ETV Bharat / state

Nana Patole : धारावी पुनर्विकास प्रकल्प केवळ ५ हजार कोटींना कशाच्या आधारावर दिला - नाना पटोलेंचा सवाल

author img

By

Published : Dec 8, 2022, 12:24 PM IST

Nana Patole
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी सरकारने शेकडो एकर जमीन (Land for Dharavi Redevelopment Project) केवळ ५ हजार कोटी रुपयांना एका उद्योगपतीला दिली. त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कशाच्या आधारावर एवढी मोलाची जमीन देण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला आहे. आम्ही या प्रश्नी जाब विचारणार असल्याचा इशारा नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी दिला आहे.

मुंबई : धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी (Dharavi Redevelopment Project) भाजपा सरकारने शेकडो एकर मोलाची जमीन केवळ ५ हजार कोटी रुपयांना एका उद्योगपतीच्या घशात घातली, असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. हा प्रकल्प देताना कोणती टेंडर प्रक्रिया पार पाडण्यात आली? कशाच्या आधारावर एवढी मोलाची जमीन देण्यात आली? या प्रकल्पासाठी दुबईच्या सी-लिंक कंपनीने ७ हजार ५०० कोटी रुपयांची निविदा भरली होती, पण नंतर सरकारने ती रद्द केली. ह्या पाठीमागे काय गौडबंगाल आहे? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला (Nana Patole on Land for Dharavi Project) आहे.

जनतेला उत्तरे पाहिजे : केवळ ५ हजार कोटी रुपयांना एका उद्योगपतीला ह्या प्रकल्पाचे काम कसे काय दिले? महाराष्ट्र सरकारने रेल्वेच्या जमिनीसाठी ७०० कोटी रुपये दिले होते. पण त्यावेळी रेल्वेने महाराष्ट्र सरकारला जमीन दिली नाही, आता असे काय घडले की ही जमीन राज्य सरकारला दिली? याची उत्तरे जनतेला दिली पाहिजेत. हिवाळी अधिवेशनात सरकारला आम्ही या प्रश्नी जाब विचारणार असल्याचा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी (Congress state president Nana Patole) ही शंका उपस्थित केली आहे.

भ्याड हल्ल्यांचा निषेध : तसेच सीमा भागात कर्नाटकाकडून होत असलेले हल्ले गंभीर असून आम्ही या भ्याड हल्ल्यांचा निषेध करतो. केंद्रातील मोदी सरकार व काही उद्योपतींच्या इशाऱ्यावर कर्नाटक अशा कुरापती काढत आहे. वास्तविक पाहता दोन राज्यात वाद उद्भवल्यानंतर केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन तो सामोपचाराने सोडवला पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई दररोज भडकाऊ विधाने करत आहेत. महाराष्ट्र सरकारकडून त्याला उत्तर दिले जात नाही. महाराष्ट्रात सरकार आहे की नाही असे वाटावे, अशी परिस्थिती आहे. आपण मोदी-शाह यांचे हस्तक आहोत हे मुख्यमंत्री शिंदे यांनी आधीच जाहीर करून टाकले आहे त्यामुळे त्यांच्याकडून काही अपेक्षा नाहीत पण महाराष्ट्राची जनता व काँग्रेस पक्ष कर्नाटकची दादागिरी सहन करणार नाही, वेळ पडली तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ हा इशारा नाना पटोले यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला (Nana Patole allegations on Land) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.