ETV Bharat / state

Tunisha Sharma case शीझानचे व्हॉट्सअप चॅट पोलिसांच्या हाती, दुसरीबरोबरच सुरू होते प्रेमाचे चॅटिंग, पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ

author img

By

Published : Dec 28, 2022, 12:33 PM IST

Updated : Dec 28, 2022, 5:34 PM IST

Sheezan Khan Tunisha Sharma
Sheezan Khan Tunisha Sharma

तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांनी ( Tunisha Sharma case ) स्पष्ट केले आहे की, तिचा माजी प्रियकर शीझान खान ( Sheezan Khans WhatsApp chat ) तिच्यासोबत नात्यात असताना त्याच्या आयुष्यात आणखी एक स्त्री होती. त्याच्या व्हॉट्सअप चॅटवरून पोलिसांनी याबाबतचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान आज कोर्टाने त्याच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ केली.

मुंबई - तुनिषा शर्माच्या कथित आत्महत्येची चौकशी करणाऱ्या तपास पथकाच्या हाती तांत्रिक धागेदोरे लागल्याचे ( Tunisha Sharma case ) वृत्त आहे. तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, तिचा माजी प्रियकर शीझान खान तिच्यासोबत नात्यात ( Sheezan Khans WhatsApp chat ) असताना त्याच्या आयुष्यात आणखी एक स्त्री होती. त्याच्या व्हॉट्सअप चॅटवरून पोलिसांनी याबाबतचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. टीव्ही अभिनेत्री तुनसिहा शर्माच्या मृत्यूप्रकरणी आम्ही आरोपी शीझानच्या आईचा जबाबही नोंदविणार असल्याचे वालीव पोलिसांनी ( waliv police on Tunish death case ) सांगितले. दरम्यान अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणी आरोपी शीझान खानला वालीव पोलिसांनी मुंबईतील वसई न्यायालयात आज हजर केले. शीझानचे इतर महिलांशीही संबंध असल्याचे पोलिसांनी आज न्यायालयासमोर सांगितले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करावा अशी मागणी, तुनिषा शर्माचे काका पवन शर्मा यांनी केली आहे. त्याचबरोबर शीझानला भेटल्यानंतर तुनिषाच्या अनेक गोष्टी बदलल्या होत्या, तिने हिजाब घालायला सुरुवात केली होती, अशीही माहिती पवन शर्मा यांनी दिली. दरम्यान खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी आज वाढवून देण्यात आली.

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी शीझान मोहम्मद खान याला वालीव पोलिसांनी रविवारी वसई न्यायालयात हजर केले. (Tunisha Sharma death case) शीझानवर आयपीसी कलम ३०६ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. (Tunisha Sharma Breakup with Sheezan Khan) तुनिशा आणि शीझान अली बाबा, दास्तान-ए-काबुलमध्ये सहकलाकार होते. (Tunisha Sharma Death) शनिवारी टीव्ही शोच्या सेटवर ती मृतावस्थेत आढळली.

कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही( Tunisha Sharma news ) शीझानची बहीण आणि वकील वालीव पोलीस ठाण्यात दिसले, त्यांनी कोणतीही टिप्पणी शेअर केली नाही. नंतर, शीझानला वसई कोर्टात हजर करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी कारमध्ये नेले. तुनिषा एका टीव्ही मालिकेच्या सेटवर मृतावस्थेत आढळली होती. वालीव पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांना माहिती मिळाली की, चहाच्या ब्रेकनंतर अभिनेत्री टॉयलेटमध्ये गेली आणि जेव्हा ती परत आली नाही तेव्हा पोलिसांनी दरवाजा तोडला आणि तिने गळफास घेतल्याचे आढळले. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही.

15 दिवसांपूर्वी त्यांचे ब्रेकअप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की, तुनिषाने टोकाच्या पाऊलामुळे तिचे जीवन संपुष्टात आले, त्याचे कारण पंधरवड्यापूर्वी शीझानसोबतचे तिचे ब्रेकअप असू शकते. या प्रकरणाच्या प्रथम माहिती अहवाल किंवा एफआयआरमध्ये असे दिसून आले आहे की दोन अभिनेते रिलेशनशिपमध्ये होते, आणि 15 दिवसांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले होते. तुनिषा शर्मा ही तणावाखाली होती आणि त्यामुळेच तिला टोकाला नेले असा संशय आहे, असे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.

Last Updated :Dec 28, 2022, 5:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.