ETV Bharat / bharat

Ludhiana scientist Dr BS Aulakh : कोरोनावर औषध शोधल्याचा पंजाबच्या डॉक्टर औलाख यांचा दावा

author img

By

Published : May 6, 2022, 7:31 PM IST

सोक्सम नावाचे ( Soxam medicine for corona ) औषध शोधल्याचा डॉ. बी. एस. औलाख यांनी दावा केला आहे. डॉ. औलाख यांच्या दाव्यानुसार हे औषध कोरोना रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यांनी त्यांच्या औषधाला सोक्सम असे नाव दिले आहे. या औषधाला पंजाब सरकारच्या आयुर्वेद विभागाकडून ( Punjab Ayurvedic department ) मान्यता मिळाली आहे. आता ते औषध बाजारात आणण्याच्या ( Soxam in market ) तयारीत आहेत.

डॉ. बी. एस.  औलख
डॉ. बी. एस. औलख

लुधियाना ( पंजाब ) - लुधियानाचे रहिवासी डॉ. बी. एस. औलख ( BS Aulakh claims on medicine ) यांनी कोरोना महामारीशी संबंधित औषध शोधल्याचा दावा केला आहे. डॉ. बी. एस. औलाख हे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शास्त्रज्ञ आहेत. ते सतत नवनवीन औषधांचा शोध लावत असतात.

सोक्सम नावाचे ( Soxam medicine for corona ) औषध शोधल्याचा डॉ. बी. एस. औलाख यांनी दावा केला आहे. डॉ. औलाख यांच्या दाव्यानुसार हे औषध कोरोना रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यांनी त्यांच्या औषधाला सोक्सम असे नाव दिले आहे. या औषधाला पंजाब सरकारच्या आयुर्वेद विभागाकडून ( Punjab Ayurvedic department ) मान्यता मिळाली आहे. आता ते औषध बाजारात आणण्याच्या ( Soxam in market ) तयारीत आहेत.

डॉ. बी.एस. औलख यांचे काय म्हणणे आहे - डॉ. बी.एस. औलख यांनी दावा केला आहे की त्यांचे औषध ब्रॉड स्पेक्ट्रम अँटी-व्हायरल औषध आहे. याद्वारे अनेक हँगिंग व्हायरस नियंत्रित केले जातात. पंजाब सरकारच्या वैद्यकीय विभागाने कोरडा खोकला, ताप, श्वास लागणे आणि अंतर्गत अवयवांना सूज येणे इत्यादी कोरोना विषाणूच्या मुख्य लक्षणांवर उपचार करण्यासाठी या ( Soxam benefits in treatment ) औषधाला मान्यता दिली आहे. हे औषध मेंदूसह इतर अवयवांची सूज नियंत्रित करते.

रुग्णांना औषध वरदान ठरेल - डॉ. बी. एस. औलख यांचा दावा: डॉ. बी.एस. औलख यांनी दावा केला की, ज्या लोकांमध्ये कोरोना विषाणू दीर्घकाळ टिकतो त्यांच्यासाठी हे औषध वरदान आहे, ते म्हणाले की, याची चाचणीही झाली आहे. औषधाला लवकरच अॅलोपॅथीद्वारे मंजूर होईल, असा विश्वास आहे. कारण ते अॅलोपॅथीमध्ये पारंगत आहेत. आता अॅलोपॅथीची नावे खूप बदलली आहेत. त्यामुळे त्यांना सुरुवातीला आयुर्वेदिक क्षेत्रात उपलब्ध करणे भाग पडले आहे.

औषधाची किंमत परवडणाऱ्या दरात- त्यांनी सांगितले की हा चार दिवसांचा कोर्स आहे. यामध्ये आठ कॅप्सूल तुम्हाला जवळपास 320 रुपयांना मिळणार आहे. औषधाचा कोणताही साइड इफेक्ट नाही. औषधाची किंमत कमी असल्याने कोणीही घेऊ शकते. ते पुढे म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात झिका व्हायरससाठी वापरण्यात आलेली रेमडेसिव्हिर ही लसदेखील खूप प्रभावी असल्याचे त्यांनी पाहिले. मात्र, त्याचा काळाबाजार झाला होता. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरू शकेल असे औषध तयार केले आहे.

कोण आहेत डॉ. बी.एस. औलख - डॉ. बी.एस. औलख हे सीएमसीएचमध्ये प्राध्यापक राहिले आहेत. ते ग्रेगर मेडल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन जेनेटिक्सचे संचालकदेखील आहेत. त्यांच्या अनेक औषधांना अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि कॅनडासारख्या देशांनी मान्यता दिली आहे.

हेही वाचा-Kashis Divyang Astha : दिव्यांग आस्थांवर 13 शस्त्रक्रियांसह 100 हाडांचे फ्रॅक्चर, जिद्दीने चालविते एनजीओ

हेही वाचा-Mussoorie Bus Accident : मसुरीला फिरायला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात; 7 जण जखमी

हेही वाचा-मशिदींमध्ये लाऊडस्पीकर वापरणे हा मूलभूत अधिकार नाही : अलाहाबाद उच्च न्यायालय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.