ETV Bharat / state

Cm Wishes On Ganesh Chaturthi : गणराया . . . महाराष्ट्रावर कृपाछत्र असू द्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घातलं गणरायाला साकडं, नागरिकांना दिल्या शुभेच्छा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2023, 1:07 PM IST

Updated : Sep 19, 2023, 2:39 PM IST

Cm Wishes On Ganesh Chaturthi
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घातलं गणरायाला साकडं

Cm Wishes On Ganesh Chaturthi : राज्यात आजपासून सगळ्यांच्या आवडत्या गणरायाचं आगमन होत आहे. त्यामुळे राज्यात नवचैतन्य पसरलं आहे. गणेश उत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रावर कृपाछत्र राहू दे असं साकडं गणरायाला घातलं आहे. तर राज्यातील जनतेला गणेश उत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

मुंबई Cm Wishes On Ganesh Chaturthi : गणराया महाराष्ट्रावर कृपाछत्र असू द्यावं, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणराया चरणी साकडं घातलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपती बापा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणत, राज्यातील जनतेला गणेश उत्सवाच्या ( Ganesh Chaturthi ) शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : गणाधिपती गणपती म्हणजे विघ्नहर्ता, चौदा विद्यांचा, 64 कलांचा अधिपती अशा या श्री गणेशाच्या आगमनातून मांगल्यपूर्ण आणि पवित्र असं वातावरण निर्माण झालं आहे. दरवर्षी बाप्पा येतात, त्यांचं आगमन दरवर्षी आगळंवेगळं भासतं. आपल्या नव्या आकांक्षा आणि संकल्पनांना ऊर्जा मिळते. गणेश उत्सव हा महाराष्ट्राचा सण आहे. त्यामुळेच याकडं संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं असतं. आपला महाराष्ट्र सगळ्याच बाबतीत पुढं आहे. या उत्सवातून आपण जगाला महाराष्ट्राच्या वेगळेपणाची ओळख करुन देऊया. बाप्पांच्या सेवेत कुठं आपण कमी राहणार नाही, अशी आपण मनोभावानं सेवा करू. आपण आपल्या पर्यावरणाची देखील काळजी घेऊया. परिसराची काळजी घेऊन हा उत्सव साजरा करुया. बाप्पाकडून सकारात्मक आणि नवनिर्मितीची प्रेरणा घेऊया. बंधुभाव, सलोखा आणि परस्परातील प्रेम आदरभाव वाढीस लागेल, समाज प्रबोधनाचे उपक्रम आयोजित करुया. श्री गणेशाचे आगमन सर्वांसाठी आशीर्वादच ठरेल. बाप्पाच्या आशीर्वादानं आपल्या कुटुंबातील सर्वांची संकल्प इच्छा आशा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, अशी मनोकामना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाप्पांकडं केली आहे. तसंच बाप्पाचं कृपाछत्र महाराष्ट्रावर असू द्यावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना केली आहे. आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा' असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं आहे.

Cm Wishes On Ganesh Chaturthi
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घातलं गणरायाला साकडं
Cm Wishes On Ganesh Chaturthi
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घातलं गणरायाला साकडं

गणेश उत्सवावर महागाईचं सावट : गणेश उत्सव हा महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबई आणि कोकणात मोठ्या उत्साहात होत असतो. कोकणातून मुंबईत व्यवसाय आणि नोकरीसाठी स्थायिक झालेले भाविक गणपतीच्या उत्सवात आपल्या कोकणातील मूळ गावी जाऊन गणपती उत्सव साजरा करतात. मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची गेल्या पाच दिवसापासून बस स्थानकात आणि रेल्वे स्थानकात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक भागात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालं आहे. शेतकरी चिंताक्रांत आहे, मात्र तरी बाप्पाच्या आगमनानं सगळीकडं नवचैतन्याचं वातावरण आहे. यंदा बाप्पाच्या सजावटीपासून ते पूजाविधी वस्तूवर देखील महागाईचं सावट कायम आहे.

हेही वाचा :

  1. Ganesh Chaturthi २०२३ : नवसाला पावणारा 'टेकडीचा गणपती'; सचिन तेंडुलकर देतो अवश्य भेट, जाणून घ्या इतिहास
  2. Ganesh Festival २०२३ : गणरायानं स्वप्नात येऊन सांगितलं मूर्तीचं गुपीत, वाचा खंडाळ्याच्या पावन गणपतीची आख्यायिका
Last Updated :Sep 19, 2023, 2:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.