ETV Bharat / state

विनातिकीट प्रवास करणाऱ्या युवकांची एसी लोकलमध्ये दादागिरी, तिकीट तपासकांसोबत असभ्य वर्तन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 18, 2024, 9:28 PM IST

Mumbai News
Mumbai News

Mumbai Local Train News : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरूणांनी तिकीट तपासकांसोबत असभ्य वर्तन केल्याची घटना गुरुवारी (18 जानेवारी) मुंबईत घडली आहे. या घटनेमुळं टिकीट तपासकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

तिकीट तपासकांसोबत असभ्य वर्तन

मुंबई Mumbai Local Train News : प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी रेल्वेनं मुंबईत एसी लोकल सुरू केली आहे. त्यामुळं एसी लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून गाड्याची संख्या देखील वाढवण्यात येत आहे. मात्र, अनेक फुकटे प्रवासी या एसी लोकलनं प्रवास करताना दिसून येत आहे. रेल्वेनं फुकट्या प्रवाशांना दंड करण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या असून त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल केली आहे.

तिकीट तपासकाला शिवीगाळ : अनेकदा तिकीट नसलेले प्रवासी दंड भरून सुटतात, तर काही तिकीट तपासकांसोबत वाद घालतात. असाच प्रकार गुरुवारी दुपारी चर्चगेट विरार एसी लोकलमध्ये घडला. दोन तिकीट नसलेल्या तरुण प्रवाशांनी थेट तिकीट तपासनीसांना दमदाटी करत शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. वाढ वाढत असल्याचं पाहून अखेर प्रवाशांनी तिकीट तपासनीसच्या मदतीला धाव घेतली.



विना तिकीट प्रवासावरून दमदाटी : चर्चगेट विरार एसी लोकलमध्ये आज दोन विना तिकीट प्रवास करणाऱ्या युवकांनी थेट तिकीट तपासकाच दम भरला. चर्चगेटवरून दुपारी विरारसाठी सुटलेल्या एसी लोकलमध्ये दोन युवा तरुण विना तिकीट प्रवास करत होते. जेव्हा तिकीट तपासकांनी त्यांच्याकडं तिकिटांची मागणी केली, तेव्हा अगोदर त्यांनी तिकीट दाखवण्यास टाळाटाळ केली.

युवकांची तपासकाला दमदाटी : त्यानंतर वारंवार मागणी केल्यानंतर त्यांच्याकडं तिकीटचं नसल्याचं समजलं. त्यामुळं त्यांनी तिकीट तपासकानं दंड भरण्यास सांगितलं. परंतु आमच्याकडं पैसे नसून आपण कधीच ऑनलाईन पेमेंट करत नाही, असं त्या युवकांनी तिकीट तपासकाला सांगितलं. यावरून दोन तरूणांनी वाद घालायला सुरवात केली. आम्ही सांगितलं आमच्याकडं तिकीटही नाही, आमच्याकडं पैसेही नाहीत, आम्ही ऑनलाईन पेमेंट करत नाही, हे वारंवार सांगूनही तुम्हाला समजत नाही का? असं त्या युवकांनी तिकीट तपासकाला सांगत भांडण करण्यास सुरवात केलीय. या सर्व गोंधळात काही प्रवाशी तिकीट तपासकाच्या मदतीला धावून आले. तसंच टीकीट तपासकाचे सहकारी देखील गोंधळ पाहून तिथं आले. तरीसुद्धा या युवकांनी त्यांचं काही ऐकलं नाही. हा सर्व गोंधळ डब्ब्यातील प्रवासी पाहत होते. त्यामुळं प्रवाशांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

आप नहीं जानते मैं कौन हू : या सर्व गोंधळात प्रवासी मध्यस्थी करण्यासाठी आले असता, या तरुणांनी प्रवाशांशी असभ्य वर्तन केलं. त्यामुळं प्रवाशांनीही संताप व्यक्त केला. आप नहीं जानते मैं कौन हू, आप मुझे पहचानते नही. मेरा नाम पता चलेगा तो आप सब हिल जाएंगे. मेरा नाम नेट पे सर्च कर लेना आपको पता चलेगा, आपक जो करना है करलो, मैं किसी को डरता नही. मुझे मारोगे तो बहुत पछताओगे, अशी धमकीच तरुणांनी तपासकांना दिली. मात्र, या युवकांना तिकीट तपासकासह डब्यातील इतर प्रवाशांनी समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही. त्यांनी तपासकांना असभ्य भाषा वापरली. तिकीट तपासकांनी त्यांना वारंवार मागणी करूनही त्यांनी दंड भरण्यास नकार दिला. त्याचवेळी त्या दोन तरुणांनी एकाला फोन करून तिकीट तपासनीसची तक्रार करण्यास सुरुवात केली. अखेर या दोन तिकीट नसलेल्या तरुण प्रवाशांना नालासोपारा रेल्वे पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.

तिकीट तपासकाची सुरक्षा महत्त्वाची : एसी लोकलमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा प्रसंगी अनेकदा फुकट्या प्रवाशांचा तिकीट तपासकासोबत अनेक वेळा वाद होतो. आज तिकीट तपासकाच्या मदतीसाठी त्यांचे सहकारी तसंच प्रवासी धावून आले, म्हणून वाद टळाला. त्यामुळं तिकीट तपासकाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

हे वाचलंत का :

  1. ओडिशातून महाराष्ट्रात ड्रग्जची तस्करी, साडेअकरा लाखाचा 46 किलो गांजा सिकंदराबादमध्ये जप्त
  2. आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; जाहिरात कंपनीची 11 कोटींनी फसवणूक केल्याप्रकरणी दोन भावांना अटक
  3. शेजार धर्माला काळिमा; 3 वर्षीय बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न, नराधमास अटक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.