे.



हेही वाचा : Ludhiana scientist Dr BS Aulakh : कोरोनावर औषध शोधल्याचा पंजाबच्या डॉक्टर औलाख यांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.